वर्धा - हिंगणघाटमध्ये प्राध्यापिकेवर झालेल्या हल्ल्याचा महिला प्रदेश काँग्रेस अध्यक्षा चारुलता टोकस यांनी निषेध केला आहे. या प्रकरणाचा खटला जलदगती न्यायलयात (फास्ट ट्रॅक कोर्ट) चालवला जावा. आरोपीला तीन महिन्यांच्या आत शिक्षा व्हावी, अशी मागणी टोकस यांनी केली.
हेही वाचा - ...त्यालाही पेट्रोल टाकून जाळा, पीडितेच्या आईची उद्विग्न प्रतिक्रिया'
सोमवारी हिंगणघाट येथे प्रेम प्रकरणातून एका प्राध्यापिकेवर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न झाला. या घटनेमुळे राज्यातील महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे. हिंगणघाटचे प्रकरण असो वा आणखी कुठले महिलांविरुद्ध होणाऱ्या अशा घटनासाठी आपण कायदे कडक केले पाहिजेत. अशा प्रकरणांतील आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा दिली गेली पाहिजे, असे मत चारुलता टोकस यांनी व्यक्त केले.