वर्धा - जिल्ह्यातील जेनेटिक सायन्स लिमिटेडमध्ये सध्या रेमडेसिवीर आणि एम्फोटेरेसीन बी इंजेक्शनचे उत्पादन करणाऱ्या कंपनीला औषध निर्मिती कंपनीला शुक्रवारी अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी भेट दिली. सेवाग्राम एमआयडीसीतील लॅबमध्ये जाणून संपुर्ण निर्मिती प्रक्रिया जाणून घेतली. यावेळी त्यांनी कंपनीमध्ये तयार होणाऱ्या सर्व औषधांबाबत माहिती घेतली.
अल्प दिवसात जेनेटिक लाईफ सायन्सेसला परवानगी
दुसऱ्या लाटेत रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला होता. याच दसरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरीं यांच्या प्रयत्नातून अल्प दिवसात जेनेटिक लाईफ सायन्सेसला परवानगी देण्यात आली. केंद्र व राज्य शासन, अन्न व औषध प्रशासन विभाग, आणि हैदराबाद येथील हेटरो यामल्टी नॅशनल कंपनीने केलेल्या सहकार्यामुळे औषध तयार करण्यासाठी मान्यता मिळाली. यात रेमडेसिवीर औषधाची निर्मिती सुरू झाली तेव्हाच भेट देणार होतो. मात्र, त्यावेळेस शक्य न झाल्याचे शिंगणे म्हणाले.
एम्फोटेरेसिन-बी औषधाची निर्मितीही वर्ध्यात
म्यूकरमायकोसिसवरील उपचारात उपयुक्त असलेले एम्फोटेरेसिन-बी हे औषधही वर्धा जिल्ह्यातून तयार होत आहे. यावेळी कंपनीचे डॉ महेंद्र क्षीरसागर, माजी आमदार सुरेश देशमुख, अन्न व औषध प्रशासन सहाय्यक आयुक्त सतीश चव्हाण व इतर उपस्थित होते.