ETV Bharat / state

हिंगणघाट जळीतकांड : सरकारी वकील उज्वल निकम न्यायालयात दाखल

author img

By

Published : Dec 14, 2020, 12:11 PM IST

Updated : Dec 14, 2020, 12:47 PM IST

हिंगणघाट जळीतकांड प्रकरणाची आज सुनावणी पार पडणार आहे. या प्रकरणात पीडितेची बाजू मांडण्यासाठी सरकारी वकील उज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आज सुनावणीसाठी अॅड. निकम जिल्हा सत्र न्यायालयात पोहोचले आहेत.

हिंगणघाट जळीतकांड प्रकरण
हिंगणघाट जळीतकांड : सरकारी वकील उज्वल निकम न्यायालयात दाखल

वर्धा - हिंगणघाट जळीतकांड प्रकरणाची आज सुनावणी पार पडणार आहे. या प्रकरणात पीडितेची बाजू मांडण्यासाठी सरकारी वकील उज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आज सुनावणीसाठी अॅड. निकम जिल्हा सत्र न्यायालयात पोहोचले आहेत. कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी न्यायालय परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात आहे. या सुनावणीसाठी आरोपी देखील न्यायालयात हजर राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

हिंगणघाट येथे 3 फेब्रुवारी 2020 रोजी घडलेल्या जळीत प्रकरणाचे कामकाज अखेर सुरू होणार आहे. यासाठी सरकारी वकील उज्वल निकम यांची निवड झाली असून ते आज हिंगणघाट येथील न्यायालयात हजर होणार आहेत. या प्रकरणातील आरोपी विकेश उर्फ विक्की नगराळे सध्या नागपूर कारागृहात आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी संबंधित प्रकरणाचा निकाल तीन महिन्यात लावणार असल्याचे आश्वासन दिले होते. कोरोनामुळे न्यायालयीन प्रक्रिया खोळंबली होती. अखेर आजपासून या प्रकरणावर सुनावणी सुरू होणार आहे.

वर्धा पोलिसांनी 28 फेब्रुवारीला 426 पानांचे आरोपपत्र न्यायालयात दाखल केले होते. या घटनेनंतर 26 दिवसात तर कार्यालयीन कामकाजाच्या अवघ्या 19 दिवसात पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले. सुरुवातीच्या काळात सुरक्षेच्या दृष्टीकोनातून फास्ट ट्रॅक कोर्टाची उपलब्धता करण्यासंबंधी अर्ज करण्यात आले होते. मात्र अद्याप त्याची परवानगी न मिळाल्याने हिंगणघाट येथे संबंधित प्रकरणाची सुनावणी होणार आहे.

हिंगणघाट जळीतकांड प्रकरण

वर्ध्यातील हिंगणघाट येथे नांदोरी चौकात सोमवारी (3 फेब्रुवारी) प्राध्यापिकेला पेट्रोल टाकून जाळण्यात आले होते. यामध्ये ती 40 टक्के भाजली होती. तसेच तिचा चेहरा, श्वसननलिका पूर्णपणे जळाली होती. तिच्यावर नागपुरातील ऑरेंज सिटी रुग्णालयात उपचार सुरू होते. अखेर आठव्या दिवशी तिची मृत्यूशी झुंज संपली.

हिंगणघाट येथे 3 फेब्रुवारीला सकाळी साडेसात वाजता ही घटना घडली होती. त्यानंतर परिसरातील नागरिकांनी तत्काळ तिला रुग्णालयात हलवले. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. ठिकठिकाणी मोर्चे काढून पीडितेला न्याय देण्याची मागणी देखील करण्यात आली. हिंगणघाट आणि वर्ध्यामध्ये कडकडीत बंद देखील पाळण्यात आला होता.

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या घटनेची दखल घेत तिच्यावर उपचार करण्यासाठी मुंबईवरून डॉक्टर बोलवले होते. सोमवारपासून तिच्यावर उपचार सुरू होते. शनिवारी तिला व्हेंटिलेटरवर देखील ठेवण्यात आले. मात्र, सोमवारी पहाटे साडेचारच्या सुमारास तिला हृदयविकाराचा झटका आला. त्यामुळे सकाळी 6 वाजून 55 मिनिटांनी पीडितेचा मृत्यू झाला.

Last Updated : Dec 14, 2020, 12:47 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.