वर्धा - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. भाजी बाजार बंद करणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी नकार दिल्यास कारवाई होईल. यासह जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दूध उत्पादन होते. हे दूध पशूपालकांकडून दूध घेण्यास नकार देणाऱ्या मोठ्या दूध डेअरी आणि विक्री संघावर कारवाई करावी, असे आदेश पशुसंवर्धन मंत्री तथा पालकमंत्री सुनील केदार यांनी दिले. ते आज जिल्ह्याच्या कोरोना संबंधित परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आले होते. यावेळी शहरातील भाजीपाला विक्रेत्यांची व्यवस्थेची पाहणी करतांना माध्यमांशी बोलत होते.
"शेतकऱ्यांच्या भाजीसह दूध खरेदी न केल्यास डेअरी, बाजार समित्यांवर कारवाई करणार"
राष्ट्रीय आपत्ती आणि साथरोग प्रतिबंध कायद्यांतर्गत जीवनावश्यक वस्तूचा पुरवठा सुरळीत करणे ही शासन, प्रशासनाची जबाबदारी आहे. या कठीण परिस्थितीचा गैर फायदा घेणाऱ्यांवर कठोर कारवाई करणाऱ्यांचा इशारा केदार यांनी दिला.