ETV Bharat / state

वर्ध्यातील पंचायत समित्यांच्या सभापतीपदांचे आरक्षण जाहीर, कारंजा पंचायत समितीसाठी पुन्हा सोडत होणार? - पंचायत समित्यांच्या सभापती पदांचे आरक्षण जाहीर

कारंजा पंचायत समितीमध्ये अनुसूचित जमातीची महिला सदस्यच नसल्याने याठिकाणी पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन याठिकाणी पुन्हा आरक्षण सोडत काढणार का हे लवकरच स्पष्ट होईल.

wardha
वर्ध्यातील पंचायत समित्यांच्या सभापती पदांचे आरक्षण जाहीर, कारंजा पंचायत समितीसाठी पुन्हा सोडत होणार?
author img

By

Published : Dec 18, 2019, 8:01 AM IST

वर्धा - जिल्ह्यातील आठही पंचायत समितीच्या सभापतीपदासाठी आरक्षण सोडत काढण्यात आली आहे. कारंजा पंचायत समितीसाठी अनुसूचीत जमाती महिलेसाठी आरक्षण जाहीर झाले आहे. परंतू कारंजा पंचायत समितीत अनुसूचित जमातीची महिला सदस्य नसल्याचे समोर आल्यावर याठिकाणी पुन्हा सोडत काढली जाणार का याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. या सर्व सोडती प्रभारी जिल्हाधिकारी अशोक लटारे यांच्या अध्यक्षतेखाली काढण्यात आल्या.

वर्ध्यातील पंचायत समित्यांच्या सभापती पदांचे आरक्षण जाहीर, कारंजा पंचायत समितीसाठी पुन्हा सोडत होणार?

हेही वाचा - वर्ध्यातून निवडणूक लढवण्याची सुप्रिया सुळेंची इच्छा

मंगळवारी जिल्ह्यातील आर्वी, आष्टी, कारंजा, देवळी, वर्धा, सेलू, हिंगणघाट आणि समुद्रपूर पंचायत समितीच्या सभापातीपदाची आरक्षणाची सोडत जाहीर करण्यात आली. वर्धा आणि सेलू पंचायत समिती सभापतीपद सर्वसाधारण वर्गासाठी राखीव ठेवण्यात आले आहे. देवळी पंचायत समितीसाठी मागास प्रवर्गा महिलेसाठी आरक्षण जाहीर झाले आहे. हिंगणघाट आणि समुद्रपूर पंचायत समितीत सर्वसाधारण महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहे. आर्वी पंचायत समितीचे सभापती पद मागासप्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आले आहे. तर आष्टी पंचायत समितीसाठी अनुसूचित जातीसाठी तर कारंजा पंचायत समिती सभापतीपद अनुसूचित जमाती महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहे.

हेही वाचा - बिबट्या शिकार प्रकरण: आरोपींची संख्या ११ वर, जादू-टोण्यासाठी शिकार झाल्याची चर्चा

कारंजा पंचायत समितीमध्ये अनुसूचित जमातीची महिला सदस्यच नसल्याने याठीकाणी पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन याठिकाणी पुन्हा आरक्षण सोडत काढणार का हे लवकरच स्पष्ट होईल. जाहीर झालेल्या आरक्षण आठ पैकी चार सभापतीपदी महिला बसणार आहेत. त्यामुळे आता बहुमत असलेल्या पक्षांतून लॉबिंग सुरू झाले आहे.

Intro:mh_war_panchaayat_samiti_aarakshan_7204321

पंचायत समिती सभापती पदाचे आरक्षण जाहीर, कारंजाससाठी होणार पुन्हा सोडत?

वर्धा - वर्ध्यातील आठही पंचायत समितीच्या सभापती पदासाठी आरक्षण सोडत काढण्यात आली. यात आठही पंचायत समितीचा समावेश आहे. असे असले तरी कारंजात निघालेले आरक्षण पाहता अनुसूचीत जमाती महिलेसाठी आरक्षण काढण्यात आले. पण प्रत्यक्षात अनुसूचित जमातीची महिला नसल्याचे जेव्हा कळले तेव्हा मात्र प्रश्न निर्माण झाला आहे. ही सोडत प्रभारी जिल्हाधिकारी अशोक लटारे यांच्या अध्यक्षेत काढण्यात आली आहे. यामुळे कारंजा साठी पुन्हा सोडत काढणार की काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागले आहे.

आज जिल्ह्यातील आठही पंचायत समिती ज्यामध्ये आर्वी आष्टी कारंजा, देवळी वर्धा सेलू हिंगणघाट समुद्रपूर या पंचायत समिती आहे. याच पंचायत समितीच्या सभापातीचा आरक्षण जाहीर करण्यासाठी सोडत काढण्यात आली. यात वर्धा आणि सेलू पंचायत समितीच्या सभापती पद सर्वसाधारण वर्गासाठी राखीव ठेवण्यात आले आहे. देवळी पंचायत समितीचे पदी महिलां महिला सदस्याला मागास प्रवर्गाकरिता आरक्षण जाजीर झाले. हिंगणघाट आणि समुद्रपूर पंचायत समितीत सर्वसाधारण महिलासाठी राखीव ठेवण्यात आले आहे. आर्वी पंचायत समितीचे सभापती पद मागासप्रवर्गाकरिता आरक्षित झाले. तेच आष्टी पंचायत समितीसाठी अनुसूचित जातीसाठी तर कारंजा पंचायत समिती सभापतीपद अनुसूचित जमाती महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहे. पण प्रत्यक्षात कारंजात अनुसूचित जमातीच्या महिला सदस्यच नसल्याने नवीन पेच निर्माण झाला. आरक्षण जाहीर झाल्यानंतर नवीन पेच निमार्ण झाला आहे. यामुळे जिल्हा प्रशासन याला सोडवण्यासाठी कुठले पाऊल उचलतील की पुन्हा सोडत काढतील हे लवकरच स्पष्ट होईल.

आज काहिर झालेल्या आरक्षणात पाहता आठ पैकी चार सभापतीपदांची माळ महिलांच्या गळ्यात पडणार आहे. यामुळे त्या त्या प्रवर्गात निवडणून आलेल्या महिला सदस्यांच्या पती देवांची बहुमत असलेल्या पक्षांतून लॉबिंग सुरू झाले आहे. जिथे आरक्षित प्रवर्गातून एक असेल तिथली जागा वगळता यात रस्सीखेच पाहायला मिळणार आहे.

Body:पराग ढोबळे, वर्धा.
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.