ETV Bharat / state

थ्रो-बॉलमध्ये नाव गाजवल्यावर दहावीत 99 टक्के गुणांसह वेदांतचा वर्धा जिल्ह्यात पहिला क्रमांक

वर्धा जिल्ह्यात दहावीच्या परीक्षेसाठी 289 शाळांमधीन 16 हजार 871 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी फॉर्म भरले. त्यातील 15 हजार 419 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात प्रावीण्य प्राप्त श्रेणीमध्ये 4209 विद्यार्थी, प्रथम श्रेणीमध्ये 5537, द्वितीय श्रेणी मध्ये 4330, तृतीय श्रेणीत 1343 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

vedant talavekar pass by first number from wardha district
वेदांत तळवेकर वर्धा जिल्हा
author img

By

Published : Jul 30, 2020, 4:25 AM IST

वर्धा - बुधवारी राज्यात दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. यात वर्धा जिल्ह्याच्या निकाल 92.10 टक्के लागला असून वेदांत तळवेकर याने 99.40 टक्के गुण मिळवत जिल्ह्यातून पहिला क्रमांक पटकावला आहे. वेदांत वर्ध्याच्या सुशील हिंंमतसिंगका विद्यालयातील विद्यार्थी आहे. त्याला पुढे जाऊन डॉक्टर व्हायचे आहे. वेदांत हा थ्रो बॉलचा राज्यस्तरीय खेळाडू असल्याने त्याला 97 टक्क्यांपर्यंत अपेक्षा होती. मात्र, त्याला 99.40 टक्के गुण मिळाले.

वर्धा जिल्ह्यात दहावीच्या परीक्षेसाठी 289 शाळांमधीन 16 हजार 871 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी फॉर्म भरले. त्यातील 15 हजार 419 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात प्रावीण्य प्राप्त श्रेणीमध्ये 4209 विद्यार्थी, प्रथम श्रेणीमध्ये 5537, द्वितीय श्रेणी मध्ये 4330, तृतीय श्रेणीत 1343 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

सुशील हिंंमतसिंगका विद्यालयातील विद्यार्थी वेदांत तळवेकर याने 99 टक्के गुणांसह जिल्ह्यातून पहिला क्रमांक पटकावला...

हेही वाचा - घरात वडिलांचा मृतदेह असतानाही 'त्याने' दिला पेपर, आज निकाल पाहून आले डोळ्यात पाणी

वेदांत तळवेकर हा जिल्ह्यातून प्रथम आला. पण तो केवळ अभ्यासच करत होता असे नाही. तो नियमित 4 तास अभ्यास शाळा आणि वर्ग सोडून करायचा. मागील वर्षभरापासून त्याने टीव्हीला बाय बाय केले होते. त्याचे आई आणि वडील हे दोघेही शिक्षक आहे. पण वेदांतसाठी त्याची मोठी बहीण आदर्श आहे. त्याला तिच्यासारखे डॉक्टर व्हायचे आहे. अभ्यासाचे आणि यशाचे गमक म्हणजे तरी नियमित सराव हा होता. त्याने खेळलाही प्राधान्य दिले. तो थ्रो बॉलचा राज्यस्तरीय खेळाडू असून अभ्यासतून वेळ काढत खेळातून तो स्वतःला तंदुरुस्त ठेवत असे. दररोज एक तास खेळ तर सुट्टीच्या दिवशी 2 तास खेळत असे.

वर्ध्या जिल्ह्यातील आर्वीच्या विद्यानिकेतन इंग्लिश स्कुलची ऋतुजा विलासराव दाऊतपुरे हिने 98.60 टक्के गुण घेत दुसरा क्रमांक मिळवला आहे. तिला प्रशासकीय सेवेत जायचे आहे. तेच तिसऱ्या क्रमांकावर वर्ध्याच्या अग्रग्रामी शाळेचा ऋषिकेश प्रशांत चौधरी याने 98 टक्के गुण मिळवले आहे. त्याला पुढे अभियंता व्हायचे आहे. जिल्ह्यातील 298 शाळांतील विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. यातील जवळपास 68 शाळांचा निकाल 100 टक्के लागला आहे. मागील वर्षी दहावीचा निकाल हा 65.50 टक्के इतका होता. यंदा निकालात 26.60 टक्क्यांनी वाढ होत 92.10 टक्के वाढ झाली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.