ETV Bharat / state

VIDEO वर्ध्यात वीज बिल वसुलीला गेलेल्या अभियंत्याला दुकानदारांकडून मारहाण - recovery issue of power bill

सहाय्यक अभियंत्याला मारहाण झालेला व्हिडिओ व्हायरल झाला. या प्रकरणी शहर पोलिसांनी लोकसेवकास मारहाण प्रकरणात चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

अभियंत्याला दुकानदारांकडून मारहाण
अभियंत्याला दुकानदारांकडून मारहाण
author img

By

Published : Jul 24, 2021, 12:41 AM IST

वर्धा - महावितरणचे पथक थकीत वीज बिलाची वसुली करण्यासाठी ग्राहकांच्या घरोघरी पथक आहे. यातील एक पथक बोरगाव मेघे परिसरातील हनुमान नगरात वसुली करताना सहाय्यक अभियंत्याला ग्राहकांनी मारहाण केली. ही घटना शुक्रवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. सचिन उईके असे मारहाण झालेल्या सहाय्यक अभियंत्याचे नाव आहे.

सहाय्यक अभियंत्याला मारहाण झालेला व्हिडिओ व्हायरल झाला. या प्रकरणी शहर पोलिसांनी लोकसेवकास मारहाण प्रकरणात चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

वीज बिल वसुलीला गेलेल्या अभियंत्याला दुकानदारांकडून मारहाण

हेही वाचा-नदीत विद्युत वाहिनीवर अडकले महावितरणाचे कर्मचारी

महावितरणमध्ये सहायक अभियंता म्हणून कार्यरत सचिन विश्वेश्वर उईके हे महावितरणच्या पथकासह वीज बिल थकबाकी वसूलीसाठी गेले. हनुमान नगरातील ग्राहक बी. बी. तिवारी, अंकित फूलचंद तिवारी, फुलचंद रामसमूज तिवारी ग्राहक यांच्याकडे वीज बील थकीत होते. यावेळी वीज बिल न भरल्यास वीज पुरवठा खंडीत करण्यात येईल, अशी नोटीस बजावण्यात आली. पण यावेळी ग्राहकांनी नोटीस स्वीकारण्यास मनाई केली.

हेही वाचा-ठाण्यात झाडे पडण्याचे सत्र... दोन महिन्यांत 182 झाडे पडून 29 वाहनांचे नुकसान

वीज बिल भरण्याऐवजी सहाय्यक अभियंत्याला शिवीगाळ करत मारहाण
यात शुक्रवारी पथक सहाय्यक अभियंता सचिन उईके हे हनुमाननगर येथील अंकित तिवारी यांच्या ऑटोमोबाईलच्या दुकानात गेले. यावेळी दुकानात मनमोहन तिवारी, रघुनंदन तिवारी व पंकज तिवारी हे तिघेही उपस्थित होते. दुकान आणि घरचे असे तीन वीज बिल मार्च महिन्यापासून थकित असल्याचे सहाय्यक अभियंत्रा उईके यांनी सांगितले. तसेच बिल न भरल्यास खंडीत करण्यात येईल, अशी माहिती दिली. त्यावेळी पंकज तिवारी, मनमोहन तिवारी व रघुनंदन तिवारी यांनी बिल भरण्याऐवजी सहाय्यक अभियंत्याला शिवीगाळ करत मारहाण सुरू केली. मारहाणीत जखमी झाले असल्याने सहकारी कर्मचारी त्यांना वाहनातून घरी घेऊन गेले.

हेही वाचा-नागपुरात गोळीबार : क्षुल्लक वादातून केलं कृत्य; सहा जणांना अटक

शहर पोलीस स्टेशनला दिलेल्या लेखी तक्रारीतून मारहाण करणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.