वर्धा - कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी शासनाने दिलेल्या आदेशानुसार शहरातील सर्व जलतरण तलाव, मॉल्स, सिनेमागृहे बंद करण्यात आली आहेत. याच धर्तीवर शहरातील सर्व प्रभागातील आठवडी बाजार, गर्दीची ठिकाणे, बंद करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. मात्र, वर्ध्यात जमावबंदीचा आदेश धुडकावत बाजार भरवल्याचे समोर आले आहे. या घटनेची पोलिसांनी माहिती मिळताच पोलीस उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांनी घटनास्थळी धाव घेऊन हा बाजार बंद केला. या ठिकाणी कलम 144 लागू असतानाही 1 हजार लोकांनी गर्दी केली होती.
हेही वाचा - जागतिक चिमणी दिवस : चिऊ ताईला दिले 'फिरता फिरता' हक्काचे घर
जिल्ह्यात 23 गुन्हे दाखल -
जिल्ह्यात कलम 144 लागू असतानाही दुकाने चालू ठेवल्यामुळे 23 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. वर्धा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत 13, तर आर्वीत आठ, तर देवळी आणि सेलूमध्ये प्रत्येकी 1 गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रीनिवास मोटर वर्कशॉप, हरिसन मोटर्स, जी एम मोटर्स, रेल्वे स्टेशन दादर अमृत्यूल्य चहा, यासह काही कापड आणि टाईल्स विक्रेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा - covid 19: वर्ध्यात बंदचे पालन न करणाऱ्या दुकानावर कारवाई...