ETV Bharat / state

बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनच्या कमांडिंग ऑफिसर पदी वर्ध्याच्या वैशाली हिवसेची निवड - वैशाली सुरेशचंद्र हिवसे बातमी

आर्वीतील वैशाली सुरेशचंद्र हिवसे यांची बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनच्या कमांडिंग ऑफिसर पदी नियुक्ती करण्यात आली आहे. आतापर्यंतच्या इतिहासात त्यांची पहिल्यांदा महिला कमांडिंग ऑफिसर पदी निवड झाली आहे.

Vaishali Hiwase
वैशाली सुरेशचंद्र हिवसे
author img

By

Published : May 27, 2021, 7:19 PM IST

वर्धा - जिल्ह्याच्या आर्वीतील वैशाली सुरेशचंद्र हिवसे यांची बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनच्या कमांडिंग ऑफिसर पदी नियुक्ती करण्यात आली आहे. आतापर्यंतच्या इतिहासात त्यांची पहिल्यांदा महिला कमांडिंग ऑफिसर पदी निवड झाली आहे. यामुळे महाराष्ट्राचे नाव मोठे झाले आहे. बॉर्डर रोड कन्स्ट्रक्शन कंपनीने (आरसीसी) इंडिया चीन बॉर्डर कनेक्टिव्हिटीची जबाबदारी महिला सशक्तीकरण म्हणून वैशाली हिवसे यांच्या खांद्यावर दिली आहे.

Vaishali Hiwase
वैशाली सुरेशचंद्र हिवसे
  • पहिल्या महिला कमांडिंग ऑफिसर

कोरोनाची महामारी सुरू असताना चीन बॉर्डरच्या रोडचे काम ब्रो(बीआरओ) ने केले आहे. भारताची बॉर्डर ही भारत-चीनला लागून असून, लडाख सेंटरमध्ये आहे. सध्या लद्दाख, जम्मू-कश्मीर, उत्तरांखंड, हिमाचल प्रदेश, अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम या प्रांतात 'ब्रो'चे नियोजित मार्गाचे काम सुरू आहे. तसेच 61 रस्त्यांचे सुनियोजित कामाचे चीन बॉर्डरवरील हे कार्य डिसेंबर 2022 मध्ये ब्रो पूर्ण करणार आहे. त्यासाठी सर्व सोयीसुविधा, यंत्रसामग्रीची व्यवस्था करण्यात आली आहे. या कठीण कामात महिलांचे सशक्तीकरण करण्यासाठी महिलांना पुढाकार देण्याचे कार्य बीआरओकडून असल्याचा संदेश या माध्यमातून देण्यात आला आहे. आधुनिक परिस्थितीत महिला सशक्तीकरणसाठी 'ब्रो'ने पाऊले उचलली असून, महिला अधिकारी चांगल्या पद्धतीने हे आव्हानात्मक कार्य पूर्ण करू शकतात, म्हणून महिलांना जबाबदारी देण्यात आल्याचा असा विश्वास व्यक्त केला असून, ब्रोने ट्विटरवर ही माहिती शेअर केली आहे.

हेही वाचा - १२ वर्षांहून अधिक वयोगटाकरिता कोरोना लस प्रभावी- फायझरची केंद्राला माहिती

बीआरओ ही आर्मीसोबत सलंगणित असून, डिफेन्सच्या अखत्यारीत हा विभाग आहे. चीन बॉर्डरवर बीआरओकडून सध्या बांधकाम चालू आहे. त्याचा पूर्ण कार्यभार आणि त्याची देखरेख वैशालीकडे देण्यात आली आहे.

Vaishali Hiwase
वैशाली सुरेशचंद्र हिवसे
  • वैशाली यांचा परिचय -

वैशाली यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण आर्वी येथील मॉडेल हायस्कूलमध्ये झाले. त्यानंतर येथील नगरपालिकेच्या कनिष्ठ महाविद्यालयात त्यांनी बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. नंतर सेवाग्राम बापूराव देशमुख अभियांत्रिकी महाविद्यालयात सिव्हिल अभियांत्रिकीची पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी नागपुरला रामदेव बाबा कॉलेजमध्ये एमटेक पूर्ण करून यूपीएससीची परीक्षा दिली. त्यानंतर त्यांची निवड बॉर्डर ऑर्गनायझेशनमध्ये झाली.

डिफेन्स आणि आर्मीशी निगडीत दहा वर्षापासून त्या कार्यरत आहेत. त्यांच्या आई मॉडेल हायस्कुल वाठोडा येथे मुख्याध्यापिका होत्या तर त्यांचे वडील येथील कला व वाणिज्य महाविद्यालयात शारीरिक शिक्षक होते. वैशाली यांचा मोठा भाऊ डॉ. सचिन हिवसे हा बाल रोग तज्ज्ञ आहे. त्यांची लहान बहीण नागपूरला हायकोर्टात वकील आहे.

वैशाली हिवसे सिव्हिल कार्यकारी अभियंता आहेत. त्यांनी कारगिल येथेही आव्हानात्मक परिस्थितीत मंतांचे रोड बांधकाम करत आपले कर्तव्य बजावले आहे. त्यांनी दहा हजार फूट उंच डोंगरांवर वळण रस्ते, बोगदे आणि रस्त्यांच्या बांधकामाचे काम आव्हानात्मक कार्य बॉर्डर रोड ऑर्गनिझेशनच्या माध्यमातून पूर्णत्वास नेले आहे. मागील वर्षी बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून बोगदा आंतरिक मार्गची निर्मिती करण्यात आली आहे.

हेही वाचा - यंदाचा आषाढी पालखी सोहळा पंढरपूरला पायी जाणार; वारकरी आणि महाराज मंडळींची भूमिका

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.