ETV Bharat / state

वर्धा : विहिरीत पडलेल्या नीलगायीला सुरक्षित बाहेर काढण्यात ग्रामस्थांना यश - वनविभाग

भटकेली नीलगाय शेत शिवारात फिरत असतांना कुत्र्यांनी तिचा पाठलाग सुरू केला. यात नीलगाय गावाच्या दिशेने धावत सुटली. एवढयात ही नीलगाय गावातील एका विहिरीत पडली.

नीलगाय
author img

By

Published : Jul 7, 2019, 3:00 PM IST

वर्धा - विहिरीत पडलेल्या नीलगायीला यशस्वीरित्या बाहेर काढण्यास समुद्रपूर तालुक्यातील गिरड गावातील गावकऱ्यांना यश आले आहे. शनिवारी घडलेल्या या घटनेत २ तासांच्या अथक परिश्रमानंतर गावकऱ्यांनी सुरक्षितरित्या नीलगायीला विहिरीबाहेर काढले.

विहिरीत पडलेल्या नीलगायीला सुरक्षित बाहेर काढण्यात गिरड ग्रामस्थांना यश

नीलगाय मोठ्या प्रमाणत कळपाने राहते. परंतु, भटकेली नीलगाय शेत शिवारात फिरत असतांना कुत्र्यांनी तिचा पाठलाग सुरू केला. यात नीलगाय गावाच्या दिशेने धावत सुटली. एवढयात ही नीलगाय गावातील एका विहिरीत पडली. ही बाब गावकऱ्यांच्या लक्षात येताच गावकऱ्यांनी विहिरीकडे धाव घेतली. यावेळी नागरिकांची गर्दी झाली. घटनेची माहिती वनविभागासह गिरड पोलिसांना देण्यात आली. काही वेळात घटनास्थळी पोलीस पोहचले. मात्र, या खोल विहिरीत उतरुन नीलगायीला बाहेर काढण्यास कोणीच तयार झाले नाही.

यामुळे वार्डातील अर्जुन वानोडे, तुकाराम ढोके, शंकर फोपारे, राहुल फोपारे यांच्यासह गावकऱ्यांनी नीलगायीला विहिरीतून बाहेर काढले. वनविभागाने नीलगायीला ताब्यात घेऊन खुर्सापार जंगलात सुरक्षित सोडले आहे.

Intro:विहरित पडलेल्या निलगायीला गावकऱ्यांनी दिले जिवदान

-वर्धा जिल्ह्यातील गिरड येथील घटना
- वनविभागाच्या कर्मच्याऱ्यांन सह पोलिसांनी गाठले घटनास्थळ

जंगलातील निलगाय शेत शिवरातून गावाकडे आली. यावेळी निलगायीचा कुत्र्याने पाठलाग सुरू केला. घाबरलेली नीलगाय धावत असताना गावातील विहरित पडली. वर्धा ही घटना शनिवारी सायंकाळी जिल्ह्यातीच्या समुद्रपुर तालुक्यातील गिरड येथे घडली. गावकऱ्यांनी दोन तासांच्या अथक परिश्रमा नंतर निलगायीला सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले.

नीलगाय मोठ्या प्रमाणत कळपाने राहते. पण भटकेली नीलगाय शेत शिवारात फिरत असतांना कुत्र्यानी पाठलाग सुरू केला. यात नीलगाय गावाच्या दिशेने धावत सुटली. एवढयात ही नीलगाय गावातील एका विहरित पडली. हि बाब गावकऱ्यांच्या लक्षात येताच गावकऱ्यांरी विहरिकडे धाव घेतली. यावेळी नागरिकांची गर्दी झाली. घटनेची माहिती वनविभागासह गिरड पोलिसांना देण्यांत आली. काही वेळात ते घटनास्थळ पोहचले. मात्र, या खोल विहीर उतरुन निलगायीला बाहेर काढण्यास कोणीच तयार झाले नाही.

शेवटी वार्डातील अर्जुन वानोडे, तुकाराम ढोके,शंकर फोपारे,राहुल फोपारे, सह गावकऱ्यांनी गिलगायीला विहीरी बाहेर काढून जिवदान दिले. या निलगायीला वनविभागाने ताब्यात घेऊन खुर्सापार जंगलात सुरक्षित सोडले असल्याचे सांगितले जात आहे.Body:पराग ढोबळे,वर्धा.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.