ETV Bharat / state

धक्कादायक ! वाळू माफियांकडून वनरक्षकास जाळून मारण्याचा प्रयत्न.... - वनरक्षकास जीवंत जाळण्याचा प्रयत्न

नरक्षकांची दुचाकी घसरल्याने मारेकऱ्यांनी त्यांना लाठ्या काठ्याने मारहाण करत जखमी केले. एवढेच नाही तर ज्वलनशील पदार्थ या वनरक्षकाच्या अंगावर टाकले. मात्र, त्याचा उग्र वास लक्षात येताच मुनेश यांनी आरडा ओरडा करत प्रतिकार केला. यावेळी मुनेश सज्जनच्या मदतीला माधव माने यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी मारेकऱ्यांनी पळ काढला.

घटनास्थळावरील वनरक्षकाचे वाहन
घटनास्थळावरील वनरक्षकाचे वाहन
author img

By

Published : May 21, 2020, 5:06 PM IST

वर्धा - लॉकडाऊन काळातही वाळू माफियांनी जिल्ह्यातील सर्वच घाटांवर उच्छाद मांडला आहे. वर्धा जिल्ह्याच्या वडनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चक्क वनरक्षकाला ज्वलनशील पदार्थ टाकून जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची खळबळजन घटना समोर आली आहे. मात्र, अखेर मरण समोर दिसल्याने आरडाओरडा करत प्रतिकार केल्याने त्या वनरक्षकाचा जीव वाचाला आहे. मुनेश उर्फ मनोज सज्जन असे वनरक्षकांचे नाव आहे.

वनरक्षक मनोज सज्जन आणि माधव माने हे दोघे वन परिक्षेत्रातील वाळू चोरीची माहिती मिळाल्यानंतर कारवाईसाठी घटनास्थळी गेले होते. त्यावेळी त्यांना दहा ब्रास वाळूसाठा आढळून आला. मात्र, पोहचेपर्यंत तेथून सगळेच पसार झाल्याचे समजले. यावेळी नदीपात्रातून वाळू उपसा करून जाणाऱ्या वाहनाची चाकोरी आढळून आली. त्या चाकोरीचा माग काढत वनरक्षक मुनेश हे काही अंतरावर गेले असता, त्यांना वाळू तस्करांची वाहने आढळून आली. मात्र त्यावेळी काही वाळू तस्कर हातात लाठ्या काठ्या घेऊन उभे असल्याचे दिसून आले. त्या तस्करांनी वनरक्षक मुनेशच्या पुढे गाडी आडवी लावून दमदाटी करण्यास सुरुवात केली. त्यावेळी या त्यांनी परिस्थितीचे गांभिर्य ओळखून पळ काढण्याचा प्रयत्न केला.

धक्कादायक ! वाळू माफियांकडून वनरक्षकास जाळून मारण्याचा प्रयत्न....
वन रक्षक

मात्र, वाळू तस्करांनी या वनरक्षक मुनेश यांचा पाठलाग केला. त्याच वेळी वनरक्षकांची दुचाकी घसरल्याने मारेकऱ्यांनी त्यांना लाठ्या काठ्याने मारहाण करत जखमी केले. एवढेच नाही तर ज्वलनशील पदार्थ या वनरक्षकाच्या अंगावर टाकले. मात्र, त्याचा उग्र वास लक्षात येताच मुनेश यांनी आरडा ओरडा करत प्रतिकार केला. यावेळी मुनेश सज्जनच्या मदतीला माधव माने यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी मारेकऱ्यांनी पळ काढला. अखेर घडलेल्या प्रकाराची माहिती वरिष्ठांना देऊन वडनेर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

तक्रारीमध्ये आरोपी बाळू कुबडे, पोहणा, सरपंच नितीन वाघ याने ज्वलनशील पदार्थ टाकून जीवे मारण्याचा केला प्रयत्न केल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच या प्रकरणी अन्य दोन जनांनवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा तपास सुरू असून आरोपींना अटक करण्याची मागणी केली जात आहे.

वाळू माफियांच्या हिमतीत वाढ.....

सध्या नदी काठच्या गावातली काही गावकरी मंडळींना हाताशी धरून वाळू माफियांनी दादागिरी वाढली आहे. सर्व गाव शांत होताच रात्रीच्या अंधारात नद्यांमधील वाळू जेसीबीच्या साह्याने उत्खनन केले जात आहे. याला आर्थिक व्यवहारातून प्रशासकीय यंत्रणेतील काही लाचखोर मदत करत या दादागिरीला खत पाणी घालत आहेत . त्यामुळे यांच्या हिमतीत वाढ झाली आहे. यामुळे भविष्यातील नद्यांपासून उद्भवणारा धोका आणि अश्या घटना टाळण्यासाठी कठोर मोहीम जिल्हाधिकारी यांनी राबवणे गरजेचे असल्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.