ETV Bharat / state

वर्ध्यात प्रहारने कृषी अधीक्षकांच्या खुर्चीला सोयाबीन रोपांसह दिले निवेदन - वर्धा प्रहार बातमी

वर्धा जिल्ह्यातील सोयाबिनच्या पिकाची पाने पिवळी पडत आहेत. तसेच पिकाची वाढ खुंटल्याने नुकसान होण्याची शक्यता आहे. यामुळे प्रहारकडून कृषी अधीक्षकांना देण्यात येणार होते. मात्र, अधीक्षक जागेवर नसल्याने पक्षाकडून अधीक्षकांच्या टेबल-खुर्चीला निवेदन देण्यात आले. तसेच टेबल-खुर्चीवर सोयाबीनची रोपे ठेवली.

wardha
कृषी अधीक्षकांच्या टेबल-खुर्चीवर ठेवलेले निवेदन व सोयाबीनचे रोप
author img

By

Published : Aug 25, 2020, 9:45 PM IST

वर्धा - यंदा सोयाबीनच्या पिकाची पाने पिवळी पडायला सुरवात झाली आहे. यामुळे पिकाचे नुकसान होऊन उत्पादन घटण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. यामुळे याचे तात्काळ सर्वेक्षण करण्याची मागणी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. यासाठी जिल्हा कृषी अधीक्षक हे कार्यालयात नसल्याने त्यांच्या खुर्चीला निवेदन देत चार दिवसांत पंचनामा करण्याची मागणी केली आहे. कृषी अधीक्षक कार्यालयात नसल्याने सोयाबीनचे रोप त्यांच्या टेबल-खुर्चीवर टाकण्यात आले होते.

जिल्ह्यातील अनेक भागात सोयाबीनची पाने पिवळी होत आहेत. यामुळे सोयाबीनच्या शेंगा भरत नाही. यासह पिकांची वाढ खुंटली असून यामुळे आर्थीक फटका बसण्याची शक्यता आहेत. अगोदरच दुबार पेरणीच्या संकटातून बाहेर शेतकऱ्यांनी पडत पीक जगविले असताना. आता भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे होणारे नुकसान पाहता कृषी विभागाकडून तात्काळ पंचनामे व्हावे. या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे विदर्भ प्रमुख गजु कुबडे यांच्या नेतृत्वात पक्षाने जिल्हा कृषी अधीक्षक अनिल इंगळे यांच्या कार्यलयात जाऊन परिस्थिती दाखवण्यासाठी झाडे घेऊन गेले. मात्र, कृषी अधीक्षक नसल्याने त्याचा खुर्चीवर सोयाबीनचे झाडे ठेवून निवेदन देण्यात आले.

सध्या जिल्ह्यातील अनेक भागात मध्यंतरी पावसाचा खंड आणि ढगाळ वतावरणामुळे हा बदल झाला आहे. यात ऊन पडून वातावरणात बदल न झाल्यास त्याचा परिणाम उत्पादनावर होणार आहे. ही परिस्थिती वरिष्ठ पातळीवर कळवण्यात आली असून पुढील आदेशानुसार उपाययोजना केली जाणार असल्याचे जिल्हा कृषी अधीक्षक अनिल इंगळे यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले.

शेतकरी सध्या मेटाकुटीला आला आहे. यामुळे नुकसान सहन करण्याची ताकद संपली आहे. यासाठी या नुकसानीचे पंचांनामे करण्याची मागणीचे निवेदन देण्यात आले आहे. यावर कृषी विभागाने परिस्थिती समजून घेत अमरावती जिल्ह्यात ज्याप्रमाणे सर्वेक्षण झाले. त्याच पद्धतीने सर्वेक्षण करत शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी, अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे विदर्भ प्रमुख गजू कुबडे यांनी ईटीव्ही भारत सोबत बोलताना सांगितले.

हेही वाचा - वर्ध्यात युवक काँग्रेसचे विनापरवानगी 'रोजगार दो आंदोलन', पोलिसांनी परवानगी नाकारल्याने वातावरण तापले

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.