ETV Bharat / state

झारखंडच्या 15 कामगारांसह पश्चिम बंगालच्या मजुरांची स्वगृही रवानगी; एक सोबती गमावल्याचे दुःख

पुण्याहुन घरी पायी चालत निघालेले झारखंडचे 16 मजूर वर्ध्यात पोहोचले. यातील एकाची प्रकृती बिघडून त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, या 16 मजुरांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली. त्यामुळे, उर्वरित 15 जणांसह वर्धेत अडकलेल्या नागरिकांना मंगळवारी नागपूरहून निघालेल्या श्रमिक रेल्वेने पश्चिम बंगाल मधील हावडा येथे पाठविण्यात आले. यानंतर, या 15 मजुरांना हावडावरुन झारखंड शासन त्यांच्या गावापर्यंत सोडण्याचे नियोजन करणार आहे.

झारखंडचे 15 कामगार गावाकडे रवाना
झारखंडचे 15 कामगार गावाकडे रवाना
author img

By

Published : May 27, 2020, 7:54 AM IST

वर्धा - लॉकडाऊन काळात पुण्याहून पायी निघालेले झारखंडचे 16 मजूर हे वर्ध्यात पोहचले. दरम्यान, एकाची प्रकृती खराब झाल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामुळे संशयित म्हणून त्याची कोरोना चाचणी करण्यात आली. यात सर्व 16 मजुरांचा कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आला. कोणीही बाधित नसल्याने त्यांना हावडाला जाणाऱ्या श्रमिक ट्रेनने नागपूरवरून झारखंड करता रवाना करण्यात आले. तर, मृत्यू झालेल्या मजुरावर वर्धा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी एका सहकाऱ्याची साथ मध्येच सुटल्याचे दुःख इतर मजुरांच्या चेहऱ्यावर जाणवत होते.

स्वृहही निघालेले परप्रांतीय मजूर
स्वृहही निघालेले परप्रांतीय मजूर

पुण्याहून 16 मजूर पायी झारखंडला निघाले होते. ते, 23 मे रोजी रात्री ते वर्ध्यात पोहोचले. रेल्वे स्थानकावर काही व्यक्तींनी त्यांना जेवण दिले. दरम्यान, त्यातील एका कामगाराची प्रकृती 24 मे रोजी सकाळी बिघडल्याने त्याला सामान्य रुग्णालायत आणण्यात आले. त्याला लगेच सेवाग्राम येथे नेत असताना त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, मृत मजुरासह इतर 15 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यांचे अहवाल मंगळवारी प्राप्त झाले असून सर्व 16 कामगार कोरोनाबाधित नसल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे त्यांना त्यांच्या राज्यात पोहचविण्यासाठी नियोजन करण्यात आले. यावेळी त्या राज्यातील संबंधित प्रशासकीय यंत्रणेशी बोलून त्याचा जाण्याचा मार्ग सुकर करण्यात आला.

श्रमिक रेल्वेने नागपूरवरून रवाना

वर्धेतून त्यांना नागपूरपर्यंत एसटीने पाठविण्यात आले. नागपूरहून सुटणाऱ्या श्रमिक रेल्वेने त्यांना हावडा येथे सोडण्यात येईल. तेथून झारखंड शासन त्यांना त्यांच्या गावापर्यंत सोडण्याचे नियोजन करणार असल्याचे वर्ध्याचे माहिती उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे यांनी दिली.

'त्या' मृतावर वर्ध्यात अंत्यसंस्कार

16 मजुरांपैकी एका जणाचा मृत्यू झाला होता. लांब पल्ल्याचा प्रवास आणि कोरोनाची भीती पाहता त्या व्यक्तीवर झारखंड शासनाच्या सूचनेनुसार वर्धा येथेच दफनविधी करून अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मजुरांपैकी दोघेजण उपस्थित होते. तसेच पोलीस, आरोग्य आणि महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत या मजुरावर अंत्यसंस्कार करण्यात आला.

पश्चिम बंगालच्या 90 नागरिकांची रवानगी

लॉकडाऊनमुळे वर्धेत अडकलेल्या नागरिकांना मंगळवारी नागपूरहून निघालेल्या श्रमिक रेल्वेने पश्चिम बंगाल मधील हावडा येथे पाठविण्यात आले. या नागरिकांना 5 बसमधून नागपूर रेल्वे स्थानकावर पोहचविण्यात आले. यामध्ये या 15 मजुरांसह वर्ध्यातील इतर 90 जणसुद्धा गावाकडे रवाना झाले. यामध्ये हिंगणघाटमधील 84, तर वर्धेतील 6 कामगार, नोकरदार व विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.