ETV Bharat / state

घरफोडी करणाऱ्या अट्टल चोरट्यांचा पर्दाफाश; चौघांना अटक, तीन जण फरार

वर्ध्यातील पोलीस अधीक्षक कार्यलया शेजारी राहणाऱ्या सुनील उमरे यांच्या घरात चोरट्यांनी घरात कुणी नसतांना हात साफ केला होता. यासह शहरात मागील काळात मोठ्या प्रमाणावर घरफोडी करत चोरट्यांनी लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता. यात पोलिसानी पाळत ठेवत काही संशयितांना ताब्यात घेत पोलिसी खाक्या दाखवताच या चोरट्यांनी पाच घरफोडयांची कबुली दिली.

author img

By

Published : Jul 23, 2019, 1:03 PM IST

Updated : Jul 23, 2019, 2:56 PM IST

वर्धा - शहरात गेल्या काही दिवसांत घरफोडीच्या घटना वाढल्या आहेत. अशातच घरफोडी करणाऱ्या एका टोळीचा पोलिसांनी परदाफाश केला आहे. घरात कुणी नसल्याचे पाहून हे चोरटे घरफोडी करत होते. एवढेच नाही, तर पोलीस अधीक्षक कार्यालयाशेजारच्या घरातही चोरी करत या चोरट्यांनी पोलिसांना आव्हन दिले होते.

वर्ध्यातील पोलीस अधीक्षक कार्यलया शेजारी राहणाऱ्या सुनील उमरे यांच्या घरात चोरट्यांनी घरात कुणी नसतांना हात साफ केला होता. यासह शहरात मागील काळात मोठ्या प्रमाणावर घरफोडी करत चोरट्यांनी लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता. यात पोलिसानी पाळत ठेवत काही संशयितांना ताब्यात घेत पोलिसी खाक्या दाखवताच या चोरट्यांनी पाच घरफोडयांची कबुली दिली.

यात नालवाडी येथील बबन चातूरकर, गणेशनगरचे अनुराग बंसल, पोलीस अधीक्षक कार्यलय परिसरातील सुनिल उमरे यांच्यासह भीमनगरचे श्रीरंग वाघमारे, हरिहर नगरचे रुपराव हरगुडे, धंतोली परिसरातील आशिष गाथे, आदी सात चोऱ्याची कबुली या टोळीतील चोरट्यानी दिली.

घरफोडी करणाऱ्या अट्टल चोरट्यांचा पर्दाफाश; चौघांना अटक, तीन जण फरार

पाहिले रेकी, मग घरफोडी -
वर्ध्यात हे चोरटे टोळीने काम करत होते. प्रत्येकाला काम ठरवून दिले जात होते. घरात कोणी नसल्याचे पाहून त्या घरावर सकाळ-दुपार-संध्याकाळ तिन्ही वेळ रेकी करत नजर ठेवली जात. सायंकाळी 9 वाजेनंतर घरात कोणी नसल्यास त्या घरात चोरीचा बेत फिक्स केला जात असे. यात मध्यरात्री घरफोडी केली जाई. यावेळी काही जण घराच्या आजूबाजूला नजर ठेवत असत.

रामा किसन देऊळकर, किसना रमेश राऊत, राजू रामा दांडेकर, मंगेश बाबुलाल गुंजेवार, अशी अट्टल चोरट्याची नावे आहेत. हे सर्व सावंगी मेघे परिसरातील टेकडीवरील एका झोपडपट्टीतील रहिवासी असून त्यांनी सात घरांतून मुद्देमाल लंपास केल्याची कबुली दिली आहे. पोलिसांकडून आणखी चोऱ्या उघडकीस येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यातील तिघे फरार झाले असून शहर पोलीस त्यांचा शोध घेत आहे.
पोलिसानी या चोरट्यांकडून 21 ग्रॅम सोन, 110 ग्रॅम चांदी, तसेच काही रोख रक्कम असा मुद्देमाल जप्त केला आहे.

Intro:Pkg व्हिडिओ FTP सुद्धा केला आहे. इथे न मिळाल्यास कृपया तो घ्यावा ही विनंती.

घरफोडी करणारे अट्टल चोरट्याच्या टोळीला अटक, चौघे अटकेत तिघे फरार

- वर्धा शहर पोलिसांची कारवाई
- पोलिसांना आवाहन देणारे चोरटे
- पोलीस अधीक्षक कार्यालया शेजारच्या घरातील चोरी उघडकीस
- सात जणांची टोळी, चौघांना अटक
वर्धा - वर्धा शहरात मागील काही दिवसात घरफोडीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. यात घरात कोणी नसले हे चोरटे सावज हेरून घरफोड्या करत होते. एवढेच काय पोलीस अधीक्षक कार्यालया शेजारच्या घरात चोरी करत चोरट्यानी पोलीसांना आवाहनच केले होते. अखेर या चोरट्याच्या टोळीला पकडण्यात पोलिसांना यश मिळाले.

वर्ध्यातील पोलीस अधीक्षक कार्यलया शेजारी राहणाऱ्या सुनील उमरे यांच्या घरात चोरट्यानी घरात कोणीच नसतांना हात साफ केले होते. यासह शहरात मागील काळात मोठ्या प्रमाणात घरफोडी करत चोरट्यानी लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता. यात पोलिसानी पाळत ठेवत काही संशयितांना ताब्यात घेत पोलिसी खाक्या दाखवल्या असत्या चोरट्यानी पाच घरफोडयांची कबुली दिली.

यात नालवाडी येथील बबन चातुरकर, गणेशनगरचे अनुराग बंसल, पोलीस अधीक्षक कार्यलया परिसरातील सुनिल उमरे यांच्यासह भीमनगरचे श्रीरंग वाघमारे, हरिहर नगरचे रुपराव हरगुडे, धंतोली परिसरातील आशिष गाथे, देशोन्नती वृत्तपत्र कार्यालयातील अश्या सात चोऱ्याची कबुली या टोळीतील चोरट्यानी दिली.

चोरीचा मोडस, पाहिले रेकी मग घरफोडी

वर्ध्यात हे चोरटे टोळीने काम करत होते. प्रत्येकाला काम ठरवून दिले जात होते. घरात कोणी नसल्याचे पाहून त्या घरावर सकाळ दुपार संध्याकाळ तिन्ही वेळ रेकी करत नजर ठेवली जात. सायंकाळी 9 वाजेनंतर घरात कोणी नसल्यास त्या घरात चोरीचा बेत फिक्स केला जात असे. यात मध्यरात्री घरात घुसत.. काही घराच्या आजूबाजूला नजर ठेवत. तर कुलूप दार तोडफोड करणारा तो घरात घुसून मुद्देमाल चोरून अनंत अश्या पद्धतीने अतिशय नियोजन पद्धतीने चोरटे काम करत.

रामा किसन देऊळकर, किसना रमेश राऊत राजू रामा दांडेकर, मंगेश बाबुलाल गुंजेवार अशी अट्टल चोरट्याचे नाव असून सर्व सावंगी मेघे परिसरातील टेकडीवरील वडार झोपडपट्टीचे रहवासी असून त्यांनी यात सात घरांत मुद्देमाल लंपास केल्याची कबुली दिली असून आणखी चोऱ्या उघडकीस येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यातील तिघे फरार झाले असून शहर पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहे.

पोलिसानी या चोरट्यांकडून 21 ग्रॅम सोनं 110 ग्रॅम चांदी तसेच काही रोख रक्कम असा मुद्देमाल त्यांच्याकडून परत मिळवण्यात आला. ही कारवाई शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक योगेश पारधी यांच्या मार्गदर्शनात साह्यक पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय ठोंबरे, बोरकुटे, लोणकर, पाठक, पंचभाई, इंगोले, धुर्वे, मंगेश, महादेव सानप, चव्हाण, राठोड, वासेकर, काळे, देवघरे, मुंडे, रितेश, दीक्षित, घुगे, मेंढे, इंगळे यांनी केलेली आहे.
Body:पराग ढोबळे, वर्धा.Conclusion:
Last Updated : Jul 23, 2019, 2:56 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.