ETV Bharat / state

ETV BHARAT Special : कापड गांधींच्या जन्मभूमीतून तर पीपीई की़टची निर्मिती कर्मभूमीत.. - सेवाग्राम वर्धा न्यूज

वाढती पीपीई किटची मागणी ही मोठी समस्या निर्माण होताना दिसून येत आहे. महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्थेच्या मायक्रोबायोलॉजी विभागाने नवीन संशोधन केले आहे. अगदी कमी खर्चात रियुज करणारे गाऊन तयार करण्यात त्यांना यश मिळाले आहे.

Production of PPE kit in Gandhi's Sevagram in wardha
सेवाग्राममध्ये पीपीई की़टची निर्मिती
author img

By

Published : Jun 19, 2020, 8:28 PM IST

Updated : Jun 19, 2020, 9:46 PM IST

वर्धा - कोरोनामुळे सर्वत्र भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. आरोग्य क्षेत्रात कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून, पीपीई किटचा उपयोग केला जात आहे. पण वाढती पीपीई किटची मागणी ही मोठी समस्या निर्माण होताना दिसून येत आहे. महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्थेच्या मायक्रोबायोलॉजी विभागाने नवीन संशोधन केले आहे. अगदी कमी खर्चात रियुज करणारे गाऊन तयार करण्यात त्यांना यश मिळाले आहे. कसा आहे हा गाऊन, हा गाऊन पीपीई किटला पर्याय ठरू शकेल, चला तर पाहुयात हा खास रिपोर्ट....

कापड गांधींच्या जन्मभूमीतून तर पीपीई की़टची निर्मिती कर्मभूमीत..
कोविडचे संकट असेपर्यंत पीपीई किटची प्रचंड मागणी वाढणार आहे. त्या प्रमाणात पुरवठा करणे आथिर्कदृष्ट्या महाग पडणार आहे. म्हणून त्यावर पर्याय शोधण्यासाठी रीयुज पीपीई किट बनवण्यासाठी संशोधन सुरू आहे. महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्थेकडून आत्मनिर्भरतेचा संदेश देत मायक्रोबायोलॉजी विभागाचे प्रोफेसर डॉ. राहुल नारंग यांनी डीआरडीओ संस्थेच्या मदतीने संशोधन सुरू केले आहे. पीपीई किटला पर्याय ठरेल असा संशोधन करण्यात येणार आहे.यासाठी डिफेन्स रीसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन(DRDO) या संस्थेसोबत चर्चा करून पर्याय शोधण्यात आला. यासाठी असा कपडा पाहिजे होता जो वाटरप्रूफ असेल. यासोबत तो जास्त वजनी नसावा. यासह इतर मेडिकल साहित्य निर्जंतुकीकरण करता यावा हाही प्रश्न होता. गुजरातच्या सुरतमधून आलेल्या कपड्यात काय खास....डीआरडीओ यांच्याशी चर्चा करण्यात आली. तेव्हा सुरतमधील एका व्यापाऱ्याने पॉलिस्टर त्याला पॉलीयुरेथिनचा कपडा अवघा 100 रुपये मीटर प्रमाणे 6 मीटर कपडा मागवण्यात आला. त्यावर निरनिराळे परीक्षण करून वाटरप्रूफ यासह त्याला निर्जंतुकीकरण करण्यासाठी एच2ओ, हायप्रोक्लोराईड, हायड्रोजन पॅरॉकसाईड, अल्कोहोल, हिट, बॉईल, आणि ऑटोक्लेविंग करण्यात आले. या सर्वात यश मिळाले मात्र फिनॉलमध्ये कपड्याची लेअर खराब करण्यात झाला.वजनाला हलका किमतीला स्वस्त आणि 20 वेळा रियुजेवबल....हा गाऊन बनवताना 100 रुपये मीटर प्रमाणे कपड्यासाठी किमंत मोजावी लागली. हा कपडा अतिशय हलका असून गाऊन हा अंदाजे 100 ते 200 ग्रॅमपर्यंत वजन आहे. यात सुरूवातीला गाऊन बनवून शिवताना केवळ 250 रुपये खर्च आला. यावेळी नव्याने 60 मीटर कपडा बोलावण्यात आले असून, त्याचे पीपीई किट बनवणार आहे. पीपीई किट बनवताना शिवण्याचा खर्च वाढणार आहे. पण हा कपडा रियुजेबाल असल्याने साधारण 20 वेळा वापरला जाऊ शकणार आहे. यामुळे नव्याने याची किंमत 600 रुपये असली आणि त्याला कोविड वार्डमध्ये 10 वेळा रीयुज करता आला तर याचा खर्च अवघा 60 रुपये इतका असणार आहे. आज बाजारात उपलब्ध असलेल्या किट साधारण 1 हजारापेक्षा जास्त असणार आहेत.यासोबत असणारा डोळ्यांचा चष्मासुद्धा चांगल्या प्रतीचा असल्यास तोसुद्धा रीयुज होईल. डोक्यावर असणारी कॅपसुद्धा याच कपड्यापासून तयार होणार आहे. N95 मास्क हे सुद्धा पुन्हा निर्जंतुकीकरण पुन्हा वापरता येणार असल्याचेही ते सांगतात. पीपीई किटमध्ये होणाऱ्या उष्णतेपासून खादीने दिली मुक्ती कुठलाही पीपीई किट असो यामुळे मोठ्या प्रमाणात उष्णता वाढून किंवा गरम वातावरण असणाऱ्या भागात घामाने त्रास होत होता. पण आता मात्र यावर आत्मनिर्भर आणि स्वलांबनाचा धडा देणारी खादीचा महत्वाचा वाटा राहिला. आजही खादीपासून रुग्णालातील कापडी मास्क आणि गाऊन तयार होतात. याच खादीची बंडी तयार करण्यात आली. त्या बंडीला सहा पॉकेट शिवण्यात आले. यात आईस जेल पॉकेट ठेवून आतमध्ये तापमान कमी करण्यात यश आले आहे.भविष्यात या गाऊन किंवा किटला परिक्षणातून परवानगी मिळण्यास अडचण आली तरी हा किट रिसर्च लॅबमध्ये, रेडिओलॉजी किंवा अन्य आरोग्य विभागातील कामात नक्कीच उपयोगी पडणार आहे. हा रीयुज असणारा किट महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्थेच्या मायक्रोबायोलॉजी लॅबकडून मिळालेली मोठी भेट असणार आहे. कारण ही संस्था शिक्षण आणि संशोधनाचे कार्य करणार असल्याने त्याला पेटंट न करता देश सेवा म्हणून सोपवणार आहे. यात व्यवसायीक उपयोग करणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. या संशोधनात महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्थेचे अधिष्ठाता डॉ. नितीन गगने यांच्या मार्गदर्शनाखाली मायक्रोबायोलॉजीचे प्रोफेसर डॉ. राहुल नारंग याच्या नेतृत्वात विभाग प्रमुख डॉ. विजयश्री देवतळे, असिस्टंट प्रोफेसर डॉ. रुचिता अट्टल लोहिया, प्रोजेक्ट्स स्टाफ प्रियंका शहाणे कापसे, मीनाक्षी शहाणे, अंजली पातोंड, देवाश्री शहा, दिपाश्री मरसकोल्हे, टेंक्निकल असिस्टंट रमेश खाजोने आणि अटेंडन्ट राजीक शेख यांनी मागील तीन महिन्याचा कालावधित मोठ्या प्रमाणात परिश्रम घेतले आहे.

Last Updated : Jun 19, 2020, 9:46 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.