ETV Bharat / state

परवाना नसलेल्या बंदुकीची गोळी लागून मेव्हणी जखमी, जि.प. सदस्य अटकेत - रामनगर पोलीस

गावठी पिस्तुलात गोळ्या कशा भरतात हे दाखवत असताना अनावधानाने गोळी सुटून वर्धा जि.प. सदस्य उमेश जिंदे यांच्या मेव्हणीला लागली. याप्रकरणी उमेश जिंदे यांना पोलिसांनी अटक केली आहे.

उमेश जिंदे
author img

By

Published : Nov 19, 2019, 9:30 AM IST

Updated : Nov 19, 2019, 10:09 AM IST

वर्धा - गावठी पिस्तुलात गोळ्या कशा भरतात हे दाखवत असताना अनावधानाने गोळी सुटू वर्धा जि.प. सदस्य उमेश जिंदे यांच्या मेव्हणीला लागली. यात जिंदेच्या मेव्हणी निकिता डोईफोडे जखमी झाल्या आहेत. ही घटना रविवार (17 नोव्हे.) रोजी घटली. या घटनेने वर्ध्यातील सिंदी (मेघे) परिसरातल्या गिट्टीफैल भागातील घडलेल्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली होती.

माहिती देताना ठाणेदार

याबाबत सविस्तर वृत्त असे, जिल्हा परिषद सदस्य उमेश जिंदे यांच्या घरी पाहुणचाराला मेव्हणी निकिता डोईफोडे या पती साई डोईफोडेंसह आल्या होत्या. सायंकाळी घरामध्ये उमेश जिंदे आणि त्यांच्या पत्नी रितू जिंदे या डोईफोडे दाम्पत्यांसह गप्पा मारत होते. यावेळी उमेश जिंदे हे त्यांच्या जवळील गावठी पिस्तूल घरातील लोकांना दाखवू लागले. यावेळी या पिस्तुलामध्ये गोळी कशी भरतात हेत दाखवत असताना अनावधानाने गोळी सुटून उमेश जिंदेंच्या मेव्हणी निकिताच्या हातातून पोटात शिरली. त्यानंतर निकितास जखमी अवस्थेत सेवाग्राम रूग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

ही घटना रविवारी रात्री घडली असल्याची चर्चा आहे. पण, या प्रकरणी सोमवारी गुन्हा दाखल झाला. यात हे प्रकरण दवाखान्यातून तक्रार झाल्याशिवाय उपचार होणार नसल्याने पोलिसांत पोहोचल्याची दिवसभर चर्चा ऐकायला मिळाली. यामुळे प्रकरणात नेमके पोलीस तक्रारीत जरी आज अनावधानाने ही घटना झाली असल्याचे म्हटले असले तरी याचा शोध पोलिसांनी घेतल्यास नक्की काहीतरी वेगळे चित्र बाहेर येण्याची चर्चा ऐकायला मिळत आहे.

यामुळे हे प्रकरण गांभीर्याने घेणे गरजेचे आहे. पिस्तूल ही खेळण्याचे साधन नसून जर जीवावर बेतणार असेल तर यात हा दाखवण्यासारखा प्रकार होता का, अनवधानाने जरी झाला असला तरी विना परवाना गावठी पिस्तूल घरात ठेवणे याचे कारण काय याचा शोध घेणे गरजेचे आहे. या प्रकरणी रितू जिंदे यांनी दिलेल्या तक्रारीवरून रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून उमेश जिंदे यास अटक करण्यात आली आहे. जिंदेंच्या ताब्यात गावठी पिस्तूल जप्त करण्यात आल्याची माहिती ठाणेदार धनाजी जनक यांनी ईटीव्ही भारतला दिली.

हेही वाचा - प्रेमाचा संदेश द्या अन् मैत्रीचे नाते जोडा! पवनार आश्रमात मैत्री मिलन सोहळ्यातील उपक्रम

Intro:वर्धा स्टोरी

mh_war_03_jindde_vis1_7204321

परवाना नसलेल्या बंदुकीची गोळी लागून मेहुणी जखमी?
-जिल्हा परिषद सदस्य उमेश जिंदेच्या घरातील घटना

वर्धा- कुठलाही घरगुती विषय हा वयक्तिक असतो. पण या घटनेत परवाना नसलेल्या बंदुकीत गोळी भारतानं भरलेल्या घटनेने आवाजासोबत विषय बाहेर पडला. बंदुकीतून सुटलेली गोळी थेट पोटात घुसून मेहुणी गंभीर जखमी झाल्याची घटना जिल्हा परिषद सदस्याचा घरात घडली. ही घटना जरी अनवधानाने घडलेली असल्याची पोलीस तक्रारीत नमूद असले तरी याचा शोध पोलीस करतात का? आणि यात आणखी काय पुढे येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. वर्ध्यातील सिंदी (मेघे) परिसरातल्या गिट्टीफैल भागातील घडलेल्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. निकिता डोईफोडे असे जखमी महिलेचे नाव आहे.

रामागर पोलीस स्टेशन अंतर्गत परवाना नसलेली बंदूकमध्ये गोळी भारताना गोळी पोटात लागली. यामुळे गंभीर जखमी झाल्याने प्रकरण दवाखान्यात पोहचले. जिल्हा परिषद सदस्य उमेश जिंदे यांच्या घरी त्यांची मेव्हणी निकिता डोईफोडे, आणि पती साई डोईफोडे हे पाहून पणाला आले होते. सायंकाळी घरामध्ये उमेश जिंदे आणि त्यांची पत्नी घरामध्ये गप्पागोष्टी कर होते. दरम्यान, उमेश
जिंदे हे घरात विनापरवाना असलेली पिस्टल गोळी कशी भरतात हे दाखवण्यासाठी बाहेर आणली. यावेळी पिस्टलमध्ये भरलेली गोळी अचानक सुटली आणि निकीताच्या पोटात घुसली. त्यात निकीता गंभीर जखमी झाल्याने सेवाग्राम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या निकीता यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे.

वर्ध्यातील सिंदी मेघे परिसरात रविवारी रात्री घडली असल्याची चर्चा आहे. यात गुन्हा दाखल मात्र सोमवारी दाखल झाला आहे. यात हे प्रकरण दवाखान्यातून तक्रार झाल्याशिवाय होणार नसल्याने पोलिसांत पोहोचल्याची दिवसभर चर्चा ऐकायला मिळाली. यामुळे प्रकरणात नेमक पोलीस तक्रारीत जरी आज अनावधानाने झाली असल्याचे म्हटले असले तरी याचा शोध पोलिसांनी घेतल्यास नक्की काहीतरी वेगळे चित्र बाहेर येण्याची चर्चा ऐकायला मिळत आहे. यामुळें या प्रकरणाची गंभीरता घेणे गरजेचे आहे. बंदूक ही खेळण्याचे साधन नसून जर जीवावर बेतनार असेल तर यात हा दाखवण्यासारखा प्रकार होता का, अनवधानाने जरी झाला असला तरी विना परवाना गावठी बंदूक घरात ठेवणे याचे काय कारण याचा शोध घेणे गरजेचे आहे. यात पोलिसांनी उमेश जिंदे याला अटक केली असून गावठी बंदूक हस्तगत केली असल्याचे ठाणेदार धनाजी जनक यांनी ईटीव्हीला सांगितली. सोबत यात काही वेगळे प्रकरण नसल्याचे सुद्धा सांगितले.

Body:पराग ढोबळे,वर्धा.Conclusion:
Last Updated : Nov 19, 2019, 10:09 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.