वर्धा - मोदी कोणत्या मतदारसंघातून उभे राहणार काही कळत नाही, वर्धा असो, गुजरात असो की, वाराणसी जिकडे-तिकडे उमेदवारांची नावे व जी त्यांच्याच नावाने हाक मारताना दिसत आहेत, आता तर शिवसेनाही मोदींच्या नावाने मते मागत आहे, एकदा संसदेत मोदीजी आले असताना सुषमा स्वराज्य म्हणल्या, मोदींचे दर्शन घ्या, ते काय देव आहे असे म्हटले, जर्मनीत ज्याप्रमाणे हिटलरची वाहवा होत होती. त्याचप्रमाणे मोदींची वाहवा केली जात असून ते देव झाले आहेत, अशी टीका लोकसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केली, ते वर्ध्यातील आर्वीत लोकसभेच्या उमेदवार चारुलता टोकस यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेत बोलत होते.
यावेळी एआयसीसीचे दुवा, माजी मंत्री वसंत पुरके, आमदार अमर काळे, यशोमती ठाकूर आदी उपस्थित होते. योगीवर आरोप करताना खरगे म्हणाले, योगी म्हणातात की, मोदींच्या सेनेने पाकिस्तानात जाऊन मारले, ही सेना मोदींची आहे का? ही देशाची सेना आहे. त्यांनी योगी संताचे कपडे घालून 'मूह मे राम बगल मे छुरी' असल्याचे म्हणत योगींवर टीका केली. हैदराबादला म्हण आहे, उपर शेरवानी अंदर परेशानी, असे म्हणत योगीच्या कपड्यांवर त्यांची जीभ घसरली. देशात महात्मा गांधींचे पूजन केले जाते, मात्र योगींच्या राज्यात फोटोवर गोळ्या घालतात आणि गोडसेंना हार घातले जात असल्याचेही म्हणाले.
मोदींच्या सहा हजार शेतकऱ्यांचा योजनेवरही खरगेंनी टीका केली. या सहा हजाराचे वर्षाला महिन्याला पाच जणांच्या कुटुंबात विभाजन केले तर एकाला ४ रुपये येतात म्हणजे चहा सुद्धा येणार नसल्याची टीका त्यांनी यावेळी केली.