वर्धा - वर्ध्यासह विदर्भात उन्हाचा कडाका वाढला आहे. वर्ध्यातील आजचे तापमान ४५.८ अंश नोंदवण्यात आले आहे. रविवारी तापमानात ०.३ अंशाने घट झाली होती. सोमवारी हे तापमान पुन्हा ०.१ अंशाने वाढत ४५.८ अंश नोंदवण्यात आले. उन्हाच्या कडाक्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत.
वर्ध्यातील तापमानाचे गणित कायमच कमीजास्त होत आहे. हे तापमान आज ४५.८ अंशावर पोहचले आहे. उष्ण हवा आणि वातावरणातील गरम हवा हे सायंकाळपर्यंत अनुभवायला मिळत आहे. सायंकाळी सूर्यास्तानंतरसुद्धा हवा गरमच राहत आहे.
त्याचबरोबर शहर पाणी टंचाईचा सामना करत असताना उकाड्यापासून बचावासाठी कुलरमध्ये पाणी कुठून टाकावे असा प्रश्न नागरिकांना पडत आहे. अगोदरच ५ ते ६ दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे घशाला कोरड तशी कुलरलाही कोरड असल्याने उन्हाचा कडाका जास्तच जाणवत आहे.