वर्धा - 'सामान्य टोळ वट्वट्या' हा हिवाळ्यात एक ठिकाणाहून दुसऱ्या भागात स्थलांतर करणारा पक्षी आहे. पक्षी निरीक्षणा दरम्यान हा पक्षी जिल्ह्यात प्रथमच आढळला आहे. बहार नेचर फाउंडेशनचे पक्षीअभ्यासक दिलीप वीरखडे यांनी हा पक्षी पवनार येथील धामनदी परिसरात दिसल्याचे नोंदवले आहे. पवनारच्या धाम किनाऱ्यावरील झुडपात हा पक्षी अभ्यासक दिलीप वीरखडे यांना आढळला. या पक्ष्याची ओळख 'आस्क आयडी' या फेसबूक ग्रुपवर असलेल्या पक्षीतज्ञांकडून नोंदवण्यात आली. वर्धा जिल्ह्यात या पक्ष्याची नोंद प्रथमच करण्यात आली आहे. पक्ष्यांच्या इ-बर्ड संकेतस्थळानुसार यापूर्वी विदर्भात त्याची एक नोंद नागपूर येथे आढळली आहे. बहारने वर्धा जिल्ह्यात आढळणाऱ्या पक्ष्यांची सूची नुकतीच प्रकाशित केली असून या नोंदीमुळे सूचीत भर पडून ती आता संख्या 308 झालेली आहे.
ही आहे 'सामान्य टोळची' ओळख
सामान्य टोळ वटवट्या पक्ष्याला इंग्रजीत 'कॉमन ग्रासहॉपर वार्ब्लर' म्हणतात. याचे शास्त्रीय नाव लॉक्युस्टेला न्याव्हिया (Locustella naevia) असे आहे. चिमणीपेक्षा आकाराने टोळ वटवट्या लहान असून 13 सेंटीमीटर लांब असतो. वरून तपकिरी ते गर्द तपकिरी रंगाचा तर खालील भागाचा वर्ण धूसर पांढुरका असतो. पिवळट रंगाची भुवई तसेच गळा व छातीकडील भाग पिवळसर रंगाचा असतो. अंगावर व कंठाखालील बाजूस असलेले ठिपके ही टोळ वट्वट्याची मुख्य खूण होय. त्याच्या शास्त्रीय नावातील न्याव्हिया (naevia) याचा अर्थ 'ठिपके असलेला' असा होतो. या पक्ष्याचे नर व मादी दिसायला सारखेच असतात.
ईशान्य आणि दक्षिण भारतात आढळतो
युरोप आणि प्यालेर्स्टिक भागातून आफ्रिका, भारत आणि श्रीलंका या भागाकडे हा पक्षी हिवाळी स्थलांतर करतो. भारतात प्रामुख्याने दक्षिणेकडे केरळ व कर्नाटकाच्या पश्चिम सीमावर्ती भागात तसेच मध्यभारतातील मध्यप्रदेश तथा पूर्वेकडे ईशान्य भारतात आढळतो. जलाशय अथवा नदी किनाऱ्यावरील झाडा-झुड असलेले प्रदेश, पाणथळ जागांजवळील उंच गवत, देवनळाची बेटे हा टोळ वटवट्याचा अधिवास आहे.
झुडपात विसावणारा पक्षी
हा पक्षी दाट झुडपांमध्ये थांबतो. झुडपातील झाडांच्या फांद्यांवर बराच वेळ विसावतो. त्यामुळे ते क्वचितच दृष्टीस पडतात. लांब आणि वैशिष्ट्यपूर्ण गाण्यामुळे त्याची उपस्थिती लक्षात येऊ शकते. हा मुख्यत्वे कीडे खाणारा असून पतंग, भुंगे, कोळी, चतुर व माशा हे याचे खाद्य आहे.
हेही वाचा - अगोदर मारली मीठी, नंतर पतीने दिला पत्नीला धावत्या लोकलमधून धक्का
वर्धा जिल्ह्यात प्रथमच टोळ वटवट्याची नोंद - vardha locust news
'सामान्य टोळ वट्वट्या' हा हिवाळ्यात एक ठिकाणाहून दुसऱ्या भागात स्थलांतर करणारा पक्षी आहे. पक्षी निरीक्षणा दरम्यान हा पक्षी जिल्ह्यात प्रथमच आढळला आहे. बहार नेचर फाउंडेशनचे पक्षी अभ्यासक दिलीप वीरखडे यांनी हा पक्षी पवनार येथील धामनदी परिसरात दिसल्याचे नोंदवले आहे. पवनारच्या धाम किनाऱ्यावरील झुडपात हा पक्षी अभ्यासक दिलीप वीरखडे यांना आढळला.