ETV Bharat / state

केंद्राच्या 42 योजनांचा आढावा, सर्व योजना प्रभावीपणे राबवण्याच्या खासदार तडस यांच्या सूचना

केंद्र शासनाच्या सुचनेनुसार सर्व 42 योजनांचे सखोल नियोजन करून सर्व योजना वर्धा जिल्ह्यात प्रभावीपणे राबवण्याकरता प्रशासनाने कार्यवाही करावी असे निर्देश दिशा समितीचे अध्यक्ष खासदार रामदास तडस यांनी दिले. ते सोमवारी जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीच्या बैठकीत बोलत होते.

केंद्र शासनाच्या 42 योजनांचा आढावा
केंद्र शासनाच्या 42 योजनांचा आढावा
author img

By

Published : Jul 27, 2020, 9:19 PM IST

वर्धा : भारत सरकारच्या केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या योजनांचा खासदार रामदास तडस यांनी आज(सोमवार) आढावा घेतला. जिल्ह्यात कार्यान्वित योजनांचा आढावा संनियंत्रण करण्याची जबाबदारी दिशा समितीची आहे. केंद्र शासनाच्या सुचनेनुसार सर्व 42 योजनांचे सखोल नियोजन करावे. जिल्ह्यात या योजनांची अंमलबजावणी करून प्रशासनाने कार्यवाही करण्याचे निर्देष दिशा समितीचे अध्यक्ष खासदार रामदास तडस यांनी दिले.

सोमवारी जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीची (DISHA) बैठक जिल्हा परिषदेच्या सभागृहात समितीच्या बैठकीत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना उपस्थितीत घेण्यात आली. ग्रामीण भागांना जोडणारा रस्ता बांधकाम प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत करण्यासाठी जानेवारीत प्रस्ताव पाठवणे गरजेचे होते. पण, हा प्रस्ताव कोरोना आणि लॉकडाऊनच्या काळात दुर्लक्षित झाल्याने कामे प्रलंबित राहिली. यामुळे आता लवकर प्रस्ताव सादर करण्याचा सूचना त्यांनी दिल्या.

सन 2014-15 पर्यंत प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत झालेल्या निकृष्ट कामाची तपासणी करावी. यामध्ये आर्वी तालुक्यातील टोना-जामनेर यासह आणखी काही रस्त्यांचा समावेश आहे. त्याचबरोबर लघु उद्योगाला चालना देण्यासाठी बचत गटाना दिनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनेतून प्रशिक्षित करावे. प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुलाच्या कामाचा दर्जा चांगला ठेवावा. अतिक्रमीत असलेल्या झोपडपट्टया धारकांना जागेची भूमी अभिलेख कार्यालयामार्फत मोजणी करुन पट्टे वाटप करावे. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राबविण्यात येत असलेल्या विविध योजनेच्या अमंलबजावणीसाठी लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन योजना राबविण्यासाठी सहभाग नोंदवावा, असे निर्देश त्यांनी दिले.

यावेळी ग्रामीण रोजगार हमी योजना, ग्रामीण जिवनोन्नती अभियान, राष्ट्रीय सामाजिक सहायता कार्यक्रम, स्वच्छ भारत मिशन, राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, दिनदयाल उपाध्याय ग्राम ज्योती योजना, प्रधानमंत्री पिक विमा योजना सर्व शिक्षा अभियान, एकात्मिक बाल विकास योजना, शालेय पोषण आहार योजना, प्रधानमंत्री उज्वला योना आदी योजनांचा आढावा बैठकित घेण्यात आला. या बैठकिला जिल्हा परिषद अध्यक्ष सरिता गाखरे, आमदार समिर कुणावार, आमदार दादाराव केचे, जिल्हाधिकारी विवेक भीमनवार, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे, माधव कोटस्थाने संबधित खात्याचे खातेप्रमुख आदि उपस्थित होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.