ETV Bharat / state

...अखेर सर्व सेवा संघाच्या राष्ट्रीय अध्यक्षांना व्हावे लागले पायऊतार - सर्व सेवा संघाचे अध्यक्ष

एकीकडे देशभरात महात्मा गांधीजींचे १५०वे जयंती वर्ष साजरे होत आहे, तर दुसरीकडे सर्व सेवा संघाच्या कार्यकारणीत अनेक बदल होत आहेत. यामुळे येणाऱ्या गांधी जयंतीवेळी कसे चित्र असेल हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

सर्व सेवा संघ
सर्व सेवा संघ
author img

By

Published : Sep 23, 2020, 10:59 PM IST

वर्धा - देशभरात महात्मा गांधींचे 150वे जयंती वर्ष साजरे होत आहे. अशात गांधी जयंती अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. यात सर्व सेवा संघाचे कामचलाऊ अध्यक्ष महादेवभाई विद्रोही यांना पायऊतार करण्यात आले. ऑनलाइन पद्धतीने झालेल्या बैठकीत सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला. यासह त्यांच्या जागेवर पुढील निवडणुकीपर्यंत कोलकात्याचे चंदनपाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

ऑनलाइन बैठकीचा आढावा

महादेव विद्रोही यांनी मागील सहा महिन्यात केलेले सर्व कामकाज बरखास्त करण्यात आले. सर्व सेवा संघाचा कार्यकाळ हा मार्च महिन्यातच संपला असून त्याच वेळी निवडणुका होणे अपेक्षित होते. मात्र, लॉकडाऊनमुळे राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाली नाही. याच कारणामुळे विद्रोहींकडेच पुढील निवडणुकांपर्यंत राष्ट्रीय अध्यक्षपदाचा पदभार देण्यात आला. मुळात या काळात त्यांना धोरणात्मक निर्णय घेण्याची परवानगी नव्हती. तरिही त्यांनी याच काळात अनेकांच्या नियुक्त्या रद्द करणे, नवीन सदस्यांची निवड करणे, असे अनेक निर्णय घेतले. हे निर्णय चुकीचे असल्याने वरिष्ठ स्तरावरून हा प्रकार थांबवण्याचे त्यांना पत्रव्यवहाराद्वारे सुचवण्यात आले होते. मात्र, तरिही त्यांनी अनेक धोरणात्मक निर्णय घेतल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

हेही वाचा - '..अजूनही मी मुक्ताईनगरातच आहे, राष्ट्रवादीत जाण्याविषयी अद्याप निर्णय नाही'

याव्यतिरिक्त आता अध्यक्षपदी निवड करण्यात आलेल्या चंदनपाल यांना त्यांनी काढून टाकले होते. यासह सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष टी. आर. एन. प्रभू यांनाही पदावरून हटवण्यासाठी पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता एक कलाम कार्यक्रम चालवण्याच प्रयत्न विद्रोहींनी केला. तेलंगणा राज्यात कोट्यावधी रुपये किमतीच्या भूदान जमीन घोटाळ्यावरील चौकशी दाबण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही त्यांच्यावर करण्यात आला आहे. यामुळे आज ऑनलाइन पद्धतीने झालेल्या बैठकीत त्यांना पायऊतार करण्यात आले.

यापुढील अध्यक्षपदाचे कामकाज चंदनपाल पाहणार आहेत. येत्या तीन महिन्यांत निवडणुका होणे अपेक्षित असून तोपर्यंत कोणतेही धोरणात्मक निर्णय घेतले जाणार नाही, हे देखील स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, 2 ऑक्टोबरला साजरा होणाऱ्या गांधी जयंतीच्या कार्यक्रमावर काही परिणाम होणार, काही राजकीय वादंग होणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

हेही वाचा - 'मुंबईची तुंबई केली, शिवसेनेने करून दाखवलं; राज्य सरकार सर्व आघड्यांवर फेल'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.