नवी दिल्ली : भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील दुसऱ्या टी-20 सामन्यात भारतानं शानदार विजय मिळवला आहे. या विजयासह टीम इंडियाने 3 सामन्यांच्या मालिकेवरही कब्जा केला. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघानं रिंकू आणि नितीश रेड्डी यांच्या अर्धशतकांच्या जोरावर 222 धावांची मोठी धावसंख्या उभारली, प्रत्युत्तरात बांगलादेशला केवळ 135 धावा करता आल्या.
सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने चमकदार कामगिरी करत दुसरा टी-20 सामनाही जिंकला. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर बुधवारी झालेल्या सामन्यात भारताने ८६ धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारतीय संघाने ३ टी-20 सामन्यांची मालिका २-० अशी जिंकली आहे.
𝗖.𝗛.𝗔.𝗠.𝗣.𝗜.𝗢.𝗡.𝗦 🏆#TeamIndia 🇮🇳 HAVE DONE IT! 🔝👏
— BCCI (@BCCI) June 29, 2024
ICC Men's T20 World Cup 2024 Champions 😍#T20WorldCup | #SAvIND pic.twitter.com/WfLkzqvs6o
भारतीय संघाने घरच्या मैदानावरील बांगलादेशविरुद्ध ३ टी-20 सामन्यांची मालिका २-० ने जिंकली आहे. दोन्ही संघांमधील मालिकेतील दुसरा सामना बुधवारी (९ ऑक्टोबर) दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर खेळला गेला. भारतीय संघाने हा सामना ८६ धावांनी जिंकला.
या सामन्याचाच हिरो नितीश रेड्डी आणि रिंकू सिंग हे फलंदाज होते, ज्यांनी स्फोटक शैलीत अर्धशतक ठोकले. यामुळे भारतीय संघानं बांगलादेशसमोर २२२ धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. यानंतर गोलंदाजांनी बांगलादेशी फलंदाजांना रडवले आणि संपूर्ण संघ ९ गड्यांच्या मोबदल्यात १३५ धावाच करू शकला.