ETV Bharat / state

Indian Independence Day : स्वातंत्र्य लढ्यात बापूच्या अहिंसेच्या विचाराने आणि बुवांच्या भजनांनी घडवली क्रांती

देश स्वातंत्र्याचा 75 वा अमृतमहोत्सव साजरा करतो आहे( Azadi Ka Amrit Mahotsav ). देश स्वातंत्र्य होऊन 75 वर्ष पूर्ण झाली आहेत. लढ्याच्या काळात लोकांनी सहभागी होऊन मोठी जन आंदोलने उभी केली. त्यामध्ये महात्मा गांधी आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची मैत्री झाली. त्या दोघांची घणीष्ठ मैत्री आज आपण जाणून घेणार आहोत.

Meeting of Gandhiji Tukdoji Maharaj
गांधीजी तुकडोजी महाराजांची भेट
author img

By

Published : Aug 10, 2022, 1:59 PM IST

नागपूर : देश स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झाले असतांना अमृतमहोत्सव साजरा करतो ( Azadi Ka Amrit Mahotsav ). पण भारतीयांना ब्रिटिश सरकारच्या विरोधात लढा देण्यासाठी लोकांमध्ये स्वातंत्र्य मिळण्यासाठी ( Indian Independence Day ) लोकांना लढ्यात सहभाग करून घेत जन आंदोलन उभे केले ( Public Movement Raised ). एकीकडे महात्मा गांधी म्हणजेच बापू यांनी अहिंसेचे शस्त्र दिले तर दूसरीकडे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणजेच बुवा यांनी त्यांच्या भजनातून झाड झुडुले शस्त्र बनेगे भक्त बनेगी सेना म्हणत लोकांना ब्रिटिश सत्ता उलटून काढण्यासाठी भजनाला शस्त्र बनवत आग पेटवण्याचे काम केले. पण या दोघांच्या मैत्रीही तेवढीच खास आहे जाणून घेऊ ईटीव्ही भारतच्या या विशेष रिपोर्टमधून.

सेवाग्राम आश्रमाचा मोठा इतिहास - स्वातंत्र लढ्याला स्वातंत्र्य लढ्याची राजधानी असलेल्या वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम आश्रमाचा सहभागाचा मोठा इतिहास आहे ( Sevagram Ashram in Wardha district ). इतिहासात ऑगस्टक्रांतीच्या निमित्याने 1942 मध्ये इंग्रजांना हटवत भारतीय झेंडा फडकवला. आष्टीला 1942 मध्ये वंदे मातरमचा नारा दिला गेला ( Vande Matram ). तो इतिहास आज अजरामर झाला. या स्वातंत्र्य लढ्यात साधर्म असणारे दोन व्यक्ती बापू आणि बुवा यांची मैत्रीही तेवढीच ऐतिहासिक आहे ( Mahatma Gandhi and Tukdoji Maharaj Friendship ).

सेवाग्राम आश्रम

खेड्यांमधून जनजागृती - विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील यावली येथे जन्माला आलेले माणिक बंडोजी इंगळे(ठाकूर). कालांतराने तुकड्यानंतर सप्तखंजिरी वादक राष्ट्रसंत तुजडोजी महाराज. 1925 मध्ये नागपूर जवळच्या रामदिघीच्या जंगलात जाऊन तपश्चर्येला सुरूवात केली. इथेच तुकड्याचा तुकडोजी झाला. महात्मा गांधींच्या हातात चरखा तेच तुकडोजी महाराजांच्याया हातात खंजिरी. इंग्रजांना पळवून लावत भारताला स्वातंत्र मिळून देताना दोघांनाही गाव खेड्याची निवड केली.

गांधीजी-तुकडोजी महाराजांची पहिली भेट - नागपूरात महात्मा गांधी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची पहिली भेट गैरसमजुतीतून झाली. तुकडोजी महाराज हे बुवाबाजी पसरवतात अशी तक्रार महात्माजींकडे करण्यात आली होती. यामुळे दोघांची भेट 30 एप्रिल 1935 मध्ये दे. भ. गणपतराव टिकेकर यांच्या नागपुरातील धंतोली येथील बंगल्यावर झाली. यावेळी महाराजांना भजन एकविण्याची विनंती केली. भजन ऐकताच त्यांच्या चेहऱ्यावरील दिव्य तेज पाहताच हा माणूस बुवाजी करू शकत नाही असा विश्वास महात्मा गांधींना झाला. असा हा प्रसंग प्रा. रघुनाथ कडवे यांनी लिहून ठेवल्याचे काही पुस्तकात वाचायला मिळतात. त्यामुळे ही पाहिली भेट मैत्रीची सुरवात ठरली.

तुकडोजी महाराजांना बुवा संबोधत - यानंतर एप्रिल 1936मध्ये बापू हे सेवाग्रामला आले. महात्मा गांधी इतके प्रभावित होऊन गेले होते की त्यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना बोलावून घेतले. त्यांचे आमंत्रण स्वीकारत 14 एप्रिल 1936 तुकडोजी महाराज सेवाग्रामला गेले. यावेळी बापू आणि सरहद गांधी आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे चौघेही आदि निवास या कुटीत राहिले. त्यावेळी बापूंची कुटी बनायची होती. महात्मा गांधी आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या साधर्म असणारी आणखी एक गोष्ट म्हणजे दोघांची सकाळची दिनचर्या जवळ जवळ समान होती. पहाटे उठून सामुदायिक प्रार्थना, ध्यान रामधून, सूतकताई आणि श्रमदान. स्वछता ग्रामसफाई करत. बापू तुकडोजी महाराज यांना बुवा म्हणूनच हाक मारायचे.

तब्बल एक महिना चालली बुवाची भजन संध्या - सेवाग्राम आश्रमात त्यावेळी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज एक महिना राहिले. त्यावेळी दिनक्रमात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे रोज एक भजन गीत लिहत. तेच भाजन सायंकाळी प्रार्थना भूमीवर रोज गायले जात. बापू भजन ऐकत असताना त्यात तल्लीन होऊन जातं होते. त्यांचे प्रभावी भजन ऐकत बापूंचा स्नेह बुवा प्रति वाढत जात गेला होता. दरम्यान तुकडोजी महाराज यांना अनेक ठिकाणचे निमंत्रण बोलावणे येत होते. पण बापूंचा आग्रह असायचा और कुछ दिन रुक जावो. असे करत करत एका मागून एक दिवस लोटत गेले भजन आणि विचारातून मैत्री दृढ होत गेली. बघता बघता चक्क राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा मुक्काम एक महिना राहिला. याकाळात राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी महात्मा गांधी यांच्यावर रोज भजन लिहून काढत 180 भजन लिहले.

भंजनात तल्लीन होता बापूंचे मौनव्रतही तुटले - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रभावी ओझस्वी वाणीतून निघणारे शब्द हे बापूना जणू मोहिनी घालत. प्रार्थनेला बसले असले की ते तल्लीन होऊन जात होते. एके दिवशी बापू मौन व्रत धारण करून भजनात बसले. त्यांचं मौनव्रत तसे कठोर असयाचे. पण त्या दिवशी राष्ट्रासंत तुकडोजी महाराज नेहमी प्रमाणे भजन गात होते. "किसमतसे राम मिले जिनको...उसने ये तीन जगह पायी...हे भजन संपले आणि ते थांबले. ते भजन ऐकताना त एवढे तल्लीन झाले होते की बापूंच्या तोंडून भजनाचे बोल थांबताच लगेच शब्द बाहेर पडले "रुको मत, और भजन काहो" आणि बापूंचे मौन व्रत तुटले. यावरू त्यांच्या वाणीतील प्रभावी भजनाची ताकद लक्षात येते. याच भजनातून त्यानी ब्रिटिश सरकार विरोधात गाव खेड्यातून लोकांना लढयात सहभागी होण्याची ताकद दिली. अखेर महिन्या भरानंतर 13 ऑगस्टल बापुनी बुवाला जाण्याची परवानगी दिली. दोघांनी जड अंतकरणाने निरोप दिला. आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज टांग्यात बसून निघून गेलेत. याकाळात केवळ भजन आणि कीर्तन साधना झाली असे नाही. देशाला स्वातंत्र मिळवून देण्याचे कामालाही गती मिळाली. याच महिन्या भराराच्या कालावधीत अनेक महत्वपूर्ण बैठकी झाल्यात. स्वातंत्र्य लढ्यासाठी रणनीती दिग्गजमंडळीच्या उपस्थिती तयार झाल्याचेही अभ्यासक मंडळी सांगतात.

अहिंसेच्या मार्गाने स्वातंत्र्याचा लढा - महात्मा गांधीजी अहिंसेचा मार्गाने स्वातंत्र्याचा लढा पुढे नेत राहिले. तेच तुकडोजी महाराज भजन कीर्तनात इंग्रजांना विरुद्ध मशाल पेटविण्याचे काम केले. 1942 ला इंग्रजांना भारत छोडोचा महात्मा गांधींनी दिला. याच वेळी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनीही "झाड झडूले शस्त्र बनेंगे, भक्त बनेगी सेना। पत्थर सारे बंम बनेगे नाव लगेगी किनारे" या गीताने क्रांती घडवली. वर्धा जिल्ह्यातील आष्टी आणि चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर पेटून निघाले. ब्रिटिश राजवटीत देशात पहिल्यांदा तिरंगा फडकला तो आष्टीच्या तत्कालीन पोलीस स्टेशवर हा इतिहास अजरामर झाला. तो स्वातंत्र्याचा 75 वर्षांनंतर आज आपण भोगत असलेले स्वातंत्र्य लढ्यात अनेकांचे योगदान आहे. हे विसरून चालणार नाही.

हेही वाचा - Eknath shinde cabinet minister portfolios - मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे नगर विकास, सामान्य प्रशासन तर फडणवीसांना गृह व वित्त खातं?

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.