ETV Bharat / state

अँटीजेन चाचण्यांवर जिल्ह्यात एक कोटी खर्च, आता लक्षणे असल्यास होणार तपासण्या

चाचण्या वाढल्यामुळे रुग्णसंख्याही वाढत आहे. अँटीजेन टेस्टवर एक कोटीच्या घरात खर्च झाला आहे. यापुढे आता अँटीजेन टेस्ट लक्षणे किंवा ऑक्सिजन पातळी कमी असल्यास केली जाणार आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 20 हजार अँटीजन किट आल्यापासून 13 हजार जणांची चाचणी करण्यात आली आहे.

वर्धा
वर्धा
author img

By

Published : Sep 8, 2020, 8:35 PM IST

Updated : Sep 8, 2020, 9:21 PM IST

वर्धा - जिल्ह्यात मागील 15 दिवसात झपाट्याने कोरोना रुग्णसंख्या वाढली आहे. चाचण्या वाढल्यामुळे रुग्णसंख्याही वाढत आहे. अँटीजेन टेस्टवर एक कोटीच्या घरात खर्च झाला आहे. यापुढे आता अँटीजेन टेस्ट लक्षणे किंवा ऑक्सिजन पातळी कमी असल्यास केली जाणार आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 20 हजार अँटीजेन किट आल्यापासून 13 हजार जणांची चाचणी करण्यात आली आहे.

वर्धा

मंगळवारी जिल्ह्यात 151 नवे पॉझिटिव्ह रुग्ण सापडले असून दोन हजाराच्या घरात रुग्णसंख्या जाऊन पोहचली आहे. एकूण 1,926 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची नोंद झाली आहे. कोरोनाने जिल्हाधिकारी कार्यालयातसुद्धा शिरकाव केला आहे. जिल्ह्यात 12,967 अँटीजेन टेस्ट विविध तालुक्यात करण्यात आल्या. यापैकी 1037 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. 10 हजार किटची किंमत 50 लाख आहे. जिल्ह्यात 20 हजार किट मागवण्यात आले असून 20 हजार किट आरोग्य यंत्रणेकडून वाटप करण्यात आले आहेत. 13 हजार किटच्या साह्याने चाचणी झाली असून यात 7 हजार किट आरोग्य यंत्रणेकडे शिल्लक आहेत.

स्वॅब टेस्टवरचा खर्च कमी झाला आहे. 700 ते 1000 रुपयापर्यंत या चाचणीला खर्च येतो. पीपीई किटच्या दरांमध्येही घसरण झाल्याने या खर्चात घट झाली आहे. मोठ्या प्रमाणात अँटीजन टेस्ट बोगस असल्याची अफवा सुरुवातीच्या काळात होती. यामुळे मोठा गैरसमज असल्याचे सांगितले जात आहे. 13 हजार पैकी केवळ 1 हजार रुग्ण पॉझिटिव्ह आले असून यात 12 हजार लोकांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

सर्वाधिक रुग्ण लक्षणे नसणारेच..

लक्षणे नसलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या जास्त आहे. सावंगी रुग्णालयात 220 रुग्ण उपचार घेत होते. यापैकी फक्त 32 जणांना ऑक्सिजन लावण्याची गरज होती. तेच सेवाग्राम रुग्णालयात 165 पैकी 25 जणांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले असून ऑक्सिजन लावण्याची गरज पडली आहे. याव्यतिरिक्त दोन्ही रुग्णालयात जवळपास 300 च्या घरात उपचार घेत असलेले रुग्ण अति सौम्य किंवा लक्षणे नसणारे रुग्ण आहेत. यात वर्ध्यातील दोन कोविड सेंटर असून याठिकाणी सुद्धा लक्षणे नसणारी 170 रुग्ण आहेत, त्यांनाही सौम्य किंवा लक्षणे नाहीत. यामुळे पुढील काळात लक्षणे असल्यास अँटीजन टेस्ट केले जाईल किंवा ऑक्सिजन लेव्हल 95 टक्क्यांपेक्षा कमी असल्यास तपासणी होणार आहे. शिवाय लक्षणे नसतील आणि घरात राहण्याची सोय असल्यास घरात किंवा कोविड केअर सेंटरला ठेवणार असल्याची महिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनुपम हिवलेकर यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.

हेही वाचा - राज्यात 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' अभियान राबवणार, मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा

Last Updated : Sep 8, 2020, 9:21 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.