वर्धा - येथील महत्वाच्या मतदारसंघात देवळी मतदारसंघाचा समावेश आहे. याच मतदारसंघातील देवळी हे गाव खासदार रामदास तडस यांचे आहे. त्यांनी देवळी येथे मतदानाचा हक्क बजावला. येथे तिहेरी लढत होत असून मतदारांचा कौल नेमका कोणाला जाईल हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे.
हेही वाचा - मतदान करण्याचे शर्मिला ठाकरेंचे आवाहन; ठाकरे कुटुंबीयांनी केले मतदान
देवळीच्या यशवंत प्राथमिक शाळेत खासदार तडस यांनी मतदान केले. यावेळी खासदार तडस यांची पत्नी शोभा तडस, मुलगा पंकज तडस यांनीही मतदानाचा हक्क बजावला. लोकशाही सशक्त, बळकट करण्यासाठी, विकासाचा दृष्टिकोन असलेले सरकार निवडण्यासाठी मतदान करावे, असे आवाहन खासदार तडस यांनी यावेळी केले.