ETV Bharat / state

वर्ध्यात साथीच्या आजारांचा फैलाव, उपचारासाठी नागरिकांची रुग्णालयांमध्ये गर्दी

साथीच्या आजारांनी डोकं वर काढायला सुरुवात केल्यामुळे रुग्णालयांमधील गर्दी वाढत आहे. जिल्हा रुग्णालय असो वा खासगी रुग्णालये, सगळीकडेच रुग्णांची गर्दी पहायला मिळत आहे. रुग्णांमध्ये विशेषतः लहान मुलांची संख्या अधिक आहे.

number of patients suffering from viral increases in vardha most patients are kids
author img

By

Published : Jul 25, 2019, 8:17 AM IST

वर्धा - बदलत्या वातावरणामुळे साथीच्या आजारांनी डोकं वर काढायला सुरुवात केली आहे. यामुळे रुग्णालयांमधील गर्दी वाढत आहे. ताप, खोकला, डायरिया अशा संसर्गजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे. रुग्णांमध्ये विशेषतः लहान मुलांची संख्या अधिक आहे. जिल्हा रुग्णालय असो वा खासगी रुग्णालये, सगळीकडेच रुग्णांची गर्दी पहायला मिळत आहे. जिल्हा रुग्णालयातील बाराशे रुग्णांची ओपीडी तब्बल सतराशेच्या घरात पोहोचली आहे. यामध्ये साथीचे आजार झालेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे.

साथीच्या आजारांनी डोकं वर काढायला सुरवात केल्यामुळे रुग्णालयांमधील गर्दी वाढत आहे. रुग्णांमध्ये विशेषतः लहान मुलांची संख्या अधिक आहे.

जिल्ह्यात एक जिल्हा सामान्य रुग्णालय तसेच आर्वी आणि हिंगणघाट येथे दोन उपजिल्हा रुग्णालये आहेत. यासह, जिल्ह्यामध्ये आठ ग्रामीण रुग्णालये आहेत. या सर्व ठिकाणी असणाऱ्या वैद्यकीय अधीक्षकांना विशेष सूचना देण्यात आल्या असून पुरेसा औषधसाठा देण्यात आला आहे.

  • काय घ्यावी खबरदारी?

साथीच्या आजारांचा संसर्ग हा सहसा पाण्यातून होतो. त्यामुळे पिण्याचे पाणी उकळून पिणे, पाणी साठवून ठेवण्याच्या जागा वेळोवेळी स्वच्छ करणे अशी खबरदारी आपण घ्यायला हवी.

  • आजार अंगावर काढू नये.

पावसाळी वातावरणात ताप, सर्दी आणि खोकल्यासह इतर संसर्गजन्य आजारांची लागण अनेकांना होते. यातच रोगप्रतिकारशक्ती कमी असलेली लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिला यांना तापाचा प्रादुर्भाव तत्काळ होतो. त्यामुळे त्यांची काळजी घेणे गरजेचे आहे. साथीच्या आजारांमध्ये आवश्यक काळजी घेत उपचार घ्यावे, आजार अंगावर काढू नये.

परिसरातील अस्वच्छता हे प्रामुख्याने आजारांना आमंत्रण देण्यास कारणीभूत ठरतात. घराप्रमाणे इतर परिसर स्वच्छ ठेवल्यास अशा आजारांवर नियंत्रण मिळवण्यास मदत होईल.

Intro:वर्धा स्टोरी
साथीचे आजार, सर्वसामान्य झाले बेजार

वातावरणातील बदलामुळ साथीचे आजारानी डोकंवर काढायला सुरवात केली आहे. या आजारांमुळे रुग्णालयाच्या गर्दीत वाढ झालेली आहे. संसर्गजन्य आजार तसेच व्हारलचे रुग्णसंख्येत ही वाढ झाली आहे. यासह ताप, खोकला, डायरिया अशा रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. विशेष म्हणजे रुग्ण संख्येत लहान मुलांची संख्या अधिक आहे.

वर्धेच्या जिल्हा सामान्य रुग्णालय असो की खाजगी रुग्णालय रुग्णांची गर्दी पाहायला मिळत आहे. यामध्ये पुरुष महिलासह वयोवृद्ध तसेच लहान मुलाना सुद्धा ताप येणे, सर्दी खोकला, अंगदुख डोके दुखणे, चढ उतार करणारा हा त्रास होत आहे. या लक्षणांकडे अनेकदा वातावरणातील बदलामुळे म्हणून दुर्लक्ष केले जाते. पण असे समजून दुर्लक्ष करू नये असे आवाहन केले जात आहे. जिल्हा रुग्णलायत बाराशे रुग्णांची ओपीडी आता सतराशेच्या घरात पोहोचली आहे. यामध्ये ताप, खोकला, डायरिया या रुग्णांची संख्या अधिक आहेय.

जिल्ह्यात एक जिल्हा सामान्य रुग्णालय दोन आर्वी आणि हिंगणघाट येथे उपजिल्हा रुग्णालय आहे. यासह आठ ग्रामीण रुग्णालय आहे. यासर्व ठिकाणी असणाऱ्या वैदकीय अधीक्षक यांना सूचना देण्यात आल्या असून योग्य तो औषध साठा देण्यात आला आहे. गरजेनुसार साथीच्या रुग्ण किंवा या काळातील आजारावांवर उपचार करण्यासाठी पुरेसा औषधसाठा उपलब्ध करून देण्यात आला आहे.

उपाययोजना .....
यासर्व बाबींवर उपाययोजना पाहता प्रामुख्याने पिण्याचे पाणी आणि स्वच्छता जेणेकरून डास होणार आहे. या काळात पिण्याचे पाणी हे उकळून घ्यावे. तसेच स्वछता ठेवत डास उत्पन्न होणाऱ्या वस्तू टाळणे. झोपताना मच्छरदाणीचा उपयोग करावा. लाहान मुलांच्या बाबतीत विशेष काळजी घ्यावी. लहान मुले हइ मोठ्या प्रमाणात आजाराला बळी पडतात.

आजार अंगावर काढू नये....
पावसाळी वातावरणात ताप, सर्दी आणि खोकल्यासह इतर संसर्गजन्य आजारांची लागण अनेकांना होते. यातच रोगप्रतिकारशक्ती कमी असलेली लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिला यांना तापाचा प्रादुर्भाव तत्काळ होतो. त्यामुळे त्यांची काळजी घेणे गरजेचे आहे. साथीच्या आजारांमध्ये आवश्यक काळजी घेत उपचार घ्यावे, आजार अंगावर काढू नये

गर्दीपासून लांब राहावे.....

मोठ्या प्रमाणात आजार हे एकापासुन दुसऱ्याला होतात. यामुळे अतिशय गर्दीचे असणारे स्थळ पाहता जास्त वेळ संपर्कात राहिल्यास संसर्गजन्य आजराची लागण होते. यासह हस्तांदोलन हे सुद्धा रोग पसरण्यास कारणीभूत ठरत असल्याबे बिमार व्यक्तीच्या हस्तांदोलन करणे टाळावे असे आवाहन करण्यात येत आहे.

परिसरातील अस्वच्छता हे प्रामुख्याने आजारांना आमंत्रण देण्यास कारणीभूत ठरतात. घराप्रमाणे इतर परिसर स्वच्छ ठेवलयास अश्या आजारावर नियंत्रण मिळवण्यास मदत होईल असे डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे.
Body:पराग ढोबळे,वर्धा.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.