ETV Bharat / state

ड्युटीवर असताना पोलीस कर्मचाऱ्याचा हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू - blood pressure

सिंदी रेल्वे पोलीस स्टेशन येथे कार्यरत असणाऱ्या मुन्ना उर्फ अनिल पांडे यांचा सोमवारी हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.

मुन्ना उर्फ अनिल हिरालाल पांडे
author img

By

Published : Jun 17, 2019, 6:34 PM IST

वर्धा - सिंदी रेल्वे पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी मुन्ना उर्फ अनिल हिरालाल पांडे (५१) यांचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. सोमवारी सकाळपासून त्यांना रक्तदाबाचा त्रास जाणवत होता. प्राथमिक उपचारानंतर कर्तव्यावर असताना त्यांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

सिंदी रेल्वे पोलीस स्टेशन येथे कार्यरत पोलीस कर्मचाऱ्याचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू

पोलीस कर्मचारी मुन्ना उर्फ अनिल पांडे हे मागील तीन वर्षांपासून सिंदी रेल्वे पोलीस स्टेशनला कार्यरत होते. सोमवारी सकाळी एका गुन्ह्यातील आरोपीची मेडिकल तपासणीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात गेले होते. दरम्यान पोलीस कर्मचारी पांडे यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांनी सुद्धा डॉक्टरकडून रक्तदाब तपासून घेतला. त्यात रक्तदाबवाढल्याचे लक्षात आल्याने त्यांनी तिथेच डॉक्टरांकडून औषधोपचार करून घेतला आणि परत कर्त्यव्यावर रुजू झाले. त्यांनतर आरोपीला सेलू येथील न्यायालयात पेशीसाठी घेऊन जायचे होते. यावेळी पांडेंनी पोलीस ठाण्यातच जेवण केले. त्यानंतर ११.३० वाजण्याच्या सुमारास पांडेना छातीत दुखायला लागले. श्वास घ्यायला अडचण होत असल्याने त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र हृदय विकाराच्या झटक्याने पांडे यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

पांडे यांच्या निधनाने पोलीस ठाण्यात शोकाकुल वातावरण पसरले. कुटुंबियांना त्यांच्या मृत्यूची माहिती देण्यात आली. मुन्ना पांडे हे वर्धा येथे राहत असून त्यांच्यामागे पत्नी, दोन मुली असा परिवार आहे.

Intro:कर्त्याव्यावर असतांना पोलीस कर्मचाऱ्याचा हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन

वर्धा - सिंदी रेल्वे पोलीस स्टेशन येथे कार्यरत असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. मुन्ना उर्फ अनिल हिरालाल पांडे वय ५१ असे मृतक कर्मचाऱ्यांचे नाव आहे. सकाळपासून बीपी वाढलेली असतांना प्राथमिक उपचारार नंतर कर्तव्यावर असतांना निधन झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

पोलीस कर्मचारी मुन्ना उर्फ अनिल पांडे हे मागील तीन वर्षांपासून सिंदी रेल्वे पोलीस स्टेशनला कार्यरत होते. आज सकाळी एका गुन्ह्यातील आरोपीची मेडीकल तपासणीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात गेले होते. आरोपीची महिला डॉक्टर वंजारी यांच्याकडून वैद्यकीय तपासणी करण्यात आली. दरम्यान पोलीस कर्मचारी पांडे यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांनीं सुद्धा डॉक्टरकडून बीपी तपासून घेतली. यावेळी पांडे यांचा बीपी वाढलेला दिसून आला. डॉक्टरांनी पांडेचा औषधोपचार केला. त्यानंतर पांडे पुन्हा कर्त्यव्यावर रुजू झाले. आरोपीला पोलीस ठाण्यात नेले. त्यांनतर आरोपीला सेलू येथील न्यायालयात पेशीसाठी घेऊन जायचे होते. यावेळी पांडे यांनी पोलीस ठाण्यातच जेवण केले. त्यानंतर ११.३० वाजताच्या सुमारास पांडे यांना छातीत दुखायला सुरवात झाली. श्वास घ्यायला अडचण होत असल्याने प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र हृदय विकाराचा झटक्याने पांडे यांचा जीव गेला असल्याचे डॉक्टरांनी संगीतले.

पांडे यांच्या निधनाने पोलीस ठाण्यात शोकाकुल वातावरण पसरले. कुटुंबियांना त्यांच्या मृत्यूची माहिती देण्यात आली. पांडे यांचे शवविच्छेदनासाठी पाठविणार असल्याचे पीएसआय भाकडे यांनी सांगितले. मुन्ना पांडे हे वर्धा येथे राहत असून त्यांना पत्नी, दोन मुली असा आप्त परिवार आहे. Body:पराग ढोबळे,वर्धा.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.