ETV Bharat / state

देवी विसर्जनादरम्यान तलावात पडल्याने एकाचा मृत्यू - selu devi visarjan news

केळझर येथे जयदुर्गा मंडळाच्या देवीचे विसर्जन असल्याने गावातील भाविक मंडळी खदान परीसरात कृत्रिम तलावावर जमले होते. यावेळी विसर्जना दरम्यान पोहताना एकजण जखमी झाला. उपचारार्थ दाखल करत असताना या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

one died during devi visarjan in wardha
देवी विसर्जनदरम्यान तलावात पडल्याने एकाचा मृत्यृ
author img

By

Published : Oct 26, 2020, 11:59 PM IST

Updated : Oct 27, 2020, 6:09 AM IST

वर्धा - केळझरा परिसरात देवी विसर्जन करण्यासाठी गेलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. हनुमान चिंधू धोटे असे मृताचे नाव आहे. गिट्टी नावाच्या खाणीत तयार झालेल्या खड्ड्यात सोमवारी विसर्जन सुरू होते. यावेळी दुपारच्या दरम्यान पोहोताना ही घटना घडली. संबंधित व्यक्ती जखमी झाल्याने त्याला रुग्णालयात नेण्यात आले. मात्र रस्त्यात त्याने दम तोडला.

केळझर येथे जयदुर्गा मंडळाच्या देवीचे विसर्जन असल्याने गावातील भाविक मंडळी खदान परीसरात कृत्रिम तलावावर जमले होते. यावेळी विसर्जना दरम्यान पोहताना ही घटना घडली. खोल पाण्यात गेलेल्या हनुमानला आतमध्ये दगड लागल्याने तो जखमी झाला. ही बाब काहींच्या लक्षात येताच त्याला पाण्याबाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू झाले. स्थानिकांनी तत्काळ मदत करत त्याला पाण्याबाहेर काढून रुग्णालयात दाखल केले. मात्र रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला.

हनुमान हा ट्रॅक्टर चालक होता. त्याच्या पश्चात पत्नी आणि लहान मुलगी आहे. या घटनेसंबंधी सेलु पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Last Updated : Oct 27, 2020, 6:09 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.