ETV Bharat / state

बापू आणि बाबावर असलेले प्रेम प्रसिद्धीसाठी नाही तर आपुलकीचे - मुरारी बापू

author img

By

Published : Nov 17, 2019, 7:54 AM IST

गांधी आणि विनोबा सत्य असून ते सर्वांचे आहेत, अशी भावना राम कथाकार मुरारी बापू यांनी व्यक्त केली. विनोबांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित मैत्री मिलन सोहळ्यात मुरारी बापू यांनी मार्गदर्शन केले.

मुरारी बापू

वर्धा - पूज्य बापू (महात्मा गांधी) आणि आणि बाबा (विनोबा भावे) यांच्या प्रति असलेले प्रेम प्रसिद्धीसाठी नाही तर आपुलकीचे आहे. गांधी आणि विनोबा सत्य असून ते सर्वांचे आहेत, अशी भावना राम कथाकार मुरारी बापू यांनी व्यक्त केली. वर्ध्यातील पवनार येथील कार्यक्रमात ते बोलत होते.

बापू आणि बाबावर असलेले प्रेम प्रसिद्धीसाठी नाही तर आपुलकीचे

विनोबांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित मैत्री मिलन सोहळ्यात मुरारी बापू यांनी मार्गदर्शन केले. विनोबा आणि महात्मा गांधींनी आयुष्य जगताना तीन महत्त्वाचे धडे दिले आहेत. त्यांनी लोकांसाठी आयुष्यभर पदयात्रा केली. भूदान चळवळ घेऊन ते माझ्या गावापर्यंत पोहचले होते. महात्मा गांधींना आपण साबरमतीचे संत म्हणतो त्याचप्रमाणे मला विनोबा देखील वामन फकीर वाटतात, असे विचार मुरारी बापूंनी मांडले.

हेही वाचा - केईएम रुग्णालयात डॉक्टरची आत्महत्या; कारण अस्पष्ट

आपण विचार आणि आचाराचे शेंदूर लावावेत. बापू आणि बाबांनी दाखवलेल्या मार्गावर आपण चालले पाहिजे, त्यातून समाजाचे कल्याण होण्यास मदत होईल, असेही मुरारी बापूंनी सांगितले.

Intro:mh_war_pavnar_maitri_milan_murari_bapu_vis_7204321

बापू आणि बाबावर असलेले प्रेम प्रसिद्धीसाठी नाही तर आपुलकीचे- मुरारी बापू

पूज्य बापू आणि आणि बाबा यांच्या प्रति असलेले प्रेम प्रसिद्धीसाठी नाही तर आपुलकी आहे. प्रसिद्धीसाठी असो की काही मिळवायचे असो यासाठी रामचरीत मानस पुरेसे आहे. पण या दोन विभूती तत्व मनाला का आकर्षित करतात. गांधी विनोबा सत्य आहे ते सर्वांचे आहे. अनेकांना वाटेल मुरारी गांधी विनोबावर काय बोलणार, पण आम्ही जीवनाचे अमूल्य वेळ जगलो आहे. हे विचार स्वतंत्र आहे. पण बापू आणि बाबा माझे आहे असे ते म्हणाले.

ते वर्ध्याच्या विनोबा भावे यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी म्हणजे पवनार येथे आले होते. विनोबांच्या पुण्यतिथी तसेच 125वे जयंती वर्ष असून त्यानिमित्ताने आयोजीत मैत्री मिलन सोहळ्यात मार्गदर्शन करतांना ते म्हणाले. यावेळी त्यांनी महातमा गांधी आणि विनोबांना प्रेम आणि श्रद्धा आहे. विनोबांनी आयुष्य जगताना तीन महत्वाचे धडे दिलेत. यातीन पाऊलामध्ये पाहिले पाऊल म्हणजे पदयात्रा. बाबांनी आयुष्यभर पदयात्रा केली. भूदान यात्रा, ते माझा गावापर्यंत पोहचेल होते. बाप दादा बुजुर्ग लोकांनी भूमीदान केले त्याचा साक्षीदार असल्याचे ते म्हणाले. एक पाऊल पदयात्रा आहे. महात्मा गांधींनी पण पूर्ण देशभर भ्रमंती करत यात्रा केली. त्यांनतर त्यांनी पुढील आयुष्य जगले. दुसरा पाऊल सदयात्रा या मार्गावर दोन्ही विभूती चालले आहे. महात्मा गांधी हे साबरमतीचे संत आहे. पण विनोबां मला वामन फकीर आहे असे वाटते. यात बाबासाठी हा शब्द प्रयोग करतांना काहीच वाटत नाही. ते अवधूत आहे. माझा अंतर्मनाच्या डोळ्यांनी पाहिले तर अद्भुत आणि अनुभूत आहे. या तिन्हीचे संगम स्थान म्हणून हे पवनार आश्रम संगमतीर्थ आहे.

दुसरे पाऊल सांगताना ते म्हणाले सदयात्रा सत्यच्या मार्गावर चालणारी यात्रा आहे. रामचरीत मानसमध्ये रामभक्ती कळण्यासाठी हनुमानला समजावे लागते. त्याचप्रमाने बापुना समजण्यासाठी विनोबांना समजने आवश्यक आहे. गांधीच्या गर्भगृहात जाण्यासाठी विनोबा हनुमान आहे. पण यासाठी तेल शेंदूर लावावे लागत नाही.
विचार आणि आचाराचे शेंदूर लावावे लागते.
सद यात्रा नसेल तर पदयात्रा अर्धी आहे. कारण ते एक पाऊल आहे. चालासाठी दोन पाऊल पाहिजे. बैसाखींच्या साह्याने चालता येत नाही. म्हणून या दोन्ही यात्रा करत असताना विनम्र यात्रा महत्वाची आहे. विमद यात्रा कुठलाही गर्व न ठेवता विनम्र असणे हा बाबाचा स्वभाव होता. आजकाल सर्वत्र सुरवात स्वार्थ पासून होते यामुळे स्वार्थ रहित यात्रा असे तीन पाऊल असनारे जीवन हे बाबाचे म्हणजेच विनोबांचे असल्याची भाव रामचारीत मानसचे पठन करणारे संत मुरारी बापू यांनी यावेळी व्यक्त केले.

Body:पराग ढोबळे,वर्धा.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.