वर्धा - अमृत योजनेतील भूमिगत गटार योजनेच्या कामातील खड्ड्यात अपघात होऊ नये यासाठी बॅरिकेड ऐवजी दुचाकी आडवी ठेवण्यात आली. पण, चक्क शहर पोलीस स्टेशन समोरच कारच्या धडकेत दुचाकी ही भूमिगत गटार योजनेच्या चेंबरमध्ये अडकली. ही घटना गुरुवारी (ता. १७ जून) रोजी रात्रीच्या सुमारास घडली. यामुळे समोरच असलेल्या पोलीस ठाण्यात कारचालकासोबतच बॅरिकेड न लावल्याने ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा - राज्यातील आमदारांसाठी देशी-विदेशी भाषांची शिकवणी; 22 जूनला होणार लोकसभेच्या उपक्रमाचे उद्घाटन
यात शहरातील मुख्य मार्गावर बजाज चौकापासून काही अंतरावर हा अपघात झाला. झाले असे की, दुचाकीधारक नितीन पोद्दार हे त्यांच्या काकाकडे गेले. पाऊस सुरू असल्याने घरापुढे रस्त्यावर असलेला खड्डा लक्षात येणार नाही. यासाठी मल निस्सारण योजनेच्या खड्ड्यासमोर कुठलेही बॅरिकेड न लावल्याचे पाहून अपघात टाळण्यासाठी त्यांनी खड्ड्याच्या अलिकडे दुचाकी उभी केली. पण, भरधाव कारने दुचाकीला धडक दिली. यात दुचाकी ही गटाराच्या चेंबरमध्ये अडकली यासह कारही खड्यात जाऊन अडकली. कंत्राटदार याने बॅरिकेड न लावल्याने, तसेच कार चालकाने भरधाव कार चालवल्याने त्यांच्याविरुद्ध नितीन पोद्दार यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.
शहरात अमृत योजना ही अपघात योजना तर नाही ना?
शहरात अमृत योजनेचे काम सुरू असताना अपघात योजना तर राबवत नाही ना? असा सवाल उपस्थिती केला जात आहे. भूमिगत गटार योजनेला असे म्हणायची वेळ का आली? असा प्रश्न केल्यास किमान डझन भरापेक्षा जास्त अपघात शहरात घडले आहेत. यात अनेक तक्रारीसुद्धा झाल्या. नगर परिषदेकडून तक्रारी नोंदवण्यात आल्या. पण, ना ठेकेदारावर काही कठोर कारवाई झाली, ना कामात सुरक्षेच्या दृष्टीने पाऊले उचलण्यात आले. पण, याचा त्रास अनेकांना झाला. कित्येक लाहन मोठे अपघात गटार योजनेच्या कामाच्या निमित्याने झालेत.
हेही वाचा - MAHARASHTRA BREAKING LIVE : भाजपशी जुळवून घ्या, शिवसेना आमदाराची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे मागणी