ETV Bharat / state

वर्धा जिल्ह्यात सूर्यनारायण तळपला; तापमान ४६ अंशांवर - उष्माघात

उष्माघात तसेच तापमानामुळे प्रकृती बिघडलेल्या रुग्णांसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात 'कोल्ड वॉर्ड' तयार करण्यात आले आहे.

वर्धा जिल्ह्यात सूर्यनारायण तळपला
author img

By

Published : Apr 27, 2019, 9:16 PM IST

वर्धा - जिल्ह्यात आज (शुक्रवार) सर्वाधिक म्हणजे ४६ अंश तापमानाची नोंद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे हे तापमान दोन दिवसात ०.५ अंशांनी तर मागील आठवड्याभरात तापमानात तब्बल ५ अंशाने वाढ झाली आहे. सोमवारी ४१ अंशावर असलेले तापमान वाढून आज ४६ अंशावर पोहोचले आहे. वाढत्या उन्हामुळे वर्धेकरही हैराण झाले आहेत.

वर्धा जिल्ह्यात सूर्यनारायण तळपला

वाढत्या तापमानामुळे नागरिकांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागत आहे. तापमानात सातत्याने होणारी वाढ हे लहान मुले आणि वयोवृद्ध यांच्यासाठी चिंता वाढवणारी आहे. या तापमानापासून लहान मुलांची विशेष काळजी घेण्याचे आवाहन डॉक्टर करत आहेत. उन्हामुळे दुपारच्या वेळेला रस्ते निर्मनुष्य होताना दिसत आहेत. नागरिकांनी घराबाहेर पडणे आता टाळायला सुरुवात केली आहे. तसेच थंडावा मिळावा यासाठी नागरिक थंड पेयांच्या दुकानांवर गर्दी करत आहेत.

Intro:R_MH_27_APR_WARDHA_TAPMAN_VIS_1

वर्ध्याचे तापमान 46 अंशावर, तापमान दोन दिवसात तब्बल 0.5 अंशाने तर आठवड्या भारत 5 अंशाने वाढ

वर्ध्यात तापमानाचा पार खाली येण्याचे नावच घेत नसल्याने हैराण झाले आहे. तापमान वाढतीवरच असून आज सर्वाधिक तापमान म्हणून 46 अंश नोंदवल्याया गेले आहे. विशेष म्हणजे हे तपाम दोन दिवसात 0.5 अंशांनी वाढलेले आहे. सोमवारी 41 अंशावर असलेले तापमान वाढून 46 अंशावर म्हणजे 5 अंशांनी वाढलेले आहे.

वाढता तापमानाने नागरिकांना प्रचंड उकळ्याचा सामना करावा लागत आहे. नागरिकांची उष्ण लाटांनी जीवाची काहिली झाली आहे. तापमान वाढ हे लहान मुले आणि वयोवृद्धाची प्रकृतीत चिंता वाढवत आहे. या तापमानापासून लाहान मुलांची विशेष काळजी घेण्याच आवाहन डॉक्टर करत आहे. वाढते तपमान पाहता कुलर सुद्धा निकामी ठरत आहे.

दुपारच्या वेळेला आता रस्ते निर्मनुष्य होतांना दिसत आहे. नागरिकांनी घरा बाहेर पडणे आता टाळायला सुरवात केली आहे. डॉक्टरांच्या वतीने सुद्धा विशेष काळजी घेण्याचे सांगितले जात आहे.

जिल्हा सामान्य रुग्णालयात उष्मघताच तसचे तापमानामुळे प्रकृती बिघडलेल्या रुग्णांनासाठी 'कोल्ड वॉर्ड' तयार करण्यात आले आहे. इथे थंड राहील असे वातावरण निर्माण करून उपचार जिल्हा सामान्य रुंगालाय सुरू आहे. उष्णतेनेमूळे रुग्णाना फटका न बसता लवकरात लवकर प्रकृती दुरुस्त होण्यास मदत होत आहे.

Body:पराग ढोबळे,वर्धा.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.