ETV Bharat / state

Maneka Gandhi Letter Anu Khan : प्राण्यांना मोफत फळ देणाऱ्याला अनु खानला मनेका गांधींचे पत्र, म्हणाल्या... - मनेका गांधी पत्र अनु खान

प्राण्यांप्रती संवेदन शिलता ठेवत त्यांना रोज निशुल्क फळ देणाऱ्या फळविक्रेत्याचे ( Free Fruit For Animal ) आभार खुद्द खासदार मनेका गांधी ( Maneka Gandhi Letter Anu Khan ) यांनी पत्र लिहून मानले. अनु खान असे या तरुणाचे नाव आहे.

Wardha Karunashram
Wardha Karunashram
author img

By

Published : Apr 15, 2022, 5:42 PM IST

वर्धा - वर्ध्यात मुक्या प्राण्यांवर करुणेचा वर्षाव करणारे करुणाश्रम ( Wardha Karunashram ) आहे. या ठिकाणी पशु पक्षी प्राणी यांना उपचाराचा आधार दिला जातो. याच प्राण्यांप्रती संवेदन शिलता ठेवत त्यांना रोज निशुल्क फळ देणाऱ्या फळविक्रेत्याचे ( Free Fruit For Animal ) आभार खुद्द खासदार मनेका गांधी ( Maneka Gandhi Letter Anu Khan ) यांनी पत्र लिहून मानले. अनु खान असे या तरुणाचे नाव आहे.

Maneka Gandhi Letter Anu Khan
मनेका गांधी यांचे पत्र

दिल्लीवरून पत्र पाठवून अभिनंदन - अनु खान हे फळविक्रेते पिपरी येथील करुणाश्रमाला पक्षी व लहान प्राण्यांकरिता रोज निशुल्क फळे देतात. हा उपक्रम अनु खान हे मागील दोन वर्षापासून निस्वार्थपणे करीत आहेत. याची दखल घेत करुणाश्रमच्या व्यवस्थापकांनी याची माहिती पीपल फॉर ॲनिमल संस्थेच्या राष्ट्रीय अध्यक्ष खासदार मनेका गांधी यांना दिली. प्राण्यांबद्दल असलेल्या संवेदनशीलतेची दखल घेत वर्धेतील अनु खान यांना थेट पत्र लिहून त्यांचे आभार मानले आहे. अनु खान यांची प्राण्यांबद्दल असलेली संवेदनशीलता व प्रेम हे उल्लेखनीय असल्याबाबतचे खासदार मनेका गांधी यांनी पत्रात नमूद केले आहे. प्राण्यांकरिता साधारणपणे रोज एक ते दीड हजार रुपयांचे फळे निशुल्क पणे उपलब्ध करून देणे ही खूप मोठी गोष्ट आहे. त्यांच्या या चांगल्या गुणांचे कौतुक करत मनेका गांधी यांनी दिल्लीवरून थेट पत्र पाठवून त्यांचे अभिनंदन केले.

हेही वाचा - Water Crisis in Nashik : व्यवस्थेच्या झळा! हंडाभर पाण्यासाठी महिला मरणाच्या दारात

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.