वर्धा - सेवाग्राम येथील बापूराव सूत गिरणीच्या कामगाराने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आर्थिक विंवचेनला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे मृत्युपूर्वी लिहलेल्या चिठ्ठीतुन उघडकीस आले आहे. ओमप्रकाश अंबादास येसनकर (५०) असे मृताचे नाव आहे.
ओमप्रकाश येसनकर हे अनेक वर्षांपासून बापूराव सूतगिरणीत कंत्राटी पध्दतीने काम करत होते. त्यांच्या घरातील परिस्थिती बेताची होती. घरातील सदस्य आणि होणारा घरखर्च पाहता त्यांची आर्थिक स्थिती बिघडली होती. अशा परिस्थितीत त्यांना मागील अडीच महिन्याचे वेतन मिळाले नव्हते. कंत्राटदार वेतन देण्यास टाळाटाळ करत असल्याने ते हतबल झाले होते. त्यामुळे त्यांनी कंटाळून हे टोकाचे पाऊल उचलले.
आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी पत्नीच्या नावे चिठ्ठी लिहून त्यात मी निघून जात असल्याचे नमूद केले. दरम्यान त्यांच्या पत्नीने ते बेपत्ता होण्याची तक्रार सेलू पोलिसात दिली होती. पोलिसांनी तपास केला असता सेवाग्राम रुगणलयाच्या मागील बाजूस असलेल्या अवळीच्या बागेत एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह मिळाला. त्यावेळी पोलिसांना पुन्हा एक चिठ्ठी मिळाली असून यात त्यांनि वेतन न मिळाल्याचा उल्लेख केला असल्याची माहीती समोर आली आहे. तसेच त्यांनी कंत्राटदाराचाही उल्लेख केला. शनिवारी त्यांचे शवविच्छेदन करण्यात आले होते मात्र, त्यांच्या कुटुंबीयांनी मृतदेह घेण्यास नकार दिला देत, जोपर्यंत कंत्राटदारास अटक करत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास कुटुंबीयानी नकार दिला. तसेच आर्थिक मदत देण्याची मागणी रेटून धरली. अखेर ठाणेदार कांचन पांडे यांनी योग्य कारवाईच आश्वासन दिल्यानतंर मृतदेह कुटुंबीयांना देण्यात आला.
हेही वाचा - तारापूर एमआयडीसी स्फोट: राज्य शासनाकडून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाखांची मदत