वर्धा - राज्यासह जिल्ह्यात सर्वत्र पोळ्याच्या सण साजरा होत असताना आर्वी तालुक्यातील वडगाव पांडे गावात जुगाराचा खेळ चालू होता. या माहितीवरुन आर्वी पोलीस ठाण्यातील दोन कर्मचाऱ्यांनी जुगार खेळणाऱ्यांना हटकले असता त्यांना बेदम मारहाण केल्याची गंभीर घटना घडली आहे. आज दुपारी 1 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. यानंतर जखमी झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांवर उपजिल्हा रुग्णालयात येथे उपचार सुरु आहे. मारोती सिडाम आणि मनिष राठोड अशी जखमी पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत.
वडगाव पांडे गावातील जिल्हा परिषद शाळेसमोर १५ ते २० लोक जुगार खेळत असतांना दिसून आले. यानंतर पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांना हटकले. मात्र, या जुगारींनी खेळ बंद न करता उलट कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण केली. यामध्ये त्यांनी लाठी-काठी, दगड, तसेच लाथा-बुक्याने या पोलीस कर्मचाऱ्यांवर हल्ला चढविला. या मारहाणीत हे पोलीस कर्मचारी जखमी झाले. यावेळी मनीष राठोड हे किरकोळ जखमी झाल्याने त्यांना उपचार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले.
हेही वाचा - VIDEO : गाडी आडवी घातल्याच्या वादातून पुण्यात पैलवानांची तरुणाला बेदम मारहाण
तर उपचार करुन सुट्टी देण्यात आली. तर मारोती सिडाम हे गंभीर जखमी झाले. त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्यांना सहा टाके पडले असल्याची माहिती वैदकीय अधिकारी हेमंत पाटील यांनी दिली. तर पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी आर्वी उपजिल्हा रुग्णालयात जाऊन जखमी पोलीस कर्मचाऱयाची विचारपूस केली.
मारहाण कणाऱ्यांमध्ये 10 पेक्षा जास्त लोकांचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे. यावेळी मारहाण करतांना काहींनी व्हिडिओ काढला आल्याचे समजते. हा व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागला आहे. तर नेमके कोण मारहाण करणारे आहेत, याचा शोध घेतला जात आहे. पोलिसांनी या प्रकरणात अद्याप गुन्हा दाखल केलेला नाही. तर काही संशयितांना ताब्यात घेतले असल्याचे सांगितले जात आहे.
हेही वाचा - कल्याणमध्ये 'जय श्रीराम' बोलण्यास टाळणाऱ्या तरुणाला बेदम मारहाण
या प्रकरणात थोड्या वेळातच गुन्हा दाखल होईल. योग्य तपास करण्यात येईल आणि या पोलीस कर्मचाऱ्यांवर हात उचलणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी दिली. तर सध्या जखमी पोलीस कर्मचाऱयाची प्रकृती ठीक असल्याचे सांगण्यात येत आहे.