ETV Bharat / state

हिंगणघाट जळीतकांड: मृत्युपूर्व जबाबाची काय असेल भूमिका, जाणून घ्या..... - burning women statement hinganghat

जबाब घटनेच्या दिवशी अवघ्या काही मिनिटात झाला. घटनास्थळी पीडितेवर पेट्रोल टाकून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न झाला त्यावेळी तिने घटना स्थळावरील प्रत्यक्ष साक्षीदार आणि पोलिसांना आरोपी विकेश नगराळे याचे नाव सांगितले. यासह पीडितेने विकेश याच्या फोटोला पाहून होकार दिल्याचे देखील पोलीस तपासात पुढे आले. त्यामुळे, या जळीतकांड प्रकरणात घटनेतील दोन प्रत्यक्ष साक्षीदार आणि पुरावे हे आरोपीला फाशीच्या शिक्षेसाठी अधिक महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत.

hinganghat women set ablaze
हिंगणघाट जळीतकांड
author img

By

Published : Feb 20, 2020, 9:21 AM IST

Updated : Feb 20, 2020, 12:25 PM IST

वर्धा - कुठल्याही घटनेत पीडितेचा मृत्यू झाला असल्यास मृत्युपूर्व जबाबाला विशेष महत्व असते. यामुळे हिंगणघाट जळीतकांड प्रकरणात पेट्रोल टाकून जळालेल्या घटनेत मृत्यूपूर्व जबाबाला सुद्धा म्हत्व असणार आहे. पण, या प्रकरणात मृत्युपूर्व जबाब नोंदवले का? हा प्रश्न आहे. या प्रकरणात मग कुठले जबाब हे मृत्युपूर्व जबाब समजले जाईल हे पाहणे देखील महत्त्वाचे असणार आहे.

माहिती देताना वकील विनय घुडे

हिंगणघाट जळीतकांड हे ३ फेब्रुवारीला सकाळी ७ वाजून २० मिनिटांच्या दरम्यान घडले. या घटनेतील पडितेला नंतर हिंगणघाट रुग्णालयात प्रथमिक उपचार केल्यानंतर नागपूरला हलवण्यात आले. अखेर सात दिवस मृत्यूशी झुंज देत दहा तारखेला तिने शेवटचा श्वास घेतला. तिची प्रकृती गंभीर असताना देखील पोलिसांना तिचा जबाब नोंदवता आला. मात्र, जबाब नोंदवताना पीडिता जबाब देण्यास सक्षम आहे असे नमूद असलेल्या डॉक्टरांच्या एका वैदकीय तपासणीचे प्रमाणपत्र गरजेचे असते. सोबतच पीडितेचा जबाब न्यायदंडाधिकारी अधिकाऱ्यांच्या समक्ष घ्यावे लागते. मात्र, हिंगणघाट जळीतकांड प्रकरणात याच्या उलट कृती झाली.

घटनेच्या दिवशी अवघ्या काही मिनिटात जबाब घेण्यात आले. घटनास्थळी जेव्हा पीडितेवर पेट्रोल टाकून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न झाला त्यावेळी तिने घटना स्थळावरील प्रत्यक्ष साक्षीदार आणि पोलिसांना आरोपी विकेश नगराळे याचे नाव सांगितले. यासह पीडितेने विकेश याच्या फोटोला पाहून होकार दिल्याचे देखील पोलीस तपासात पुढे आले. त्यामुळे या नंतर जरी ती हातवारे करण्याखेरीज काही बोलू शकली नाही, तरी हाच अखेरचा मृत्युपूर्व जबाब समजला जात असल्याचे सरकारी वकील विनय घुडे यांनी सांगितले. भारतीय पुरावा कायदा १८७२ कलम ३२ च्या (१) मध्ये या संदर्भात स्पष्टपणे हे नमूद असल्याचे सुद्धा त्यांनी सांगितले. त्यामुळे या जळीतकांड प्रकरणात घटनेतील दोन प्रत्यक्ष साक्षीदार आणि पुरावे हे आरोपीला फाशीच्या शिक्षेसाठी अधिक महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.

हेही वाचा- कायदा अमान्य असल्यास आंदोलन करणे हा मूलभूत अधिकार - माजी आयपीएस अधिकारी

Last Updated : Feb 20, 2020, 12:25 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.