ETV Bharat / state

वर्ध्यात बरसल्या पावसाच्या सरी; दुबार पेरणीच्या संकटाने दमदार पावसाची प्रतीक्षा

वर्धा जिल्ह्यातील काही तालुक्यात तसेच शहरात शुक्रवारी पावसाचे आगमन झाले. या पावसाचा आनंद अनेकांनी लुटल्याचे चित्र पाहायला मिळाले. मात्र, शेतकऱ्यांना पाहिजे त्या प्रमाणात पाऊस न झाल्याने प्रतिक्षाच करावी लागणार आहे.

author img

By

Published : Jun 29, 2019, 1:56 AM IST

वर्ध्यात बरसल्या पावसाच्या सरी

वर्धा - जिल्ह्यातील काही तालुक्यात तसेच शहरात शुक्रवारी पावसाचे आगमन झाले. शहरात २२ जूनला केवळ १० मिनिट झालेल्या पावसानंतर तब्बल ६ दिवसांनी आज वर्धेकरांना पावसाचे दर्शन झाले.

वर्ध्यात बरसल्या पावसाच्या सरी

यावर्षी पाऊस लांबलाच नाही तर हुलकावणी सुद्धा देत आहे. वर्ध्यात सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. मात्र, पावसाचा दिवसभर पत्ताच लागला नाही. उलट अधून मधून सूर्यदेव तापताना दिसला. अखेर दिवसाच्या शेवटी वर्ध्यासह सेलू समुद्रपूर, पुलगाव देवळी तालुक्यात पाऊस झाला. या पावसाचा आनंद अनेकांनी लुटला. मात्र, शेतकऱ्यांना पाहिजे त्या प्रमाणात पाऊस न झाल्याने प्रतिक्षाच करावी लागणार आहे.

वर्धा जिल्ह्यात जून महिन्यातील पावसाची सरासरी १७१ मिमी इतकी आहे. पण यंदा पाऊस लांबल्याने सरासरीच्या केवळ ३४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. जून महिना संपायला आला तरी पावसाच्या सरासरीत तब्बल १३७ मिमी घट झाली आहे.

२१ ते २२ जूनच्या दरम्यान सक्रिय पाऊस होणार असा अंदाज देण्यात आला. एकीकडे कपाशीच्या पेरणीची वेळ निघून जात होती. तर अनेक शेतकऱ्यांनी धूळ पेरणी केली आहे. आता मात्र लांबलेल्या पावसाने जिल्ह्यात दुबार पेरणीची संकट ओढवले आहे. जून महिन्यातील सरासरी भरून काढण्यासाठी चांगल्या पावसाची गरज आहे. तेच लांबलेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर घातली आहे.

Intro:वर्ध्यात बरसल्या पावसाच्या सरी, दुबार पेरणीचे संकटाने दमदार पावसाची प्रतीक्षा
व्हिजवलला व्हॉइस ओव्हर केला आहे.

पाऊस लांबलाच नाही तर हुलकावणी सुद्धा देत आहे. वर्ध्यात सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. मात्र पावसाचा दिवसभर पत्ताच लागला नाही. उलट अधून मधून सूर्यदेव तापताना दिसला. अखेर दिवसाच्या शेवटी वर्धा शहरासह जिल्ह्यातील काही तालुक्यात पावसाचे आगमन झाले. शहरात 22 जुनला केवळ 10 मिनिट झालेल्या पावसानंतर तब्बल सहा दिवसांनी आज वर्धेकराना पावसाचे दर्शन झाले.

या पावसाचा आनंद अनेकांनी लुटल्याचे चित्र शहरात पाहायला मिळाले. वर्ध्यासह सेलू समुद्रपूर, पुलगाव देवळी तालुक्यात पाऊस झाला. अनेकांनी ओले होते पावसाचा आनंद लुटलाय. मात्र शेतकऱ्यांना पाहिजे त्या प्रमाणात पाऊस न झाल्याने प्रतिक्षाच करावी लागणार आहे.

वर्धा जिल्ह्यात जून महिन्यातील पावसाची सरासरी 171 मिमी इतकी आहे. पण यंदा पाऊस लांबल्याने सरासरीच्या केवळ 34 मिमी पावसाची नोंद झाली आहे. जून महिना संपायला आलाय. तरी पावसाच्या सरासरीत तब्बल 137 मिमी घट झाली आहे.

21 ते 22 जूनच्या दरम्यान मान्सून सक्रिय पाऊस सक्रिय होणार असा अंदाज दिला. एकीकडे कपाशीच्या पेरणीची वेळ निघून जात होती. तेच अनेक शेतकऱ्यांनी धूळ पेरणी केली आहे. आता मात्र लांबलेल्या पावसाने जिल्ह्यात दुबार पेरणीची संकट ओढवले आहे. जून महिन्यातील सरासरी भरून काढण्यासाठी चांगल्या पावसाची गरज आहे. तेच लांबलेल्या पावसाने शेतकर्यांच्या चिंतेत भर घातली आहे.Body:पराग ढोबळे,वर्धा.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.