ETV Bharat / state

वर्ध्यात वृतपत्र विक्रेत्याचा उष्माघाताने मृत्यू - कोरा

समुद्रपूर तालुक्याच्या कोरा येथील ५० वर्षीय व्यक्तीचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी घडली असून जनार्धन ननावरे, असे त्या व्यक्तीचे नाव आहे.

मृत जनार्धन ननावरे
author img

By

Published : May 26, 2019, 8:20 AM IST

वर्धा - समुद्रपूर तालुक्याच्या कोरा येथील ५० वर्षीय व्यक्तीचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी उघडकीस आली. जनार्धन नंदकुमार ननावरे असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

जनार्धन ननावरे यांच्या घारासमोरील दृश्य

जनार्धन ननावरे हे वृत्तपत्र विक्रेत्याचे काम करतात. घरची परिस्थिती बेताची असल्याने ते सकाळी वर्तमानपत्र वितरणाचे काम अनेक वर्षांपासून करत होते. रोजमजुरी करून ते कुटुंबाची उपजिवीका भागवत होते. शनिवारी सकाळी नेहमीप्रमाणे वृत्तपत्र वाटल्यानंतर भर उन्हात ते खताचे पोते उतरविण्याचे काम करीत होते. उन्हामुळे त्यांना अस्वस्थ वाटू लागले. ते घरी गेल्यानंतर त्यांची प्रकृती अधिकच बिघडली. यांनांतर कुटुंबीयांनी त्यांना नांदोरी येथील रुग्णालयात नेले. मात्र, तेथे डॉक्टरांनी जनार्धन यांना मृत घोषित केले. प्राथमिक अंदाजानुसार उष्माघातानेच त्यांचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त होत होता

Intro:वृतपत्र विक्रेत्याचा उष्मघाताने मृत्यूचा संशय

जिल्ह्यातील कोरा येथिल घटना,
अँकर - समुद्रपूर तालुक्याच्या कोरा ५० वर्षीय इसमाचा मुत्यु झाल्याची घटना शनिवारी दुपारी उघडकीस आली. जनार्धन नंदकुमार ननावरे वय मुत्यकाचे नाव आहे. पोते उतरवत असतांना प्रकृती बिघडली आणि उपचार दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

जनार्धन ननावरे हे वृत्तपत्र विक्रेत्यांचे काम करतात. घरची परिस्थिती बेताची असल्याने ते सकाळी वर्तमानपत्र वितरण काम अनेक वर्ष पासून करत आहे. नंतर रोजमजुरी करुन या मिळणाऱ्या मिळकतीतुन परीवाराची उपजिवीका भागवत. आज सकाळी नेहमी प्रमाणे सकाळी वृत्तपत्राचे वाटल्या नंतर भर उन्हात खताचे पोते उतरविण्याचे काम करीत होते. उन्हामुळेंल त्याला अस्थवस्थ वाटायला लागले. ते घरी गेले त्यांची प्रकृती जास्त झाली. कुटुंबियांनी रुग्णालयात नेताना नांदोरी जाताना वाटेतच मृत्यू झाला. त्यांना रुग्णलात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. प्राथमिक अंदाजा नुसार उष्म घाताने मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त होत होता.

कुटुंबावर संकट...

जनार्धन ननावरे हे या वयात सुद्धा आपल्या कुटुंबीयांना आधार देत होते. त्यांचा अचानक जाण्याने कुटुंबियांवर मोठं संकट ओढवले. मुत्यक जनार्धनच्या परीवारात आई, पत्नी, मुलगा सुन नांतवड असा बराच मोठा परिवार आहे. Body:पराग ढोबळे, वर्धाConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.