ETV Bharat / state

वऱ्हाड्याचा झटका; वर्ध्यात लग्नानंतर 7 दिवसानी चक्क नवरदेवच निघाला कोरोनाबाधित...

author img

By

Published : Jul 8, 2020, 5:08 PM IST

Updated : Jul 8, 2020, 7:07 PM IST

अनलॉकमध्ये मोठ्या आनंदाने लग्न केल्यानंतर नवरदेवासह त्याच्या कुटूंबीयांचीही आता झोप उडाली आहे. हा नवरदेव कोरोनाबाधित असल्याचा अहवाल आला आहे. नवरदेवाच्या कुटुंबातील व्यक्तींना आयसोलेट करण्यात आले आहे. या कुटुंबाच्या संपर्कात आलेल्या अन्य व्यक्ती, नातेवाईकांचेही ट्रेसिंग करण्याचे काम आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे.

wardha
क्वारंटाईन केलेले घर

वर्धा - लग्नात आलेल्या वऱ्हाड्यामुळे चक्क नवरदेवालाच कोरोनाची बाधा झाल्याची घटना पिपरी मेघे परिसरातील शिवराम वाडी येथे उघड झाली. अनलॉकमध्ये मोठ्या आनंदाने लग्न केल्यानंतर नवरदेवासह त्याच्या कुटूंबीयांचीही आता झोप उडाली आहे. हा नवरदेव कोरोनाबाधित असल्याचा अहवाल आला आहे. तो बाहेर जिल्ह्यात गेला नसला, तरी विवाह समारंभात बाहेर जिल्ह्यातून पाहुणे मंडळींच्या संपर्कात आल्याने नवरदेवालाच कोरोना झाल्याचा संशय आहे. या प्रकरणानंतर प्रशासन कठोर पावले उचलण्याच्या तयारीत आहे.

वऱ्हाड्याचा झटका; वर्ध्यात लग्नानंतर 7 दिवसानी चक्क नवरदेवच निघाला कोरोनाबाधित...

याच पिपरी मेघे परिसरात यात काही दिवसांपूर्वी कोरोनाचा रुग्ण आढळून आल्याने कंटेंनमेंट झोन तयार करण्यात आला होता. आता याच शिवराम वाडी परिसरात 33 वर्षीय नवरदेव हा कोरोनाचा बाधित आसल्याचे उघड झाल्याने नवीन कंटेंनमेंट झोन तयार करण्यात आला आहे. यात 30 जून रोजी या तरुणाचा विवाह सोहळा पार पडला. या सोहळ्यात नातेवाईक हे रेडझोन किंवा अन्य बाधित जिल्ह्यातून आल्याचा संशय व्यक्त होत आहे. यामुळे त्या नावरदेवास 5 जुलैला प्रकृती चांगली नसल्याने सामान्य रुग्णालयात नेण्यात आले. त्याचा अहवाल बुधवारी पॉझिटिव्ह आल्याने त्याला सेवाग्राम रुग्णालयात दाखल करण्यात आले. यामुळे येत्या काळात प्रशासनाने लग्नसंभारसाठी कठोर पावले उचलण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे.

कोरोना पॉझिटिव्ह नवरदेवाच्या कुटुंबातील व्यक्तींना आयसोलेट करण्यात आले आहे. या कुटुंबाच्या संपर्कात आलेल्या अन्य व्यक्ती, नातेवाईकांचेही ट्रेसिंग करण्याचे काम आरोग्य विभागाकडून तालुका आरोग्य अधिकारी माधुरी बोरकर करत आहेत. यामध्ये नेमके किती लोकांना गृह विलगीकरणात ठेवावे लागेल, यासाठी माहिती गोळा करण्याचे काम सुरू झाले आहे.

वर्धा जिल्ह्यात अनके दिवस कोरोनाचा रुग्ण आढळून आला नाही. लॉकडाऊनच्या काळात प्रशासन आणि नागरिकांनी मोठ्या प्रमाणात खबरदारी घेत कोरोनाच्या संसर्गाला अटकाव घातला होता. अनलॉक प्रक्रियेला सुरवात झाल्यानंतर आता मात्र रूग्णसंख्येत झपाट्याने वाढ होताना दिसून येत आहे. यात जिल्ह्यातील रुग्णसंख्या बुधवारी 30 झाली आहे. विशेष म्हणजे यात 16 जण हे कोरोना पॉझिटिव्ह असून 12 जणांना यापूर्वी मुक्त होऊन त्यांना सुट्टी झाली आहे. यात सर्वाधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्णामध्ये वीज वितरणचे कर्मचारी आहेत. त्यांची रुग्णसंख्या ही 9 आहे. यामुळे आता नागरिकांसह पुन्हा प्रशासनाने सतर्क होण्याची गरज व्यक्त होत आहे.

Last Updated : Jul 8, 2020, 7:07 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.