ETV Bharat / state

इसिसचे वर्धा कनेक्शन; एनआयएकडून संशयित महिला ताब्यात - इसिस

एनआयए पथकाने इसिस संबंधावरून संशयित महिलेच्या घराची झडती घेतली. यावेळी तिच्याकडून काही साहित्य मिळाले.

सेवाग्राम पोलीस ठाणे
author img

By

Published : Apr 20, 2019, 9:36 PM IST

वर्धा - इसिसशी संबंध असल्याच्या कारणावरून तिहार तुरुंगातील एका आरोपीच्या पत्नीला सेवाग्राम जवळील म्हसाळा येथून एनआयएने ताब्यात घेतले आहे. ही कारवाई राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) आज पहाटे केली. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

सेवाग्राम पोलीस ठाणे

अब्दुल बाशीद नावाच्या इसिसच्या हस्तकास २०१६ मध्ये अबुधाबी येथे अटक करण्यात आली होती. ऑगस्ट २०१८ पासून तो सध्या तिहार कारागृहात बंदी असल्याचे सांगितले जात आहे. वर्ध्यातून ताब्यात घेतलेली महिला अब्दुल बाशीदची दुसरी पत्नी आहे. शनिवारी पहाटे ती हैदराबाद येथून आईकडे आली. ती वर्ध्यात येत असल्याने एनआयए पथक तिच्या मागावर होते. पथकाने संशयित महिलेच्या घराची झडती घेतली. यावेळी तिच्याकडून काही साहित्य मिळाले. त्यानंतर तिला तिच्या आईसोबत सकाळी ११ वाजताच्या सुमारास सेवाग्राम पोलीस ठाण्यात नेण्यात आले. मात्र, सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास तिला पोलीस ठाण्यातून कुठे नेण्यात आले हे कळू शकले नाही.

पतीच्या माध्यमातून तिचा इसिससोबत संबंध आल्याचे सांगितले जात आहे. मात्र, एनआयएकडून तपासात गुप्तता पाळली जात आहे. त्यामुळे आज तिच्या चौकशीमध्ये नेमके काय घडले? हे समजू शकले नाही.
दरम्यान एनआयएने आज हैदराबाद येथे छापा टाकून ३ जणांना ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

इसिसचे कनेक्शन वर्ध्यात आढळून आल्याने खळबळ.

इसिसचे कनेक्शन असलेल्या तिहार तुरुंगातील एका आरोपीच्या पत्नीला सेवाग्राम जवळील म्हसाळा येथे ताब्यात घेण्यात आले आहे . ही कारवाई राष्ट्रीय तपास यंत्रनेने(एनआयए) पहाटे केली. यामुळे येथे एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान एनआयएने शनिवारी वर्धेसह हैद्राबाद येथेही एकाचवेळी धाड टाकून हैद्राबाद येथे तीन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर वर्ध्यातील एक महिलेची चौकशी सुरू आहे. 

सेवाग्रामच्या म्हसाळा येथे एनआयएने ताब्यात घेतलेल्या महिलेचे नाव नहनुमा बाशीद(अधिकृत नाही) असे कळत आहे. म्हसाळा हे तिचे माहेर आहे. अब्दुल बाशीद नावाच्या इसिसच्या हस्तकास 2016 मध्ये बुधाबी येथे अटक करण्यात आली होती. ऑगस्ट 2018 पासून तो सद्या तिहार काराग्रुहात बंदी असल्याचे सांगितले जात आहे. नहनुमा ही अब्दुल बाशीदची दुसरी पत्नी आहे. शनिवारी पहाटे ती हैद्राबाद येथून आईकडे आली. ती वर्ध्यात येत असल्याने एनआयए माघावर होते. त्यांनी घरात घुसुन झडती घेतली. यावेळी तिच्याकडून काही साहित्य मिळाले. ते पहाटेच पासून विचारपूस सुरू केली.

दरम्यान तिला सेवाग्राम पोलीस स्टेशन येथे सकाळी 11 वाजताच्या सुमारास तिचा आई बरोबर एका ऑटोतून आणण्यात आले. तब्बल सहा वाजताच्या दुमारास विचारपूस केल्याचा ससेमिरा दाखवत येथून कुठे नेले हे कळू शकते नाही.

बशीद याच्याशी संबंध केव्हा आले हे कळले नाही. तीचा इसिसच्या संबंध पतीच्या माध्यमातून आल्याचं बोलले जात आहे. मात्र नेमकं आज विचारपूस मध्ये काय घडले हे कळू शकले नाही. राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून तपासात गुप्तता पाळली जात आहे. 

आई आणि मुलीचे आता कुठे आहे हे कळू शकत नाही आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.