ETV Bharat / state

जिल्हा परिषद शाळेतून 30 विद्यार्थ्यांना शाळा सोडण्याचा दाखला; विद्यार्थी वाऱ्यावर - mangeshi moon

रोठा येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतून उमेद प्रकल्पांतर्गत वसतिगृहातील ३० विद्यार्थ्यांना शाळा सोडण्याचा दाखला देण्यात आला आहे. याविरूद्ध उमेद प्रकल्पाच्या संचालिका मंगेशी मुन यांनी जिल्हा परिषदेपुढे मुलांना घेऊन ठिय्या देत मुख्यध्यापकावर कारवाईची मागणी केली.

विद्यार्थी
author img

By

Published : Jul 6, 2019, 8:48 AM IST

वर्धा - रोठा येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतून उमेद प्रकल्पांतर्गत वसतिगृहातील ३० विद्यार्थ्यांना शाळा सोडण्याचा दाखला देण्यात आला आहे. हा दाखला शाळेच्या मुख्याध्यापकांनी दिल्याने त्यांच्यावर विद्यार्थ्यांना शाळा बाह्य ठेवण्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे उमेद प्रकल्पाच्या संचालिका मंगेशी मुन यांनी जिल्हा परिषदेपुढे मुलांना घेऊन ठिय्या देत मुख्यध्यापकावर कारवाईची मागणी केली आहे.

जिल्हा परिषदेच्या शाळेतून 30 विद्यार्थ्यांना दाखले दिल्याचा मुख्यध्यापकावर आरोप

रोठा गावात जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे. या शाळेपासून काही अंतरावर उमेद प्रकल्पांतर्गत पारधी भटक्या समाजाच्या मुलांसाठी वसतिगृह चालविले जाते. हे वसतिगृह विना अनुदानित असून यात पूर्णतः भटक्या समाजाच्या मुलांचे संगोपन केले जाते. जवळच शाळा असल्याने मुलांना जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश देऊन पाठविले जाते. मात्र, या वर्षीच्या सत्रात शाळेतील तब्बल ३० मुलांना जबरदस्तीने दाखले देऊन काढून टाकण्यात आले. याविरोधात हे ठिय्या आंदोलन करण्यात आले.

यात शाळेचे मुख्यध्यापक महाकाळकर यांच्यावर गंभीर आरोप लावण्यात आले आहे. शाळेत मुलांना दुय्यम वागणूक देणे, विद्यार्थ्यांवर चोरी सारखे गंभीर आरोप लावणे, विद्यार्यांकडून चुकीची कामे करून घेणे, असे आरोप त्यांच्यावर लावण्यात आले आहे. तसेच, केवळ तीन अर्जांवर ३० मुलांना दाखले कसे दिले. याचे उत्तर त्यांना मागण्यात येत आहे.

याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यपालन अधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांनी प्रकरणाची गंभीरता पाहता शाळेला भेट देत पाहणी केली. तसेच प्राथमिक चौकशी केली. या प्रकरणाची सखोल चौकशी आष्टी येथील गट शिक्षण अधिकारी करतील. ते संपूर्ण बाबी तपासून मत जाणून घेऊन अहवाल सादर करतील. त्यांनतर दोषी आढळल्यास कारवाई केली जाईल. यात कुठलीही हयगय होणार नसल्याचे ओंबासे यांना सांगितले.

याप्रकरणी उमेद प्रकल्पाच्या संचालिका मंगेशी मुन यांना शाळेत चौकशीसाठी येण्यास सांगितले होते. मात्र, मंगेशी मुन आल्या नाही. त्यांनी अजून लेखी तक्रारही दिली नाही. लवकरच अहवाल प्राप्त होणार असून दोषींवर कारवाई केल्याजाणार असल्याचे मुख्यकार्यपालन अधिकारी डॉ. ओंबासे यांनी संगीतले आहे. या प्रकरणामुळे विद्यार्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी त्यांनी लवकर शाळेत प्रवेश घ्यावा. असे आवाहनी डॉ. ओंबासे यांच्याकडून करण्यात आले आहे.

Intro:जिल्हा परिषदेच्या शाळेतून 30 विद्यार्थ्यांना मुख्यध्यपकांनी दाखले दिल्याचा आरोप,

- विद्यार्थ्यांचा ठिय्या, चौकशी करून कारवाई करू मुख्य कार्यपालन अधिकारी
- विद्यार्थ्यांनी शाळेत प्रवेश घेण्याचे केले आवाहन
- तीन अर्जांवर ३० विद्यार्थ्यांचे दाखले दिल्याचा आरोप
- मुख्याध्यापकासह शिक्षकावर कारवाईची मागणी
- उमेद प्रकल्पाच्या मंगेशी मून यांच्या नेतृत्त्वात आंदोलन

वर्धा - रोठा येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतून उमेद प्रकल्पा अंतर्गत वसतिगृहातील 30 विद्यार्थ्यांना शाळा सोडण्याचा दाखल देण्यात आला. हा दाखला शाळेच्या मुख्याध्यापकांनी दिल्याने विद्यार्थ्यांना शाळा बाह्य ठेवण्याचा प्रकार असल्याचा आरोप करण्यात आला. यामुळे उमेद प्रकल्पाच्या संचालिका मंगेशी मुन यांनी जिल्हा परिषदेपुढे मुलांना घेऊन ठिय्या देत मुख्याध्यापकावर कारवाईची मागणी केली. तर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ.सचिन ओंबासे यांनी प्रकरणाची सखोल चौकशी करून कारवाई केली जाईल. अगोदर मुलांनी शाळेत लवकर प्रवेश घ्यावे असे आवाहन केले.

रोठा गावात जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे. या शाळेपासून काही अंतरावर उमेद प्रकल्पा अंतर्गत पारधी भटक्या समाजाच्या मुलांसाठी वसतिगृह चालवले जाते. हे वसतिगृह विना अनुदानित असून यात पूर्णतः भटक्या समाजाच्या मुलांचे संगोपन केले जाते. जवळच शाळा असल्याने जिल्हा परिषद शाळेत त्याना प्रवेश देत पाठवले जाते. मात्र यंदाच्या सत्रात विद्यार्थ्याना जबरदस्तीने दाखले दिले. यात 30 मुलांचे नाव शाळेतून काढून टाकत शाळा बाह्य केले जात असल्याचा आरोप करण्यात आला. याच विरोधात धरणे देत मुख्यध्यपकावर कारवाईची मागणी करण्यात आली.

यात शाळेचे मुख्यध्यापक महाकाळकर यांच्यावर गंभीर आरोप लावण्यात आले. शाळेत मुलांना दुय्यम वागणूक दिल्या जाते. विद्यार्थ्यांवर चोरी सारखे गंभीर आरोप केले जातात चुकीचे काम करून घेतल्या जात असल्याचा आरोप केला. तसेच केवळ तीन अर्जावर 30 मुलांना दाखले देण्यात कसे जॅके असा आरोप करत सवाल विचारण्यात येत आहे.

या संबंधात जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यपालन अधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांनी प्रकरणाची गंभीरता पाहता शाळेला भेट देत पाहणी केली. तसेच प्राथमिक चौकशी केली. या प्रकरणाची सखोल चौकशीसाठी आष्टी येथील गट शिक्षण अधिकारी हे संपूर्ण बाबी तपासून मत जाणून घेऊन अहवाल सादर करतील. त्यांनतर जर दोषी आढळले तर कारवाईला केली जाईल. कुठलीही हयगय होणार नाही असेही ते बोलतांना म्हणाले.

विद्यार्थ्यांनी मात्र त्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही. यासाठी लवकर शाळेत आपले नाव प्रवेश करून घ्यावा असे आवाहन करण्यात आले. सोबतच संचालिका मंगेशी मुन यांना शाळेत चौकशीसाठी गेलो असता शाळेत येण्याचे सांगितले होते. मात्र मंगेशी मुन आल्या नसल्याचे संगीतले. लेखी तक्रार सुद्धा अजून दिली नाही. दोषी असल्यास चौकशी नंतर कारवाई केली जाईल. लवकरच अहवाल प्राप्त होणार असल्याचे सुद्धा मुख्यकार्यपालन अधिकारी ओंबासे यांनी संगीतले.

Body:पराग ढोबळे, वर्धा.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.