ETV Bharat / state

राष्ट्रवादी पवारसाहेबांपुरतीच मर्यादित राहील - ऊर्जामंत्री बावनकुळे - CONGRESS

काँग्रेसचे राष्ट्रीय नेतृत्व कोणी करावे याचा एक मताने निर्णय होत नसल्याने हास्यास्पद परिस्थिती सध्या काँग्रेसची झाली असल्याचे बावनकुळे यांनी म्हटले आहे.

ऊर्जामंत्री बावनकुळे
author img

By

Published : Jul 25, 2019, 11:34 PM IST

वर्धा - मोठ्या प्रमाणात इतर पक्षातून भाजप आणि शिवसेनेत प्रवेश घेत आहे. आज सचिन अहिर यांनी सेनेत प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही शरद पवार साहेबांपुरतीच मर्यादित असल्याची प्रतिक्रिया ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. तसेच काँग्रेसची परिस्थितीही हास्यास्पद असल्याचे ते म्हणाले. वर्ध्यातील सेवाग्राम येथील चरखाघर येथे ते माध्यमांशी बोलत होते.

राष्ट्रवादी पवारसाहेबांपुरतीच मर्यादित राहील - ऊर्जामंत्री बावनकुळे

ते आज वर्ध्यात दौऱ्यावर होते. त्यांनी देशातील सर्वात मोठा असलेला गांधीजींचा चरखा तसेच सेवाग्राम विकास आराखड्यातून केलेल्या कामांची पाहणी केली. यावेळी त्यांच्या हस्ते वृक्षारोपणसुद्धा करण्यात आले. यावेळी त्यांच्यासोबत आमदार डॉ. पंकज भोयर, आमदार समीर कुणावर, जिल्ह्याधिकारी विवेक भिमानवार उपस्थित होते.

पुढे बोलताना त्यांनी काँग्रेसवरही जोरदार टीका केली. काँग्रेसचे राष्ट्रीय नेतृत्व कोणी करावे याचा एक मताने निर्णय होत नसल्याने हास्यास्पद आणि ज्या पक्षाला राष्ट्रीय नेतृत्व नसेल, त्या पक्षाची अशीच अवस्था होणार आहे. मोठ्या प्रमाणात गावपातळीवर असणारे बूथ लेव्हल तसेच सरपंच पदावरील कार्यकर्ते हे पंतप्रधान मोदीजींवर विश्वास ठेवत असल्याचेही पालकमंत्री बावनकुळे म्हणाले.

मोदीजी या देशाचे नेतृत्व करत असून सर्वोत्कृष्ट देश म्हणून पुढे आणणार आहे. या महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम करण्याचे तसेच कठीण परिस्थितीतही सुरक्षित ठेवण्याचे काम मुख्यमंत्री यांनी केले आहे. यामुळे लोक मोठ्या प्रमाणात प्रवेश घेत आहेत.

यावेळी बाळासाहेब थोरात हे नवीन अध्यक्ष झाले आहेत. पण, त्यांना माहीत आहे, खासगीतही माहीत आहे, की पक्ष अडचणीत आहे. पक्षाला नेतृत्व नाही, धोरण नाही, कार्यकर्ते निराश झाले आहेत. तसेच ज्या पक्षाचे सैनिक डिमॉरलाईज झाले असेल ते युद्ध कसे लढणार ते युद्ध लढू शकत नाही, असे म्हणत त्यांनी कॉंग्रेसच्या परिस्थितीवर टीकास्त्र सोडले.

यावेळी त्यांनी सेवाग्राम विकास आराखड्यातून तयार करण्यात आलेल्या कामांची पाहणी केली. देशातील सर्वात मोठा चरखासुद्धा पाहिला. तसेच यावेळी वर्धा शहरालगतच्या 11 ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच यांनी भेट घेत, या 11 गावांचा सेवाग्राम विकास आराखड्यात समावेश करून निधी द्यावा, अशी मागणी या निमित्ताने केली.

Intro:वर्धा
राष्ट्रवादी पवारसाहेबा पुरती मर्यादित राहील- ऊर्जामंत्री बावणकुळे,

मोठ्या प्रमाणात इतर पक्षांतून भाजप आणि शिवनसेनेत प्रवेश घेत आहे आज सचिन अहिर यांनी सेनेत प्रवेश केला यावर इतर देतांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही शरद पवार साहेबापूर्ती मर्यादित राहील असे म्हणत कमी शब्दात त्यांनी टोला लागवाल. तसेच काँग्रेसची परिस्थिती ही हास्यास्पद आहे असेही राज्याचे ऊर्जामंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावणकुळे म्हणाले. ते वर्ध्यातील सेवाग्राम येथील चरखाघर येथे पत्रकारांच्या प्रश्नांवर माध्यमांशी बोलत होते.

ते आज वर्ध्यात दौऱ्यावर होते. त्यांनी देशातील सर्वात मोठा असलेला गांधीजींचा चरखा तसेच सेवाग्राम विकास आराखड्यातून केलेल्या कामाची पाहणी केली. यावेळी त्यांचा हस्ते वृक्षारोपण सुद्धा करण्यात आले. यावेळी त्यांच्यासोबत आमदार डॉ. पंकज भोयर, आमदार समीर कुणावर, जिल्ह्याधिकारी विवेक भिमानवार उपस्थित होते.

पुढे बोलताना त्यांनी काँग्रेसवरही जोरदार टीका केली. काँग्रेसचे राष्ट्रीय नेतृत्व कोणी करावे याचा एक मताने निर्णय होत नसल्याने हास्यास्पद आणि ज्या पक्षाला राष्ट्रीय नेतृत्व नसेल त्या पक्षाची असेच हाल होणार आहे. मोठ्या प्रमानात गावपातळीवर असणारे बूथ लेव्हल तसेच सरपंच पदावरील कार्यकर्ते हे पंतप्रधान मोदींजींवर विश्वस ठेवत असल्याचेही पालकमंत्री बावणकुळे म्हणाले.

मोदीजी या देशाचे नेतृत्व करत असून सर्वोत्कृष्ट देश म्हणून पुढे आणणार आहे. या महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम करण्याचे तसेच कठीण परिस्थितीतही सुरक्षित ठेवण्याचे काम मुख्यमंत्री यांनीं केले आहे. यामुळे लोक मोठ्या प्रमाणात प्रवेश घेत आहे.

यावेळी बाळासाहेब थोरात हे नवीन अध्यक्ष झाले आहे. कार्यकर्त्यांना पुन्हा निवडणून येऊ हे म्हणावे लागतात आहे, पण त्याना माहीत आहे, खाजगीतही माहीत आहे, की पक्ष अडचणीत आहे. पक्षाला नेतृत्व नाही, धोरण नाही, कार्यकर्ते निराश झाले आहेत. तसेच ज्या पक्षाचे सैनिक डीमॉरलाईज झाले असेल ते युद्ध कसे लढणार ते युद्ध लढू शकत नाही असे म्हणत त्यांनी कॉंग्रेसच्या परिस्थितीवर टीकास्त्र सोडले.

यावेळी त्यांनी सेवाग्राम विकास आराखड्यातून तयार करण्यात आलेल्या कामाची पाहणी केली. देशातील सर्वात मोठा चरखा सुद्धा पहिला. तसेच यावेळी वर्धा शहरालगतच्या 11 ग्रामपंचायतीच्या सरपंच उपसरपंच यांनी भेट घेत. या 11 गावाचा सेवाग्राम विकास आराखड्यात समावेश करून निधी द्यावा अशी मागणी या निमित्याने केली.Body:पराग ढोबळे,वर्धा.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.