ETV Bharat / state

वर्ध्यात अर्थमंत्र्यांच्या उपस्थितीत उमेदवारी दाखल; भाजपच्या तिन्ही उमेदवारांचे उमेदवारी अर्ज दाखल

वर्ध्यात तिन्ही उमेदवारांनी एकाच दिवशी मुहूर्त साधत महायुतीतील पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केले. अर्ज भरण्याच्यावेळी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थिती लावल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.

वर्ध्यात अर्थमंत्र्यांच्या उपस्थितीत उमेदवारी दाखल; भाजपच्या तिन्ही उमेदवारांचे उमेदवारी अर्ज दाखल
author img

By

Published : Oct 4, 2019, 5:05 AM IST

वर्धा - युतीच्या जागावटपात वर्ध्यात भाजपला तीन जागा मिळाल्या आहेत. तिन्ही उमेदवारांनी एकाच दिवशी मुहूर्त साधत महायुतीतील पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केले. अर्ज भरण्याच्यावेळी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थिती लावल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.

वर्ध्यात अर्थमंत्र्यांच्या उपस्थितीत उमेदवारी दाखल; भाजपच्या तिन्ही उमेदवारांचे उमेदवारी अर्ज दाखल

वर्ध्यात विद्यमान आमदार पंकज भोयर यांच्या उमेदवारीला मोठ्या प्रमाणात अंतर्गत कलहातून विरोध झाला होता. संघाचा सर्व्हे व्हायरल करत त्यांना तिसऱ्या क्रमांकाची पसंती दाखवण्यात आली होती. अखेर पंकज भोयर यांना उमेदवारी जाहीर झाल्याने विरोधी चर्चांना पुर्णविराम मिळाला. मुनगंटीवार उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आले होते.

हेही वाचा - रोहित पवार आहेत इतके श्रीमंत...

आर्वी मतदार संघात सुद्धा अनेक दिवसांपासून भाजपचे माजी आमदार दादाराव केचे आणि सुधीर दिवे यांच्यात उमेदवारी मिळवण्यासाठी चुरस पाहायला मिळाली. अखेर दादाराव केचे यांना उमेदवारी जाहीर झाली. त्यांनीही महायुतीतील पदाधिकाऱ्यांसोबत उमेदवारी अर्ज दाखल केला.

यावेळी त्यांच्यासोबत माजी खासदार विजयराव मुळे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाळा शहागडकर, युवा नेते राहुल ठाकरे, पंकज तडस, विशेष म्हणजे यात राष्ट्रवादीचे नेते दिलीप उर्फ भय्यासाहेब काळे यांचे चिरंजीव संदीप काळे हे सुद्धा दिसून आलेत. यासह अनके पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

हेही वाचा - संगमनेरमध्ये राधाकृष्ण विखेंना शिवसेनेचा धक्का, तर शिर्डीतून विखेंविरोधात काँग्रेस कोणाला देणार उमेदवारी?

हिंगणघाट मतदार संघातून भाजपचे विद्यमान आमदार समीर कुणावर यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्या विरोधात शिवसेनेचे बंडखोर नेते अशोक शिंदे यांचे आव्हान आहे. यावेळी खासदार रामदास तडस, जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन मडावी, सेनेचे रवी बालपांडे यांचासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा - भाजपची तिसरी यादी जाहीर; खडसेंसह तावडे, बावनकुळेंचे नाव नाही

वर्धा मतदार संघातून काँग्रेसचे शेखर शेंडे यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. शेंडे यापूर्वी दोन वेळा पराभूत झाले असून त्यांना तिसऱ्यांदा संधी देण्यात आली. यावेळी त्यांच्यासोबत महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष चारुलता टोकस राव, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शेखर शेंडे, राष्ट्रवादीचे माजी आमदार सुरेश देशमुख यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

तसेच अनेक वर्षांपासून पत्रकारिता करत वृत्तपत्र संपादक रवींद्र कोटंबकार यांनीही वर्धा मतदार संघातून अपक्ष उमेदवारी टाकत उमेदवारी अर्ज दाखल केला. या व्यवस्थेचा विरोधात हा लढा असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

Intro:mh_war_namakan_dakhal_pkg_7204321
Pkg एडिट केले आहे.

वर्ध्यात अर्थमंत्र्यांच्या उपस्थितीत उमेदवारी दाखल,भाजपच्या तिन्ही उमेदवारांचे नामांकन दाखल

- काँग्रेसचे शेखर शेंडे यांनीही उमेदवारी केली दाखल

वर्धा - वर्धा जिल्ह्यात भाजपला उमेदवारी वाटपात तीन जागेवर उमेदवारी मिळाली. यात तिन्ही उमेदवारांनी एकाच दिवशी मुहूर्त साधत महायुतीतील पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित नामांकन अर्ज दाखल केले. यात भाजपचे वर्धा मतदार संघाचे उमेदवार यांच्या नामांकन अर्ज दाखल करतांना थेट अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीच उपस्थिती लावल्यान अनेकांच्या भुवया उंचावल्याचे चित्र पहावयास मिळाले.

वर्ध्यात विद्यमान आमदार पंकज भोयर यांच्या उमेदवारीला मोठ्या प्रमाणात अंतर्गत कलहातून विरोध झाला होता. संघाचा सर्व्हे व्हायरल करत त्यांना तिसऱ्या क्रमांकाची पसंती दाखवण्यात आली होती. अखेर पंकज भोयर यांना उमेदवारी जाहीर झाली. विरोधी चर्चाना विराम मिळाला. अर्थमंत्री थेट हेलिकॉप्टरनर नामांकन दाखल करण्यासाठी आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्याचे चित्र पाहायला मिळाले.

आर्वी मतदार संघात सुद्धा अनेक दिवसांपासून भाजपचे माजी आमदार दादाराव केचे आणि सुधीर दिवे यांच्यात उमेदवारी मिळवण्यासाठी चुरस पाहायला मिळाली. अखेर दादाराव केचे यांना उमेदवारी जाहीर झाली आज महामयुतीतील पदाधिकाऱ्यांसोबत नामांकन अर्ज दाखल केला.

यावेळी त्यांच्यासोबत माजी खासदार विजयराव मुळे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाळा शहागडकर, युवा नेते राहुल ठाकरे, पंकज तडस, विशेष म्हणजे यात राष्ट्रवादीचे नेते दिलीप उर्फ भय्यासाहेब काळे यांचे चिरंजीव संदीप काळे हे सुद्धा दिसून आलेत. यासह अनके पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

हिंगणघाट मतदार संघातून भाजपचे विद्यमान आमदार समीर कुणावर यांनी नामांकन अर्ज दाखल केला. त्यांचा विरोधात शिवसेनेचे बंडखोर नेते अशोक शिंदे यांनी नामांकन दाखल केले. यावेळी खासदार रामदास तडस, जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन मडावी, सेनेचे रवी बालपांडे यांचासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

वर्धा मतदार संघातून काँग्रेसचे शेखर शेंडे यांनीही नामांकन अर्ज दाखल केला आहे. यापूर्वी दोन वेळा पराभूत झाले असून त्यांना तिसऱ्यांदा संधी देण्यात आली. यावेळी त्यांच्यासोबत महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष चारुलता टोकस राव, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शेखर शेंडे, राष्ट्रवादीचे माजी आमदार सुरेश देशमुख यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

तसेच अनेक वर्षांपासून पत्रकारिता करत वृत्तपत्र संपादक रवींद्र कोटंबकार यांनीही वर्धा मतदार संघातून अपक्ष उमेदवारी टाकत नामांकन अर्ज दाखल केला. या व्यवस्थेचा विरोधात हा लढा असल्याचे ते सांगतात.
Body:पराग ढोबळे, वर्धा.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.