ETV Bharat / state

रस्ते बांधकामांच्या संदर्भात तातडीने अहवाल सादर करा - खासदार तडस - वर्धा रस्ते बांधकाम अहवाल

खासदार रामदास तडस यांनी जिल्हा परिषदेच्या सभागृहात वर्धा जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची बैठक घेतली. वर्धा जिल्ह्यात सुरू असलेल्या रस्ता बांधकामांच्या सुरक्षेची पाहणी करुन त्याबाबत अहवाल सादर करण्याचे निर्देश खासदार तडस यांनी दिले.

MP Ramdas Tadas
खासदार रामदास तडस
author img

By

Published : Jun 11, 2020, 5:21 PM IST

वर्धा - जिल्ह्यात राष्ट्रीय आणि राज्य महामार्गाचे काम सुरू आहे. या मध्यमातून जिल्ह्याला राज्य आणि राष्ट्रीय महामार्गाशी जोडून नवी व्यापाराची संधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने तातडीने रस्त्याची सुरक्षा विषयक तपासणी करावी. रस्त्याचे काम करताना करारनाम्यातील तरतूदीनुसार सुरक्षा विषयक उपाययोजना केली जात आहे की नाही, याचा अहवाल तत्काळ सादर करण्याचे निर्देश खासदार रामदास तडस यांनी दिले.

खासदार रामदास तडस यांनी जिल्हा परिषदेच्या सभागृहात बैठक घेतली

खासदार रामदास तडस यांनी जिल्हा परिषदेच्या सभागृहात एक बैठक घेतली. यावेळी रस्ता सुरक्षा समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी जिल्ह्यात सुरू असलेल्या रस्त्याच्या कामांचा आढावा घेतला. या बैठकीला आमदार डॉ. पंकज भोयर, आमदार दादाराव केचे, जिल्हाधिकारी विवेक भीमनवार, मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओंबासे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय तिराणकर, आर्वीचे उपविभागीय अधिकारी हरीष धार्मिक, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणचे प्रकल्प संचालक सुनिल मेंढे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता गजानन टाके, शिक्षणाधिकारी उल्हास नरड आदी उपस्थित होते.

रस्त्यांचे काम करणारा मजुरवर्ग लॉकडाऊनमध्ये आपापल्या गावी गेल्याने काम बंद पडले आहे. पावसाळा तोंडावर असताना रस्त्याच्या दोन्ही बाजूला केलेले खोदकाम तसेच आहे. यामुळे अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. यामुळे या खोदकामापासून अंतर ठेवून बाजूने रस्ता वाहतुकीस उपलब्ध करून घ्यावा. प्रलंबित कामे लवकरात लवकर पूर्ण करावेत, अशा सूचना खासदार तडस यांनी दिल्या. कंत्राट दिलेली कंपनी रस्ते धोकादायक ठरू नये यासाठी उपाय योजना करत नसल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेशही तडस यांनी दिले.

जिल्ह्यात बुटीबोरी-तुळजापूर राष्ट्रीय महामार्ग तसेच सेलडोह-हमदापूर, सेवाग्राम-पवनार, वर्धा- हिंगणघाट, वर्धा-आर्वी-तळेगाव या राज्य महामार्गाची कामे सुरू आहेत. वर्धा शहरातील बजाज चौक उड्डाण पुलाचे काम केंद्रीय मार्ग निधी योजनेतून मंजूर झाले आहे. या कामासाठी अनेकदा मुदतवाढ देऊनही संबंधित कत्राटदार कंपनीने हे काम पूर्ण केलेले नाही. पुलाचा मार्ग प्रलंबित बांधकामामुळे वाहतुकीकरता असुरक्षित आहे. त्यामुळे संबधित कत्राटदारांवर दंडात्मक कारवाई करावी, असे खासदार तडस यांनी सांगितले.

आमदार पंकज भोयर आणि दादाराव केचे यांनी वर्धा व आर्वी विधानसभा क्षेत्रातील रस्ते सुरक्षा विषयक समस्यावर कार्यवाही करण्याकरता सुचित केले. यामध्ये शिवाजी चौक ते आर्वी नाका, येळाकेळी-सेलू रस्ता, खरांगणा ते कोंढाळी राज्यमहामार्ग, देऊरवाडा रस्ता, शहरातील अतिक्रमण तसेच राष्ट्रीय महामार्गाशी निगडीत समस्यांवर तोडगा काढण्याकरता काही उपाययोजना सुचवल्या.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.