ETV Bharat / state

Wardha Couple Suicide : घराच्यांनी प्रेमाला विरोध केल्याने कुटुंबीयांसमोर प्रेमीयुगलाची आत्महत्या - Lover Couple Suicide in front of family

Wardha Lover Couple Suicide : आपल्या प्रेमाला घरचे समजू शकणार नाही म्हणून घरातून पळून गेलेल्या 26 वर्षीय तरुण आणि 16 वर्षीय मुलीचा शोध सुरू होता. यावेळी कुटुंबियासमोर दिसताच त्यांच्या समोरच दोघांनी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना सोमवारी समुद्रपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत सायंकाळी घडली.

Wardha Lover Couple Suicide
कुटुंबीया समोर प्रमीयुगलाची आत्महत्या
author img

By

Published : Mar 29, 2022, 6:31 PM IST

Updated : Mar 29, 2022, 8:40 PM IST

वर्धा - आपल्या प्रेमाला घरचे समजू शकणार नाही म्हणून घरातून पळून गेलेल्या 26 वर्षीय तरुण आणि 16 वर्षीय मुलीचा शोध सुरू होता. यावेळी कुटुंबियासमोर दिसताच त्यांच्या समोरच दोघांनी विहीरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना सोमवारी समुद्रपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत सायंकाळी घडली. यात दोघेही शुक्रवारपासून बेपत्ता असताना आत्महत्या केल्याचे समजताच गावात हळहळ व्यक्त होत आहे. यात महेश ठाकरे असे मुलांचे नाव असून यात मुलगी ही अल्पवयीन आहे.

पोलीस अधिकाऱ्याची प्रतिक्रिया

कुटुंबीयांची अपहरण केल्याची तक्रार - महेश शालिक ठाकरे (वय २६), 16 वर्षीय मुलगी हे उमरेड तालुक्यातील बेला येथे तर मुलगी लगतच्या गावात राहत होती. महेश हा गुराख्याचे काम करत होता, तेच मुलगी ही 9 व्या वर्गात शिकत होती. यात दोघांची ओळख झाली. वारंवार एकमेकांच्या संपर्कात आल्याने दोघांची ओळख घट्ट झाली. पण कुटुंबीय त्यांच्या दोघांना एकत्र येऊ देणार नाही म्हणून शुक्रवारी दोघांनी घर सोडले. मुलगी गावातील महेश सोबत गेल्याचे समजतात मृतक मुलीच्या कुटुंबीयांनी अपहरण केल्याची तक्रार केली.

कुटुंबीया समोर केली आत्महत्या - एवढ्यात शोध सुरू असतानाच कुठेच मिळून आले नाही. यात दोघांनी कुटुंबीयांना बोलून सांगितले की, आमच्या प्रेमाला तुम्ही समजणार नाही म्हणून घर सोडून दिल्याचे सांगितले. कुटुंबियांना अंदाज लावत शोध मोहीम चालुच ठेवली. दरम्यान सोमवारी सायंकाळी बेला गावापासून काही अंतरावर असलेल्या शेताकडे दोघेही असल्याची माहिती मिळाली. यावरून कुटुंबीय शोध घेत असतांना कुर्ला परिसरात त्यांच्यापर्यंत पोहचले. पण, महेश आणि 16 वर्षीय मुलीला कुटुंबीय दिसताच त्यांनी कुठलाच विचार न करता कुटुंबीयांच्या डोळ्यादेखत विहिरीत उडी घेतली. यातच दोघांचाही मृत्यू झाला. समुद्रपूर पोलीस माहिती मिळाताच घटनास्थळी दाखल झाले. दोघांचेही मृतदेह विहिरीतुन बाहेर काढत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले. डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.

हेही वाचा - Gas Cylinder Explodes Pune : पुण्यातील कात्रज भागात 8 सिलेंडरचे स्फोट

Last Updated : Mar 29, 2022, 8:40 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.