ETV Bharat / state

हिंगणघाट जळीतकांड प्रकरणात आरोपीवर हत्येचा गुन्हा दाखल - हिंगणघाट जळीतकांड आरोपी

हिंगणघाट जळीतकांड प्रकरणातील पीडितेचा १० फेब्रुवारीला मृत्यू झाला. या प्रकरणातील आरोपीवर आधीच जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तिचा मृत्यू झाल्यानंतर आरोपीवरील कलमांमध्ये वाढ करून हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

hinganghat teacher burned case
हिंगणघाट प्राध्यापिका जळीतकांड
author img

By

Published : Feb 12, 2020, 10:38 AM IST

Updated : Feb 12, 2020, 12:22 PM IST

वर्धा - हिंगणघाट जळीतकांडातील पीडितेची १० फेब्रुवारीला मृत्यूशी झुंज संपली. तिने नागपुरातील ऑरेंज सिटी रुग्णालयात अखरेचा श्वास घेतला. या प्रकरणातील आरोपी विकेश नगराळे याच्या गुन्ह्यातील कलमामध्ये वाढ करून क्रूरपणे पेट्रोल टाकून हत्या केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी सध्या वर्ध्याच्या कारागृहात न्यायालयीन कोठडीमध्ये आहे.

हिंगणघाट जळीतकांड प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधले आहे. यामधील पीडित तरुणीवर सात दिवस शर्थीचे उपचार करण्यात आले. या घटनेनंतर अवघ्या काही तासातच आरोपीला नागपूर जिल्ह्यातील टाकळघाट परिसरातून अटक करण्यात आली. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला. ठिकठिकाणी मोर्चे काढण्यात आले. महिला अत्याचारांविरोधात रोष व्यक्त करण्यात आला. यामध्ये आरोपीला फाशी द्या, हैदराबादप्रमाणे एन्काऊंटर करा, तसेच आरोपीला आमच्या ताब्यात द्या अशा मागण्या जनतेने केल्या. तसेच यावेळी प्रचंड जन आक्रोश पाहायला मिळाला. यामुळे यातील आरोपीला कठोर शिक्षा होण्याच्या दृष्टीने 326 अ अंतर्गत तसेच जीवे मारण्याचा प्रयत्न या कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हिंगणघाट जळीतकांड प्रकरणात आरोपीवर हत्येचा गुन्हा दाखल

भारतीय दंड संहिताच्या कलम 326 अ मध्ये आहे तरी काय?

अ‌ॅसिडसारख्या वस्तूचे गंभीर परिणाम माहीत असताना त्यापासून होणारी दुखापत माहीत असताना जाणीवपूर्वक कृत्य घडून आणणे. यासह शरीराचा काही भाग जाळणे किंवा विद्रूप करणे, अपंगत्व आणण्याच्या प्रयत्न करणे असे प्रकार या कलम 326 'अ' मध्ये मोडतात. यामध्ये दहा वर्षांपेक्षा कमी नसेल परंतू आजीवन कारावास असू शकेल अश्या कोणत्याही एका शिक्षेची तरतूद आहे. यात पीडितेच्या अंगावर पेट्रोल टाकून केलेले कृत्य ज्वलनशील पदार्थ आणि गुन्ह्याची क्रूरता पाहता 326 अ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा अगोदरच दाखल करण्यात आला होता. यात पीडितेचा मृत्यू होताच 302 कलमच्या अंतर्गत हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. यामध्ये आजन्म कारावासाची शिक्षा आहे. या प्रकरणातील क्रूर कृत्य पाहता शिक्षा फाशीपर्यंत वाढवण्याचा निर्णय न्यायाधीश घेऊ शकतात. यामुळे पोलीस यंत्रणा याचा तपास करत आहे. तसेच ठोस पुरावे आणि प्रत्यक्ष साक्षीदार ही जमेची बाजू आहे. मात्र, या घटनेतील क्रूरता पाहता यात अनेक वर्षांपासून पोलीस विभागात कार्यरत असणाऱ्या अनेकांना हादरून सोडले असल्याची भावना पोलिसांनी व्यक्त केली.

Last Updated : Feb 12, 2020, 12:22 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.