नागपूर - कोरोनाविरुद्धच्या लढाईत फ्रंट लायनर वॉरिअर्सचे मनोबल वाढविणे आणि त्यांच्या कामाचे कौतुक करण्यासाठी भारतीय वायू दलाच्या बँड पथकाने आज शहरातील झिरो माईल चौकात विशेष कार्यक्रमाचे सादरीकरण केले. 'सारे जहा से अच्छा हिंदोस्ता हमरा' या गाण्याने सुरू झालेल्या या विशेष कार्यक्रमात अनेक देशभक्तीपर गीत सादर करण्यात आले.
कोरोनावर मात करण्यासाठी प्रत्येक भारतीय घरी राहून आपापल्या परिने योगदान देतच आहे. मात्र, खरे वॉरिअर्स हे डॉक्टर्स, नर्सेस, आणि पोलीस विभागातील प्रत्येक कर्मचारी आहेत जे कोरोनाविषाणूसोबत थेट लढाई लढत आहेत. या सर्व कोरोना वॉरिअर्सप्रति सन्मान आणि आदर व्यक्त करण्यासाठी एअर फोर्सच्या बँड पथकाने कार्यक्रमाचे आयोजन केले.
हेही वाचा- कोरोना विषाणूमुळे पसरलेली महामारी 2022 पर्यंत चालेल - अमेरिकन संशोधन