वर्धा - सेलू तालुक्यातील दहेगाव (गोसावी) नजीकच्या तुळजापूर रेल्वे स्थानकाच्या फाटकाचा प्रश्न आंदोलनाने पुन्हा चर्चेत आला. तीन वर्षांपूर्वी फाटक क्रमांक 100 हा बंद करण्यात आला. आंदोलनानंतर रेल्वे विभागाने रेल्वे पादचारी पुलासाठी तत्काळ मंजुरी द्यावी, अशी मागणी खासदार रामदास तडस यांनी लोकसभेमध्ये केली. लोकसभा सभागृहात कलम 377 अंतर्गत मुद्दा उपस्थित करून रेल्वेमंत्र्यांचे लक्ष वेधण्यात आले.
दहेगावच्या नागरिकांसह लगतच्या 21 गावातील नागरिकांना रेल्वे मार्ग ओलांडताना आपला जीव धोक्यात घालवावा लागत आहे. यात 100 पेक्षा जास्त लोकांना जीव गमवावा लागला. रेल्वे विभागाच्या वतीने बांधण्यात आलेला भूमिगत मार्ग दूर असून त्याचे अंतर 400 मीटरपेक्षा जास्त आहे. पादचाऱ्यांना पर्यायी मार्गाचा फायदा होत नाही. यामुळे रेल्वे फाटक क्रमांक 100 रेल्वे हद्दीतील यार्डमध्ये अस्तित्वात असल्याने रेल्वे विभागाने विशेष बाब म्हणून या प्रस्तावित नव्याने फाटकाला मंजुरी द्यावी, अशी मागणी खासदार रामदास तडस यांनी लोकसभेत रेल्वे मंत्र्यांकडे केली.
दहेगाव आणि आजूबाजूच्या नागरिकांनी पादचारी पुलाच्या मागणीसाठी नियम 377 अंतर्गत सभागृहाचे लक्ष वेधले. या पादचारी पुलासाठी केंद्र सरकार किंवा राज्य सरकार यापैकी कोणीही तत्काळ निधी उपलब्ध करुन स्थानिक नागरिकांना सुरक्षेची हमी द्यावी, असे प्रतिपादन खासदार तडस यांनी यावेळी केले.
हेही वाचा - कर्जमुक्तीची दुसरी यादी जाहीर, 3 हजार शेतकऱ्यांचे आधार अपडेट बाकी