वर्धा- जिल्ह्यात शुक्रवारी आर्वी उपविभागा अंतर्गत नव्याने एक रुग्ण आढळून आला. यानंतर कोरोनाबाधितांची संख्या 9 वरून 10 झाली आहे. यात गृह विलगिकरणात असलेली ही मुलगी मुंबईच्या अंधेरी भागातून आली असल्याची माहिती मिळते आहे.
ही मुलगी मुंबईच्या अंधेरी परिसरात राहत असून एका खासगी कंपनीत काम करत होती. 14 मे रोजी या मुलीचा भाऊ तिला कारने वर्ध्याला घेऊन आला. यावेळी तिच्यासोबत कोंढाळी येथील मैत्रीण सोबत असल्याची चर्चा आहे. त्यांनतर संपूर्ण कुटुंबाला गृह विलगीकरणात ठेवण्यात आले होते. असे असले तरी काही प्रमाणात ही मुलगी किंवा अन्य कुटुंबीय बाहेर फिरले अशीदेखील माहिती मिळत आहे. तिची प्रकृती बिघडल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने खळबळ निर्माण झाली. तिच्या कुटुंबातील 4 जणांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे.
मुंबईतून वर्ध्यात आलेली युवती कोरोना पॉझिटिव्ह, जिल्ह्यात रुग्णसंख्या 10 वर
जिल्ह्यात एकूण 11 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. यामध्ये वर्धा- 2, वाशिम-1, अमरावती -4, नवी मुबंई-3 आणि गोरखपूर (उत्तरप्रदेश)- 1 येथून परतलेल्या रुग्णांचा समावेश आहे. तर वर्धा येथील एका रुग्णाचा मृत्यू झाल्यामुळे सध्या 10 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.