वर्धा - दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात(जेएनयू) झालेल्या हिंसाचाराचे देशभर पडसाद उमटत आहेत. वर्ध्यातील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठातील विद्यार्थ्यांनीही दिल्लीतील घटनेचा निषेध केला. विद्यापीठातील गांधी हिल्सपासून विद्यापीठाच्या प्रवेशद्वारापर्यंत विद्यार्थ्यांनी हिंसाचाराच्या विरोधात मोर्चा काढला.
या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते. जेएनयूमध्ये हल्ला झाला तेव्हा पोलीस उशीरा दाखल झाले. मारहाण करणाऱ्या गुंडांना आतमध्ये सोडणाऱ्या सुरक्षा रक्षकांवर कारावाई होणार का? असा सवाल वर्ध्यातील विद्यार्थ्यांनी उपस्थित केला.
हेही वाचा - ''असहिष्णुतेच्या मुद्द्यावर योग्य होते आमिर आणि शाहरुख''
केंद्र सरकार उच्च शैक्षणिक संस्थानचे खासगीकरण करण्याच्या मागे आहे. डाव्या विचार सरणीला उघडपणे दाबण्याचा प्रयत्न होत आहे. विद्यापीठात होणारे हल्ले हे जेएनयू प्रशासनाचे अपयश आहे, असा तीव्र निषेध विद्यार्थ्यांनी व्यक्त केला.