ETV Bharat / state

वर्ध्यात बसफेरीसाठी विद्यार्थ्यांचा चांदणी फाट्यावर रास्तारोको, आश्वासनानंतर आंदोलन मागे

यावेळी 70 विद्यार्थी फाट्यावर उपस्थित होते. शाळेच्या वेळेत जलद बस विद्यार्थ्यांसाठी थांबवल्या जातील. वेगळी बस नसल्याने येत्या दोन महिन्यांत नियोजन केले जाईल, असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर विद्यार्थ्यांनी मार्ग सोडला.

वर्ध्यात बसफेरीसाठी विद्यार्थ्यांचा चांदणी फाट्यावर रास्तारोको, आश्वासनानंतर आंदोलन मागे
author img

By

Published : Aug 10, 2019, 12:03 PM IST

Updated : Aug 10, 2019, 1:23 PM IST

वर्धा - एसटी महामंडळाची बस शाळेच्या वेळेवर येत नसल्याने संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी वर्धा ते आर्वी मार्गावरील चांदणी फाट्यावर रास्ता रोको केला. जवळपास दोन तास रास्तारोको सुरू राहिल्याने रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. अखेर चांदणी, दानापूर, बोथली गावातील विद्यार्थ्यांना एसटी महामंडळाच्या फेऱ्या वेळेवर सोडण्याचे लेखी आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी आपले आंदोलन मागे घेतले.

वर्ध्यात बसफेरीसाठी विद्यार्थ्यांचा चांदणी फाट्यावर रास्तारोको, आश्वासनानंतर आंदोलन मागे

आर्वी-वर्धा मार्गावर चांदणी फाटा आहे. या फाट्याजवळ रस्त्याच्या बाजूला असलेल्या गावांतील विद्यार्थी बससाठी फाट्यावर येतात. या भागात केवळ दनापूर या गावातच बस जाते. मात्र तीही नियमित नाही. एवढेच नाही, तर बोथली हेटी, किन्हाळा, तरोडा या गावांतही बस येत नसल्याने चार ते पाच किमी अंतर कापून विद्यार्थी फाट्यावर येतात. मात्र वेळेवर बस नसल्याने शाळकरी विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो. या मार्गावर दार 15 मिनिटांनी जलद बस आहे. पण त्या फाट्यावर थांबत नाहीत. तसेच आडणरी बस शाळेच्या वेळेवर नसल्याने विद्यार्थाना पिंपळखुंट्यापर्यंत पाई जावे लागते. यामुळे संतप्त विद्यार्थ्यांनी या त्रासाला कंटाळून आज रस्ता रोको केला.

यावेळी 70 विद्यार्थी फाट्यावर उपस्थित होते. शाळेच्या वेळेत जलद बस विद्यार्थ्यांसाठी थांबवल्या जातील. वेगळी बस नसल्याने येत्या दोन महिन्यांत नियोजन केले जाईल, असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर विद्यार्थ्यांनी मार्ग सोडला. दोन तास वाहतूक अडवून ठेवल्याने दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागलेल्या पाहायला मिळाल्यात. हीच परिस्थिती जिल्ह्यातील अनेक ग्रामीण भागांत पाहायला मिळते.

Intro:बसफेरीकरिता विद्यार्थ्यांचा चांदणी फाट्यावर रास्तारोको

# आश्वासनानंतर विद्यार्थ्याचे आंदोलन मागे

वर्धा - एसटी महामंडळाची बस शाळेच्या ळेवर येत नसल्याने संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी वर्धा ते आर्वी मार्गावरील चांदणी फाट्यावर रास्ता रोको केला. जवळपास दोन तास रास्तारोको सुरू राहिल्याने रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. अखेर चांदणी, दानापूर, बोथली गावातील विद्यार्थ्यांना एसटी महामंडळाच्या फेऱ्या वेळेवर सोडण्याचे लेखी आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

आर्वी वर्धा मार्गावर चांदणी फाटा आहे. या फाट्यावर जवळपास रस्त्याच्याया दोन्ही बाजूला असलेल्या आतमधील गावातील विद्यार्थी हे फाट्यावर येतात. दनापूर हे गाव चांदणी फाट्यावरून चार किलोमीटर आहे. या एकाच गावात बस जात मात्र ते सुद्धा कधी कधीच जात असल्याचा आरोप विद्यार्थी करतात. सोबतच या बसच्या साह्याने बोथली हेटी, किन्हाळा, तरोडा या गावात बस येत नसल्याने चार ते पाच किमी अंतर कापून विद्यार्थी फाट्यावर येतात. मात्र वेळेवर बस नसल्याने शाळकरी विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो. या मार्गावर दार 15 मिनीटांनी जलद बस आहे. पण या फाट्यावर थांबत नाही. तसेच आडणरी बस शाळेच्या वेळेवर नसल्याने विद्यार्थाना पिंपळखुट्या पर्यंत पायदळ जाण्याची वेळ येते.

यामुळे संतप्त विद्यार्थ्यांनी या त्रासाला कंटाळून आज रस्ता रोको केला. यावेळी शाळेचे 60 ते 70 विद्यार्थी होते. शाळेच्या वेळेत जलद बस असल्यास विद्यार्थ्यांनसाठी थांबवल्या जातील. वेगळी बस नसल्याने येत्या दोन महिन्यात नियोजन केल्या जाईल असे सांगितल्या नंतर विद्यार्थ्यांनी मार्ग सोडला. दोन तास वाहतूक अडवून ठेवल्याने दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागलेल्या पाहायला मिळाल्यात.

हीच परिस्थिती जिल्ह्यातील अनेक ग्रामीण भागात पाहायला आहे. विद्यार्थी शिक्षणाचे धडे घेण्यासाठी पायपीट करतात. एकीकडे बुलेट ट्रेन आणून लांब पल्यांचे अंतर तासांवर आनायचे प्रयत्न आहे. मात्र स्वातंत्राच्या इतक्या वर्षांनंतरही बस मिळावी विद्यार्थ्यांना यासाठी आंदोलन करावे लागत आहे.

Body:पराग ढोबळे,वर्धा.Conclusion:
Last Updated : Aug 10, 2019, 1:23 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.